Tuesday, April 14, 2020

कै.र.व.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून कोव्हिड 19 प्रतिबंधक जनजागृती "Stay home stay safe" चा संदेश

कै.र.व.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून कोव्हिड 19 प्रतिबंधक जनजागृती "Stay home stay safe" चा संदेश 


 सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ येथील कै.र. व.महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांनी सामाजिक जनजागृतीचा उपक्रम राबवला.घरात बसून आपले मित्र, नातेवाईक व परिचयातील लोकांना घरात रहाण्याचा सल्ला सोशल मिडियावरून दिला. संपूर्ण जगात कोव्हिड 19 कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मानवी जीवन धोक्यात येत आहे. भारतात या विषाणू च्या फैलावावर प्रतिबंध घालण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले आहे. सोनपेठ शहरातील कै.र.व.महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.सुनिता टेंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील 36 विद्यार्थ्यांनी व्हाट्सअप द्वारे आपल्या मित्र आणि नातेवाईकांना "Stay home stay safe" चा संदेश देऊन प्रत्येकाने घरात सुरक्षित राहून प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती करत या उपक्रमा द्वारे सामाजिक बांधिलकी जपली आहे.या उपक्रमाचे सर्व स्तरातुन कौतुक होताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment