सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यातील तसेच शहरातील तमाम जनतेस साप्ताहिक सोनपेठ दर्शन च्या माध्यमातून दि.18 एप्रिल २०२० शनिवार रोजी कोरोना विषाणू या संसर्गजन्य आजाराच्या धर्तीवर संचारबंदी लागू केलेली आहे. त्या संचार बंदी च्या नियमाचे कोणीही उल्लंघन करू नये ,आपल्याला अत्यावश्यक वस्तू खरेदी साठी निर्धारित वेळ सकाळी 7 ते 11 ठरवून दिलेली आहे त्यावेळेला देखील प्रत्येकाने आपल्या नाका तोंडाला मास्क अथवा रुमाल व्यवस्थित बांधून घराच्या बाहेर निघायचं आहे तसेच लहान मुलांना शक्यतो बाहेर आणायचं टाळायचं आहे. सर्व व्यापारी बांधव अत्यावश्यक सेवेत सेवा देणारे किराणा, मेडिकल, डॉक्टर्स व बँक आदीसह सर्वांनी शासनाने सूचित केलेल्या सामाजिक अंतर ठेवून सेवा द्यावयाची आहे.त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील जनतेने घरी गेल्यावर वारंवार हात साबणेने अथवा इतर हात धुण्याच्या पावडर अथवा लिक्विड ने सतत धूत राहण्याच्या ही सूचना शहरातील प्रत्येक चौकामध्ये पोलीस जीपच्या ध्वनीपेक्षक व्दारे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment