Thursday, April 2, 2020

लॉकडाऊन मध्ये परभणी जिल्ह्यात वक्रांगी केंद्र देत आहेत अत्यावश्यक सेवा ; वक्रांगी बँकिंग सेवेचे अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांच्या कडून कौतुक

लॉकडाऊन मध्ये परभणी जिल्ह्यात वक्रांगी केंद्र देत आहेत अत्यावश्यक सेवा ; वक्रांगी बँकिंग सेवेचे अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांच्या कडून कौतुक 


सोनपेठ (दर्शन) :-

भारत देशामध्ये कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी 21 दिवसाचं लॉक डाऊन लागू करण्यात आले असून कलम 144 लागू करण्यात आली आहे. अश्या अपातकालीन परिस्तिथी मध्ये ग्राहकांना वक्रांगी लिमिटेड ही कंपनी आपल्या वक्रांगी केंद्रा द्वारे ए. टी.एम., बँकिंग, पैसे पाठवणे काढणे ,ऑनलाईन मेडीसिन, ग्रोसरी या अत्यावश्यक असणाऱ्या सुविधा पुरवत आहे. सोनपेठ तालुक्यात *वाणीसंगम, शेळगाव, नरवाडी, नैकोटा, उक्कडगाव आणि सोनपेठ शहर* या ठिकाणी 6 आणि पूर्ण परभणी जिल्ह्यात असे 84 वक्रांगी केंद्र आहेत जे ग्राहकांना *सोशल डिस्टन्स आणि sanitizers* ची काळजी घेत सुविधा देत आहेत. महत्वाचे म्हणजे या केंद्रामुळे निराधार,विद्यार्थी,महिलांची मोठी सोय झाली आहे. सध्या ह्या लॉकडाउनच्या काळात या केंद्राचे महत्व अधिरेखीत झाले आहे बँकांना वेळेचे बंधन असल्याने ग्राहकांना येण्यास अडचणी ,गर्दी टाळणे या मुळे ही सेवा महत्वाची ठरत आहे.
बँकेतील गर्दी ही कमी होत आहे आणि ग्राहकांना बँके पर्यंत प्रवास ही करायची गरज पडत नाही. याचा फायदा हजारो लोकांना होत आहे. या मुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठी मदत होत आहे. देश सध्या कोरोनाशी लढा देत आहे. या पार्श्वभूमीवर वक्रांगी बँकिंग सेवाही कोरोनाशी लढा देत आहे.
या ठिकणी बँक मित्र असणारे यांचे ही केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी कौतुक केले आहे. पीक विमा,जीवन विमा,असो स्वच्छता बँकिंग सेवा याचा वक्रांगी देशात डंका वाजवत आहे.

No comments:

Post a Comment