Thursday, April 30, 2020

कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या सहवासातील 51 संशयितांचे स्वॅब घेतले

कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या सहवासातील 51 संशयितांचे स्वॅब घेतले


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 
जिल्हयातील सेलु शहरातील राज मोहल्ला येथील रहिवाशी असलेली ५५ वर्षीय महिला दुर्धर आजारावरील उपचारासाठी औरंगाबाद येथे मागील काही दिवसापासुन दाखल होती.ही  महिला दि.२७ एप्रिल २०२० रोजी सकाळी ४.३० वाजता खाजगी वाहनाने सेलू येथे परत आली होती. त्यानंतर दि.२८ एप्रिल २०२० रोजी ही महिला रुग्ण सेलु येथुन परभणी येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेवुन दुर्धर रोगाच्या उपचारासाठी नांदेड येथे गेली होती. नांदेड येथील वैद्यकीय पथकाने महिलेचे स्वॅब घेतले असता परिक्षणाअंती कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आली असुन सदर महिला रुग्णावर नांदेड येथे औषधोपचार चालू आहेत. संबधित रुग्णाच्या सहवासातील सेलू येथील २७ व परभणी खाजगी रुग्णालयातील २४ असे एकुण ५१ संशयितांचे स्वॅब घेण्यात येऊन त्यांना उपजिल्हा रुग्णालय सेलु व जिल्हा रुग्णालय परभणी येथे दाखल करुन घेण्यात आले आहे.अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
           राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्हयाचे पालकमंत्री श्री.नवाब मलिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू (कोव्हिड १९) संदर्भात आढावा बैठक घेवुन संबंधितांना योग्य त्या सूचना केल्या व कोरोना विषाणूचा पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले.  
            गुरुवार दि. ३० एप्रिल २०२० रोजी सांयकाळी ५ वाजेपर्यंत कोरोना विषाणु संदर्भात सायंकाळी ५ वाजेपर्यंत परभणी येथील जिल्हा रुग्णालयात पूर्वीचे ७३२ व आज रोजी दाखल झालेले  ७१ असे एकुण ८०३ संशयितांची नोंद झाली आहे. तर परभणी जिल्हयात आज रोजी कोव्हिड- १९ विषाणु बाधित एकही रुग्ण नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. असेही जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
           -*-*-*-*-

No comments:

Post a Comment