Wednesday, April 15, 2020

बांधकामगारांना आर्थिक मदत करण्यास शासन विचाराधिन - रोहण रुमाले

बांधकामगारांना आर्थिक मदत करण्यास शासन विचाराधिन - रोहण रुमाले


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

दि.१५:   शासनाने कोरोना कोव्हीड १९ या आजारामुळे देशात  लॉगडाऊन  करुन संचारबंदि लावली आहे तसेच  बांधकामगारांवर  उपासामारीची वेळ येऊ नये म्हणुन  महाराष्ट्र  ईमारत व ईतर बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने अर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाच्या विचारधीन आहे ,परंतु आम्हास तक्रारी मिळत आहे की, काहि एजंट घरोघरी जाऊन  कामगाराना सागत आहे की तुमचे पैसे येणार असुन तुम्ही ५०० रु. आम्हाला द्या व तुमचे कागदपत्रे द्या  आसे बाता मारुन ठगत आहे असे कोणी कामगारास ठगत असेल तर त्याची तक्रार आपल्या जवळील पोलीस ठाणे येथे बांधकामगारांनी  करावी सध्या देशात ३ मे पर्यत लॉगडाऊन वाढविण्यात आल्याने कामगारांना  पैशे कसे द्यायचे हे ठरविण्यात आलेले नाहि शक्यतो सगळ्या बांधकाम कामगाराच्या खात्यात महामंडळाच्या वतीने थेट पैसे टाकले जाऊ शकतात यामुळे बांधकाम कामगारांनी कोणाच्याही भुलथापाना बळी पडु नये व सेल्फ डिस्टनस चे तंतोतंत पालन करुन कोठेही गर्दी करुनये व आरोग्य प्रशासनास व पोलीस प्रशासनास सहकार्य 
करावे असे आवाहान रोहण रुमाले जिल्हा कामगार अधिकारी परभणी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment