Monday, April 13, 2020

डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

सोनपेठ (दर्शन) :-
 
ज्ञानाचा अथांग सागर,जन-सामान्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार गोरगरीबांना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून अहोरात्र संघर्ष करत जन्मदाते होण्याची भूमिका निभावणारे, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, महामानव, डॉ.बाबासाहेब(भीमराव रामजी) आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कै.राजकुमार मव्हाळे प्रतिष्ठानच्या निवासी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.यावेळी भाजपाचे जिल्हा चिटणीस शिवाजीराव मव्हाळे,पोलीस पाटील वैजनाथ यादव,ग्रा.प.सदस्य वैजनाथ राठोड,ग्रामरोजगारसेवक अशोक यादव,बाळासाहेब(राजकुमार)मव्हाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आज दि.१४ एप्रिल २०२० मंगळवार रोजी भिमगड सोनपेठ येथे पंचशिल ध्वजारोहनाचा मान संपादक किरण स्वामी व जय भवानी मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष बळीराम काटे यांना दिला जयंती कमिटीचे अध्यक्ष उत्तमराव भाग्यवंत , मारोती रंजवे, बबन तिरमले, उत्तम मुंडे, डिंगाबर भालेराव आदिंनी पुर्णाकृती पुतळ्यास मेनबत्ती व अगरबंती पेटऊन पुष्पहार व पुष्प अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.

जिल्हा परीषद केंद्रीय कन्या शाळेत माजी अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड शिवाजी कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक प्रदिप गायकवाड उपस्थित होते. 



No comments:

Post a Comment