Friday, July 31, 2020

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
          याप्रसंगी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनीही साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

रॅपिड अँटीजेन टेस्ट किट दोष विरहीत ; जिल्हा शल्य चिकित्सकांचा खुलासा

रॅपिड अँटीजेन टेस्ट किट दोष विरहीत ; जिल्हा शल्य चिकित्सकांचा खुलासा

परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

रॅपिड अँटिजेन टेस्टच्या किटमध्ये तांत्रिक दोष आढळल्याने परभणी जिल्ह्यातील चाचण्या तात्काळ थांबविण्याचे आदेश काढण्यात आले असल्याच्या आशयाचे वृत्त दै. पुढारी या वृत्तपत्रामध्ये सोमवार दि.27 जुलै 2020 रोजीच्या अंकात  प्रसिध्द करण्यात आले होते. तरी जिल्ह्यातील रुग्णालयात उपलब्ध असलेल्या कोरोना तपासणीच्या किट चाचणीसाठी संपुर्णत: सक्षम असून त्यामध्ये कोणतेही तांत्रिक दोष नाहीत. असा खुलासा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बी.एस.नागरगोजे यांनी केला आहे.
            सोमवार दि.27 जुलै रोजी दै.पुढारीमध्ये प्रसिध्द करण्यात आलेली बातमी चुकीची असून जिल्हा रुग्णालयाकडून चाचण्या थांबविण्याचे किंवा किटमध्ये तांत्रिक बिघाड असल्याबाबतचे कोणतेही आदेश अथवा पत्र काढण्यात आलेले नाही. अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्यामुळे जनतेत चुकीचा संदेश जावून परिणामी संभ्रम निर्माण झाल्यामुळे आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनास अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे अशा अफवांवर जिल्ह्यातील नागरिकांनी विश्वासू ठेवू नये. असेही जिल्हा शल्य चिकित्सक, परभणी यांनी कळविले आहे.

Wednesday, July 29, 2020

एल.आर.के.इंग्लिश स्कूल 2019-2020 निकाल 100% ; श्रेया रामभाऊ नवले 89.00 % प्रथम

एल.आर.के.इंग्लिश स्कूल 2019-2020 निकाल 100% ; श्रेया रामभाऊ नवले 89.00 % प्रथम

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरातील एल.आर.के. इंग्लिश स्कूल 2019-2020 निकाल 100% लागला आसुन.इयत्ता 10 वी मधुन श्रेया रामभाऊ नवले 89.00 % प्रथम, शांभवी सोमनाथ राऊत 88.00 % द्वितीय, प्राची एकनाथ भोसले 86.40 % तृतीय क्रमांक मिळविला आहे.
 सर्व विद्यार्थी चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. परमेश्वर कदम , उपाध्यक्षा सौ. ज्योतीताई कदम तसेच प्राचार्य व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा व उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्याचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.
सा.सोनपेठ दर्शन परीवारा तर्फे सर्व यशस्वी विध्यार्थी व विध्यार्थीनींचे मनपुर्वक अभिनंदन!!!!!
संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

सोनपेठ येथिल जिजामाता पब्लिक स्कूलचा निकाल 100,%अदिती वामण 97.80% गुणासह तालुक्यात सर्वप्रथम....

सोनपेठ येथिल जिजामाता पब्लिक स्कूलचा निकाल 100,%अदिती वामण 97.80% गुणासह तालुक्यात सर्वप्रथम....

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ येथील जिजामाता  विद्यालय व पब्लिक स्कूल दहावी बोर्ड परीक्षेत सलग चौथ्या वर्षी 100 % निकाल देऊन यशाची परंपरा अबाधित ठेवली.योग्य मार्गदर्शन शिस्तबद्ध अभ्यास आणि कठोर मेहनतीच्या माध्यमातून आदिती बालासाहेब वामन 97.80% गुण घेऊन तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला,तर स्वप्नील सूनील बरवे 94.80% आणि आनंदी देवानंद कसपटे 94.40% अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.दहावी बोर्ड परीक्षेला एकूण 25 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 10 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण घेऊन भरभरून यश प्राप्त केले या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये घोडके सोमेश्वर 91.60% ,अमर खरात 91% , टक्के पूजा गावडे 90.80%, हर्षदा वडकर 90%, सचिन राठोड 90.40%, रवींद्र यादव 90%, संस्कृती बोबडे 88%, आदित्य खेडकर 87.40% . या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे सचिव प्रा.डॉ.मुंजाभाऊ धोंडगे सर मुख्याध्यापिका विद्याताई धोंडगे शाळेचे प्राचार्य अजय सर, गणेश जयतपाळ सर, अश्विनी चव्हाण मॅडम, अशोक आळसे सर, दिलीप कोलते सर, शेख सर, रंगनाथ गांगर्डे सर वैभव रत्नपारखे  सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षिका यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मत व्यक्त करताना "सोनपेठ सारख्या ग्रामीण भागातही दर्जेदार शिक्षणासाठी शाळा सदैव प्रयत्नशील राहील" असे मत शाळेचे सचिव प्रा.डॉ. मुंजाभाऊ धोंडगे सर यांनी व्यक्त केले.
सा.सोनपेठ दर्शन परीवारा तर्फे सर्व यशस्वी विध्यार्थी व विध्यार्थीनींचे मनपुर्वक अभिनंदन 
संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

दहावी बोर्ड परीक्षेत व्हिजन पब्लिक स्कूल चे घवघवीत यश ; सर्वप्रथम सुमित रविकुमार स्वामी 96.00%

दहावी बोर्ड परीक्षेत व्हिजन पब्लिक स्कूल चे घवघवीत यश ; सर्वप्रथम सुमित रविकुमार स्वामी 96.00% 

सोनपेठ (दर्शन) :-

         विश्वभारती जनसेवा प्रतिष्ठान परभणी संचलित व्हिजन पब्लिक स्कूल सोनपेठ 2020 बोर्ड परीक्षेचा एकूण निकाल 100% एवढा लागला आहे.विद्यालयातून एकूण 33 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते.यापैकी 33 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.5 विद्यार्थ्‍यांना 90% पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.तर 20विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. 11 विद्यार्थी प्रथम श्रेणी सह उत्तीर्ण झाले आहेत.विद्यालयातून सर्वप्रथम सुमित रविकुमार स्वामी 96.00% , सर्वद्वितीय कु.निकीता मधुकर स्वामी 93.20% , तृतीय पुजा झाड 92.20% तर चतुर्थ  कदम शुभांगी 91.40% गुण घेऊन गुणानुक्रमे उत्तीर्ण झाले आहेत.
         यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष मा.पवार साहेब तसेच संस्थेच्या सचिव मा.सौ.सारिका पवार संस्‍थेचे संचालक मा.विनोद पवार गटशिक्षणाधिकारी शौकत पठाण साहेब प्राचार्य डॉ पांडुरंग दुकळे ,उपमुख्याध्यापक भगवान घाटुळ, रामेश्वर हुंबे तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.
सा.सोनपेठ दर्शन परीवारा तर्फे सर्व यशस्वी विध्यार्थी व विध्यार्थीनींचे मनपुर्वक अभिनंदन 
संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

अखेर वागलगाव ते लासिना रस्त्यावर मुरुम टाकुन रस्ता तयार करुन राजेशदादा विटेकर यांनी पावसाळ्यात केली आडचण दुर....

अखेर वागलगाव ते लासिना रस्त्यावर मुरुम टाकुन रस्ता तयार करुन राजेशदादा विटेकर यांनी पावसाळ्यात केली आडचण दुर.... 

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ तालुक्यातिल मौजे वागलगाव ते लासोना रस्ता कुनाच्याही मातीला जायचे मनले कि बैलगाडी शिवाय पर्याय नव्हता आज भर पावसाळ्यात रस्ता असुन अडचणीचा आहे.शेवटि
दि.29 जुलै 2020 बुधवार रोजी वागलगाव ते लासिना रस्त्यावर मुरुम टाकुन रस्ता तयार करुन राजेशदादा विटेकर यांनी खरी पावसाळ्यात केली आडचण दुर याप्रसंगी वागलगाव ग्रामस्तांनी राजेशदादा विटेकर यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

Monday, July 27, 2020

माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे सोनपेठ फोटो स्टुडिओ असोसिएशन यांच्या वतीने आर्थिक मदतीची मागणी

माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे सोनपेठ फोटो स्टुडिओ असोसिएशन यांच्या वतीने आर्थिक मदतीची मागणी

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ फोटो स्टुडिओ असोसिएशन च्या सर्व सदस्यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माननीय तहसीलदार सोनपेठ यांच्या मार्फत एका निवेदना द्वारे सर्व च्या सर्व फोटो स्टुडिओ दुकानदारांनी निवेदनात आमची संपूर्ण लग्नसराई या "कोरोना" महामारी च्या लाँकडाउन मध्ये वाया गेली अख्या वर्षभराची सर भरून निघणार नाही ? सीजन गेले म्हणून दुकान किराया, दुकान खर्च, घर खर्च, लाईट बिल व नोकरांचे पगार आधी थांबले नाही म्हणून संपूर्ण सोनपेठ फोटो स्टुडिओ असोसिएशन सर्व दुकानदार आर्थिक विवंचनेत सापडलो आहोत म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या अर्जाचा विचार करून आमच्या बँक खात्यामध्ये आर्थिक मदत देऊन सहकार्य करावे अशी विनती केली आहे. या आर्जा सोबतच सर्व दुकानदारांनी दुकानाचा परवाना, बँकेचे पासबुक, रेशन कार्ड व आधार कार्ड आदी सह सोनपेठ फोटो स्टुडिओ असोसिएशन अध्यक्ष व सचिव यांचे पत्र जोडलेली आहेत हे निवेदन घेऊन माननीय तहसीलदार सोनपेठ यांना अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, सचिव प्रमोद मोडीवाले, सदस्य दत्तराव सोळंके व बालाजी हाके यांनी मास्क वापरत, सिनेटायझर होऊन शोषल डिस्टन्सिंग पाळत सपुर्थ केले.
संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

ज्याचा विरोध केला त्यांच्याच सतरंज्या उचलण्याची वेळ ; भाजपाचे जिंतूरचे कार्यकर्ते प्रदीप फाले यांची खंत व राजीनामा

ज्याचा विरोध केला त्यांच्याच सतरंज्या उचलण्याची वेळ ; भाजपाचे जिंतूरचे कार्यकर्ते प्रदीप फाले यांची खंत व राजीनामा

जिंतुर / सोनपेठ (दर्शन) :-

गेल्या 20-30 वर्षापासून ज्या मंडळींना कायम विरोध केला. त्यांच्याच सतरंज्या उचलण्याची वेळ आपल्या सारख्या जुन्या कार्यकर्त्यांवर आल्याची खंत भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा प्रभारी प्रदीप फाले यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना पाठविलेल्या एका निवेदनाद्वारे केली व्यक्त केली असून आपण पदांचे स्वइच्छेने राजीनामा देत आहोत, असेही नमुद केले. 
इतर पक्षातून ऐनवेळी इनकमिंग केलेल्या विविध व्यक्ती विविध पदांवर विराजमान होत आहेत. पैशाची लालुच दाखवून सर्व पदे भोगत आहेत. आपल्यासह इतर ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी गेल्या 20-30  वर्षापासून जीवचं रान केलं, सेवा केली त्या कार्यकर्त्यांना मात्र सातत्याने विविध पदांपासून कायम दुर्लंक्षीत राहवे  लागत आहे. ज्या-ज्या मंडळींनी पक्षात घुसखोरी केली ती मंडळी तातडीने पदे पटकावत असून आपणच निष्ठावन असल्याचा आव आणत आणून बसले आहेत, अशी टिका फाले यांनी या निवेदनातून केली. ज्याच्याशी कायम विरोध केला त्याच लोकांच्या सतरंज्या उचलण्याची वेळ जुन्या कार्यकर्त्यांवर आली असल्याचे नमुद करीत फाले यांनी या गलिच्छ खेळ्यापासून आपण स्वतःस कायम दूर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे म्हटले. 
आपण आपल्या जबाबदा-यांचा राजीनामा देत आहोत. यापुढे सामाजिक कार्यातच रस घेवू, कोणत्याही निवडणुकीत, राजकीय घडामोडीत सहभागी असणार नाही, असे स्पष्ट करीत फाले यांनी पक्ष यशाच्या शिखरावर पोहचला असतांना सामान्य कार्यकर्त्यांस न्याय मिळत नसल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.
संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

Sunday, July 26, 2020

राज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील
 
        मुंबई, दि.26 : राज्यात यावर्षी पणन विभागाने 219.49 लाख क्विंटल विक्रमी कापसाची खरेदी केली आहे. गेल्या दहा वर्षातील ही विक्रमी कापूस खरेदी असल्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

यासंदर्भात माहिती देताना सहकार मंत्री श्री. पाटील म्हणाले,  राज्यात हंगाम 2019-20 मध्ये 44.30 लाख हेक्टर कापसाची लागवड झाली. पर्जन्यमान सामान्य झाल्यामुळे कापसाचे विक्रमी पीक झाले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कापसाच्या दरामुळे देशाअंतर्गत व राज्या अंतर्गत कापसाचे दर हे कमी होत गेले. शेतकऱ्यांना  हमी दरापेक्षा कमी दराने कापसाची विक्री करण्यांची वेळ येवू नये याकरीता राज्यात कापूस पणन महासंघाची नियुक्ती सीसीआयचे सबएजंट म्हणून करण्यांत आली.

            सर्वप्रथम राज्यामध्ये 40 कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले.सातत्याने कापसाचे पडणारे दर तसेच कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव आणि वस्त्रोद्योगावर त्याच्या प्रभावामुळे  बाजारपेठेमध्ये खाजगी खरेदीदारांची  संख्या कमी होत गेली, असेही सहकार मंत्र्यांनी सांगितले.

            शेतकऱ्यांना त्रास होऊ नये आणि कापूस खरेदीला विलंब होऊ नये यासाठी सीसीआय व कापूस पणन महासंघाद्वारे अधिकचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचा  निर्णय राज्य शासनाने घेतला. कापूस पणन महासंघाद्वारे परिस्थितीनुरुप 127 कापूस खरेदी केंद्र  कोरोना पूर्वी सुरू करण्यात आली होती. कापूस पणन महासंघाकडील पुरेसा सेवक वर्ग उपलब्ध नसल्याने अधिकचे खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आपत्कालीन परिस्थिती पाहून शासनाने कृषी विभागातील कृषी पदवीधर सेवकांची नियुक्ती  जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली आणि नवीन कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.

            हंगाम 2019-20 मध्ये एकूण 190 कापूस खरेदी केंद्रावर कापूस पणन महासंघद्वारे कापूस खरेदीचे कामकाज सुरू आहे. कापूस पणन महासंघा द्वारे हंगाम 2019-20 मध्ये एकूण 3.33 लाख शेतकऱ्यांकडून कापसाची खरेदी करण्यात आली आहे.

            कोरोनाच्या  प्रादुर्भावामुळे मुळे एप्रिल महिन्यात कापसाची खरेदी  स्थगित ठेवावी  लागल्यामुळे शेतकऱ्यांची प्रतिक्षा यादी वाढत गेली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी  पावसाळ्यामध्ये देखील  मान्सून शेड उभारून कापूस खरेदी मोठ्या प्रमाणावर  करण्यात येत असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

राज्यात प्रथमच जून व जुलै महिन्यामध्ये कापसाची खरेदी करण्यात येत आहे

शेतकऱ्यांकडून एकूण 4600 कोटी रुपयांची कापूस खरेदी करण्यात आली. बहुतांश  कापूस हा खरीप 2020-21 च्या पेरणी पूर्वी खरेदी करण्यात आला असून शेतकऱ्यांची देयके देखील तत्पूर्वी देण्यांत आली आहेत.

हंगाम 2019-20 मधील  पणन महासंघद्वारे हमीभावाने केलेली खरेदी

*राज्यात हंगाम 2019-20 करिता कापूस पिक-पेरा खालिल क्षेत्र  – 44.30 लाख हेक्टर

*अपेक्षित कापूस उत्पादन – 407 लाख क्विंटल (कृषी  विभागानुसार)

*कापूस उत्पादक 10,000 हेक्टरपेक्षा अधिकचा पेरा असलेले तालुके – 140

*सध्यास्थितीत कापसाचे बाजार दर प्रति क्विंटल रु. 3800/4800

*बाजारात विक्रीस येत असलेल्या कापसतील आर्द्रता 8 ते 12 टक्के

*कापूस पणन  महासंघाचे कापूस खरेदी सुरू केलेले केंद्र संख्या – 71  तालुके – 89 केंद्र-190 फॅक्टरीज

*सीसीआयचे कापूस खरेदी नियोजीत केंद्र संख्या -73 तालुके -83 केंद्र

*महासंघाची हमी दराची कापूस खरेदी क्विंटल दि. 20  जुलै. 2020  पर्यत 90.61 लाख  क्विंटल.

