Thursday, April 16, 2020

ह.भ.प.रंगनाथ गुरूजी अन्नछत्रास टास्क फोर्ससह मा.तहसीलदार डाँ.आशिषकुमार बिरादार यांची भेट

ह.भ.प.रंगनाथ गुरूजी अन्नछत्रास टास्क फोर्ससह मा.तहसीलदार डाँ.आशिषकुमार बिरादार यांची भेट






सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरात कोरोना विषाणू पासुन बचावा साठि केंद्र व राज्य शासन यांनी प्रमुख उपाय योजनेच्या धर्तीवर लाँकडाउन पुकारला यामध्ये अनेक शेतकरी, कामगार, हातावर पोट असनारे बारा बलुतेदारांच्या पोटाचा यक्ष प्रश्न समोर उभा राहीलेला पाहुन आर्य वैश्य बांधवांच्या पुढाकाराने मागील दहा ते पथरा दिवसापासून सतत चालू असलेल्या ह.भ.प.रंगनाथ गुरूजी अन्नछत्रास दि. 16 एप्रिल 2020 गुरुवार रोजी दुपारी 1 वाजता
टास्क फोर्स सह मा.तहसीलदार डाँ.आशिषकुमार बिरादार यांनी सदीच्छा भेट घेऊन आयोजकांच्या आग्रहा खातर आन्नछत्रातील मेनुंचा सामाजीक अंतर राखुन आस्वाद घेतला, याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डाँ.सुभाष पवार, गट विकास अधिकारी सचिन खुडे, मुख्याधिकारी सौ.सोनमताई देशमुख आदि प्रमुखासह टास्क फोर्स सदस्य उपस्थीत होते.
 मा.तहसीलदार डाँ.आशिषकुमार बिरादार यांनी शासनाच्या वतिने आयोजकांचे आभार व्यक्त करुन अशीच सेवा घडत राहो अशी सदीच्छा व्यक्त केली.यावेळी आयोजक नागनाथ सातभाई अध्यक्ष
आर्य वैश्य समाज सोनपेठ, मा.सभापती शाम पांपटवार, किरण चौलवार, दिलीप सातभाई, मा.उपनगराध्यक्ष श्रीराम वांकर, ज्ञानेश्वर डमढरे, विलास पांपटवार, विष्णु डमढरे, बालाजी वांकर, अनील कवटीकवार, प्रशांत पांपटवार, जितेन्द्र वांकर, केदार वलसेटवार, आनंद डाके, रामेश्वर लोहगावकर, नंदकुमार कोटलवार, नागेश शेटे,डॉ.बालाजी पारसेवार, संजय वलसेटवार, विनोद चिमनगुंडे, शिवप्रसाद तापडीया आदिंनी सा.सोनपेठ दर्शन प्रतिनिधी जवळ ह.भ.प.रंगनाथ गुरूजी अन्नछत्रातुन लॉकडाऊन संपे र्पयंन्त 350 गरजवंत व्यक्तींना दररोज दुपारी आर्य वैश्य समाज बांधवांच्या हस्ते घरपोहच जेवन डबा पोंहंच करण्यात येणार असल्याचा मानस व्यक्त केला.



No comments:

Post a Comment