सोनपेठ कृषि उत्पन्न बाजार समिती तर्फे गरजवंतांना राजेश विटेकर यांच्या हस्ते किराणा किटचे वितरण
सोनपेठ (दर्शन) :-
भारत देशातच नाही तर महाराष्ट्रात या कोरोना विषाणू पासुन रक्षण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार यथायोग्य उपाय योजना करत आसताना सोनपेठ कृषि उत्पन्न बाजार समिती तर्फे गरजवंत व परराज्यातीन शहरात राहुटि घालुन वास्तव्य करुण हातावर पोट असनार्या या लोकांना मा.जि.प.अध्यक्ष तथा सभापती राजेश विटेकर यांच्या हस्ते दि.3 एप्रिल 2020 शुक्रवार रोजी किराणा किटचे वितरण करण्यात आले.याप्रसंगी राजेश विटेकर यांनी तमाम जनतेला आवाहन केले कि शासनाच्या तसेच प्रशासनाच्या सुचनांणचे पालन करा व अति आवश्यक गरजेसाठीच बाहेर पडा स्वताः ची तसेच आपल्या परीवाराची काळजी घ्या.यावेळी सचिव घोबाळे साहेब व संचालक अमर वडकर, दिलीप सातभाई, माजी सरपंच शिवाजी भोसले,नगरसेवक डाँ.श्रीनीवास गुळभीले, सुनिल बर्वे तसेच कृषि उत्पन्न बाजार समितीचे सर्व कर्मचारी वृध्द उपस्थित होते.
No comments:
Post a Comment