*सीसीआयची हमी दराने कापूस खरेदी क्विंटल दि. 14 जुलै 2020 127.46 लाख क्विंटल.

राज्यातील पिक पेरा नुसार साधारणतः होणाऱ्या कापूस उत्पादनाची व खरेदी केलेल्या कापसाची माहिती खालील प्रमाणे

1) राज्यात हंगाम 19-20 करिता  कापूस पीक-पेरा खालील क्षेत्र-44.30 लाख हेक्टर

2) अपेक्षित कापूस उत्पादक – 407  लाख क्विंटल

3) दि. 21 जुन 2020  पर्यत खरेदी करण्यात आलेला कापूस

सीसीआय एकूण 127.79 लाख क्विंटल.

कापूस पणन महासंघ 91.70 लाख क्विंटल

अशी दिनांक 24 जुलै 2020  पर्यत एकूण  219.49 लाख क्विंटल एवढी विक्रमी खरेदी केली आहे.

****

जगदगुरु वीर सिंहासनाधीश्वर श्री.श्री.श्री.1008वीरसोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी श्रावणमास तपोनुष्ठाण रंभापुरी पीठ येथे प्रारंभ

जगदगुरु वीर सिंहासनाधीश्वर श्री.श्री.श्री.1008वीरसोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी श्रावणमास तपोनुष्ठाण रंभापुरी पीठ येथे प्रारंभ 

रंभापुरी / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

कर्नाटक राज्यातील चिकमंगलूरु जिल्ह्यातील बेलेहुन्नूर स्थित रंभापुरी पिठ येथे जगदगुरु
विरसिंहासनाधीश्वर श्री.श्री.श्री.1008 वीरसोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी व गुरु श्री. 108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांचे श्रावणमास तपोनुष्ठान दिनांक 21 जुलै 2020 मंगळवार पासून प्रारंभ झाले याप्रसंगी 24 जुलै 2020 रंभापुरी पिठ पुर्वीचे जगदगुरु लिं.श्री.श्री.श्री.1008 शिवानंद शिवाचार्य महास्वामीजी यांची पुण्यतिथी उत्सव तसेच दररोज महापूजा रुद्राभिषेक "सकल मानव कल्याण" तसेच "कोरोना महामारी" दूर करण्यासाठी अखंड महिनाभर दिनचर्या चालू राहणार असून. याप्रसंगी कर्नाटक राज्यातील अनेक शिवाचार्य श्रावण मासात दररोज एक -दोन शिवाचार्य भेट व दर्शनाला येतात तसेच रंभापुरी पिठ येथे असलेले श्री विरभद्र मंदिर, श्री रेणुकाचार्य मंदिर, श्री गणपती मंदिर व श्री मारुती मंदिर येथेही पूजा-अर्चना व आरती प्रसाद होतो.असा दिनक्रम असून.जगदगुरु विरसिंहासनाधीश्वर श्री.श्री. श्री.1008 वीरसोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मते आपल्यातील अनेक विकार, लोभ, असूया व वाईट विचार इत्यादी राक्षसे "भ्रम" रूपात वावरतात तो भ्रमच आपणास ईश्वरा जवळ जाण्यापासून रोखतो.सदगुरुला महास्वामीजी म्हणतात या भ्रमाला दूर हाकलून देण्यासाठी सदगुरु च्या पायाशी शरण आलो तसेच तमाम विरशैव लिंगायत सदभक्तानी ही श्री गुरुंना शरण येऊन आपल्या मनातील "भ्रम" दूर करावा असे सुचवतात.

