Monday, April 6, 2020

दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमास उपस्थित नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी - जिल्हाधिकारी

दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमास उपस्थित नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी - जिल्हाधिकारी
                                


परभणी / सोनपेठ (दर्शन) : -  

जिल्ह्यातील जे नागरिक मशीद निजामुद्दीन दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमास उपस्थित होते किंवा येथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या संपर्कात आले असतील. अशा सर्व नागरिकांनी स्वतः संपर्क साधून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी व तपासणी अंती देण्यात आलेल्या सल्ल्याचे कटाक्षाने पालन करावे. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दि.म. मुगळीकर यांनी केले आहे.

         निजामुद्दीन दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमास राज्यातील विविध भागातून नागरिकांनी हजेरी लावली असून या घटनेनंतर मशीद निजामुद्दीन दिल्ली येथील मरकजमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. तरी संबंधितांनी जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी  दु. 02452 - 223458,  जिल्हा सामान्य रुग्णालय संपर्क प्रमुख आशिष आहेर मो. 9689997113 यांच्याशी स्वतः संपर्क साधून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी. 
          जे नागरिक स्वतःहून तपासणी करणार नाहीत किंवा जिल्ह्यातील जे नागरिक मरकज मशीद निजामुद्दीन दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमास उपस्थितीत असलेल्या नागरिकांच्या किंवा कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्णांच्या संपर्कात आले असल्याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनास देणार नाहीत, अशा नागरिकांवर दंडनीय कार्यवाही करण्यात येईल. असेही जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
                               -*-*-*-*-

No comments:

Post a Comment