खडका ग्राम पंचायती कडून संपूर्ण गावात जंतू नाशकाची फवारणी ; सोशल डीस्टन्सिंग ठेवावे व नागरिकांनी स्वच्छता राखावी
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यातिल मौजे खडका येथे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण गावात ग्राम पंचायत तर्फे जंतू नाशक औषध फवारणी करण्यात आली.
महाराष्ट्रात झपाट्याने पसरत असलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेसह सर्व विभाग देखील अलर्ट झाले असून सर्वत्र उपाययोजना राबविल्या जात आहेत. खडका येथील ग्राम पंचायातीनेही पुढाकार घेऊन खबरदारीसाठी दि.२१ एप्रिल २०२० मंगळवार रोजीही पुन्हा एकदा गावातील प्रत्येक गल्ली व रस्त्यावर जंतू नाशक औषध फवारणी केली. तसेच स्वच्छता राखावी असे आवाहन प्रशासना च्या आदेशा नुसार दुधविक्री, किराणा साहित्य व भाजीपाला विक्री ठराविक वेळेत चालू आहे परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, बाहेर पडल्यानंतर सोशल डीस्टन्सिंग ठेवावे व यासह नागरिकांनी स्वच्छता राखावी असे आवाहन शिवाजीराव मव्हाळे, रामप्रसाद यादव, पोलीस पाटील वैजनाथ यादव, सलीम पठाण यांनी सर्व ग्रामस्थांना केले आहे.


No comments:
Post a Comment