याप्रसंगी गुरु श्री 108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर जगदगुरु यांच्या सानिध्यात श्रावणमास तपोनुष्ठानास कर्णाटक रंभापुरी पिठ येथे सुरुवात केली असली तरीही 
सोनपेठ येथिल  आद्यगुरु संजीवन समाधीस्थित श्री.नंदिकेश्वर शिवाचार्य यांचे दररोज रुद्राभिषेक महिनाभर शिष्य व शिवभक्त परिवार जसे मेहत्रे, चिमनगुंडे व स्वामी अशा पद्धतीने निरंतर ओमप्रकाश स्वामी हे करत आहेत.म्हणुन माझे शरीर जरी तिकडे असले तरी इकडे सर्व मन गुंतून पडलेले आहे असे सांगितले.

संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

Saturday, July 25, 2020

कारगिल विजय दिवसा निमित्त डिघोळ येथील शहीद स्व.छोटुलाल दुबे यांना नमन व आदरांजली

कारगिल विजय दिवसा निमित्त डिघोळ येथील शहीद स्व.छोटुलाल दुबे यांना नमन व आदरांजली

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ येथिल माजी जिल्हा परीषद अध्यक्ष तथा सभापती राजेशदादा विटेकर गट विकास आधिकारी सचिन खुडे यांनी दि.26 जुलै 2020 रविवार रोजी कारगिल विजय दिवसा निमित्तडिघोळ ईस्लामपुर येथिल शहीद स्व.छोटुलाल दुबे यांच्या समाधीस्थळी नमन करुन आदरांजली वाहीली.
संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणी मंत्रिगटाची स्थापना करण्यात यावी - महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमची मागणी

सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणी मंत्रिगटाची स्थापना करण्यात यावी - महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमची मागणी  
      
नागपूर / परभणी / सोनपेठ (दर्शन) : -

महाराष्ट्रातील अनुसूचित जाती-जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भातील याचिकेची येत्या 21 ऑगस्ट 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एका मंत्रिगटाची स्थापना करावी, अशी मागणी महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमतर्फे फोरमचे संस्थापक अध्यक्ष तथा निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड.  खोब्रागडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.   
         मागासवर्गीयांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी मंत्रिगटाची आवश्यकता आहे. या मंत्री गटात मागासवर्गीय समाज घटकातील मंत्री तसेच अभ्यासू सचिव यांचा समावेश करण्यात यावा. सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणीपूर्वी मंत्रिगटाच्या शिफारशीनुसार सरकारने सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे सामाजिक न्यायासाठी बाजू मांडणे आवश्यक आहे. यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,  ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे,शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, इतर मागासवर्गीय कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड , आदिवासी विकास मंत्री पाडवी आदींनाही पाठविण्यात आले आहे.                                              
           मागासवर्गीयांच्या प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमच्या पदाधिकाऱ्यांसोबत 15 मार्च 2020 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत  सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे झालेल्या बैठकीतही हा विषय चर्चेला आणला गेला होता. मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देणे ही घटनात्मक हक्काची बाब आहे, ती मिळवून देणे ही सरकारची जबाबदारी आहे, असेही यावेळी सांगण्यात आले होते. याविषयीची 21 ऑगस्ट 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने संपूर्ण  तयारीनिशी वरिष्ठ वकिलाची नियुक्ती करुन बाजू मांडावी आणि मागासवर्गीयांना संविधानात्मक अधिकार मिळवून द्यावेत, अशी विनंतीही या निवेदनात करण्यात आली आहे.                  
सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा या आधारावर महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्याविरुद्धचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. हे आरक्षण टिकले पाहिजे यासाठी महाराष्ट्र सरकार सर्व प्रयत्न करीत आहे, ते करावे. मात्र अनुसूचित जाती-जमातीचे संविधानात्मक आरक्षण कायम करण्यासाठी सुरुवातीपासूनच उदासीनता दिसून येते. पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळणे हा संविधानात्मक हक्क आहे तो मिळालाच पाहिजे. यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे, ही सरकारची जबाबदारी आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणात यश प्राप्त करणे हे सरकारचे सामाजिक न्यायाचे मोठे कार्य ठरेल. महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमात सामाजिक न्याय हा मुद्दा आहेच. याचा विसर पडू देऊ नये.  15 मार्च 2020 च्या बैठकीतील हे मुद्दे सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात येत आहेत, असेही या निवेदनात म्हटले आहे. 
 
 संपादक किरण रमेश स्वामी                सा.सोनपेठ दर्शन बातमी व                      जाहीरातीसाठि संपर्क                               मो.9823547752.