Friday, April 10, 2020

सोनपेठ येथे आ.सुरेश वरपुडकर यांच्यातर्फे जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वाटप

सोनपेठ येथे आ.सुरेश वरपुडकर यांच्यातर्फे जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वाटप


सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ येथे दि.10 एप्रिल 2020 शुक्रवार रोजी कोविड 19 व लॉकडाउन मुळे शहर व तालुक्यातील गरजवंत व निराधार लोकांना 1000 जीवनावश्यक वस्तू च्या किट वाटपाची सुरुवात पाथरी मतदारसंघाचे आ.सुरेश वरपुडकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपनगराध्यक्ष दत्ताराव कदम, सहाय्यक निबंधक पी.एस.राठोड, नायब तहसीलदार साहेबराव घोडके, मुख्याधिकारी सौ.सोनमताई देशमुख, गटविकास अधिकारी सचिन खुडे, तालुका आरोग्य अधिकारी डाँ. सुभाष पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.डॉ. मुंजाभाऊ धोंडगे, राजकुमार आंबुरे, शुभम कदम,  प्रभाकर शिरसाट, गौस कुरेशी आदिसह प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संखेने हजर होते यावेळी शहर व तालुक्यातील गरजूंना सामाजिक अंतर ठेवून जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.तसेच हातावर पोट असणाऱ्या शेकडो व्यक्तींना दररोज काँग्रेस पदाधीकारी टिम वर्क द्वारे डब्बा घरपोहच करत आहेत.

No comments:

Post a Comment