शेतकऱ्यांचा cci मार्फत कापुस खरेदीची एका शेतकरी वर्गातील मुलगा श्यामसुंदर काथवटे यांची मा.मुख्यमंत्री यांना मेल करुन मागणी
प्रती,
मा.ना.उद्धवजी ठाकरे साहेब
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य,मंत्रालय,मुंबई
विषय:-महाराष्ट्रातील 50 टक्के शेतकऱ्यांचा कापूस हा घरातच पडून असून तो cci मार्फत घेणे बाबत.
आदरणीय महोदय,
वरिल विषयास अनुसरून आपणास विनंती पूर्वक कळविण्यात येते की, महाराष्ट्रातील ५० टक्के शेतक-यांचा कापूस हे पीक घरातच पडलेला असून तो शेतक-यांनी विकला नसल्यामुळे परत कोरोना या संसर्ग जन्य रोगाचा वाढता प्रभाव पाहून शासनाकडून ३० एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन चा कालावधी वाढविण्यात आल्यामुळे कापसाच नेमक काय होणार? या विवंचनेत शेतकरी असून,शासन किंवा खाजगी व्यापारी यापैकी कोणीच सध्या कापूस घेत नसल्यामुळे शेतकरी हा हावालदिल झाला असून,एक तर दुष्काळ,नापिकी,अतिवृष्टी ने त्रस्त असलेल्या शेतकऱ्याने कसा तरी पिकवलेल्या कापूस घरातच पडून राहतो की काय ?या विवंचनेत शेतकरी असून मी एक शेतकरी या नात्याने माया -बाप शासनास विनंती करतो कि आमच्या कापसाला योग्य भाव देउन तो cci मार्फत लवकरात लवकर घेण्याचा शासनाने निर्णय घ्यावा व शेतकरी बांधवांना आधार व न्याय द्यावा हि नम्र विनंती.
माहितीस्तव सविनय सादर -
१)मा.ना.अजितदादा पवार साहेब,उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,मंत्रालय,मुंबई
२)मा.ना.बाळासाहेब पाटील साहेब,सहकारमंत्री,महाराष्ट्र राज्य,मंत्रालय,मुंबई
आपल्या न्यायाच्या प्रतीक्षेत
🙏एक शेतकरी वर्गातील मुलगा🙏
श्यामसुंदर वैजनाथ काथवटे
मु.पो. डीघोळ इस्लापुर ता. सोनपेठ जि. परभणी
No comments:
Post a Comment