परभणीतील त्या एकमेव कोरोनामुक्त युवकास डिस्चार्ज ; 674 पैकी 623 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असणा-या त्या युवकाचा तिसरा स्वॅब निगेटीव्ह आल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाने त्याला मंंगळवारी(दि.28) सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोना विषाणु संदर्भात 716 संशयितांची नोंद झाली. 674 पैकी 623 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. 32 स्वॅब अहवाल प्रलंबित नाही. आजपर्यंत 18 जणांचे स्वॅब एनआयव्ही (राष्ट्रीय विषाणू संस्था) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद यांनी तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे. मंगळवारी नव्याने 31 संशयित जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे अधीचे 685 व आजचे 31 असे एकूण 716 पर्यंत संशयितांची नोंद झाली असून विलगिकरण कक्षात 277, रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात 41 जण आहेत. विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झालेले 398 जण आहेत. 62 जण परदेशातून आलेले असून त्यांच्या संपर्कात आलेले 6 जण आहेत. दरम्यान, जिल्ह्यात मंगळवारी (दि.28) सायंकाळी पाच वाजेपर्यंत विषाणु बाधित एकही रुग्ण नसल्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी जाहीर केले.
No comments:
Post a Comment