Monday, April 27, 2020

त्या युवकाचा तिसरा स्वॅब निगेटीव्ह, परभणी जिल्हा कोरोनामुक्त तरी सोशल डिस्टसिंगचे पालन तंतोतत करावे - जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर


त्या युवकाचा तिसरा स्वॅब निगेटीव्ह, परभणी जिल्हा कोरोनामुक्त तरी सोशल डिस्टसिंगचे पालन तंतोतत करावे - जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर 


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

जिल्ह्यातील एकमेव कोरोनाग्रस्त युवकाचा तिसरा स्वॅब अहवाल ही निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे परभणी जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे असेच म्हणावे लागेल. या युवकांचा स्वॅब अहवाल सोमवारी (ता.27) सकाळी जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला आहे.परभणी जिल्ह्यात ता. 13 एप्रिल रोजी हिंगोली जिल्ह्यातून परभणीत पाहूणा म्हणून आलेल्या एका 21 वर्षीय तरूणाला कोरोनाची लागण झाल्याचे त्याच्या तपासणी अहवालात नमुद केले होते. त्यामुळे या युवकाला परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु होते. तो त्याच्या 5 नातेवाईकांसह इतर 9 जणांच्या संपर्कात आला होता. त्या सर्वांना कॉरन्टाईन करण्यात आले होते. त्या सर्वांचे दोन अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तरूणांचा शनिवारी दुसरा स्वॅब अहवाल घेतला होता.तो देखील निगेटीव्ह आला होता. त्यानंतर 24 तासात दुसरा स्वॅब घेवून तो तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल सोमवारी सकाळी प्राप्त झाला आहे. हा अहवाल निगेटीव्ह आला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. तरी लोकांनी सोशल डिस्टसिंगचे पालन करावे जरी परभणी जिल्हा कोरोना मुक्त झाला असला तरी लोकांनी काळजी घ्यावी.सोशल डिस्टसिंगचे पालन तंतोतत करावे असे अवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment