Sunday, April 19, 2020

पॉझिटीव्ह आलेल्या 8 रुग्णांचे 14 दिवसा नंतरच्या पुन: तपासणीचे अहवाल निगेटिव्ह ; हे 8 रुग्ण 18 ते 67 वर्ष वयोगटातील, त्यातील 57 वर्ष वय असलेल्या रुग्णांस मधुमेह हा आजार होता (जिल्ह्यात आजपर्यंत एकुण 6108 व्यक्तींची तपासणी)

पॉझिटीव्ह  आलेल्या 8 रुग्णांचे 14 दिवसा नंतरच्या पुन: तपासणीचे अहवाल निगेटिव्ह ; हे 8 रुग्ण 18 ते 67 वर्ष वयोगटातील, त्यातील 57 वर्ष वय असलेल्या रुग्णांस मधुमेह हा आजार होता
(जिल्ह्यात आजपर्यंत एकुण 6108 व्यक्तींची तपासणी)


लातूर / परभणी / सोनपेठ (दर्शन)  :-

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 19 एप्रिल 2020 रोजी सकाळी 8.00 ते दु 12.00 पर्यंत कोरोना (कोविड-19) बाहयरुग्ण विभागात एकुण 14 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असुन आजपर्यंत एकुण 6108 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एकुण 196 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 181 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आलेले असुन यापूर्वीच दिनांक 04 एप्रिल 2020 रोजी 8 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले होते. पॉझिटीव्ह आलेल्या 8 रुग्णांची 14 दिवसानंतर पुन: तपासणी करण्यात आली होती.
 त्या सर्व 8 रुग्णांचे अहवाल दिनांक 18 एप्रिल 2020 रोजी रात्री उशिरापर्यंत प्राप्त झाले.  त्या सर्व 8 रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले. हे 8 रुग्ण 18 ते 67 वर्ष वयोगटातील होते. त्यातील 57 वर्ष वय असलेल्या रुग्णांस मधुमेह हा आजार होता. आता सर्व रुग्णांची प्रकृती ठणठणीत असुन त्यांना या रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असुन Institutional Quarantine मध्ये निलंगा येथे ठेवण्यात आले आहे. एकुण 7 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहे. 
आजपर्यंत 98 व्यक्तींचा Home Quarantine  कालावधी समाप्त झाला असुन एकुण 67 व्यक्तींना जिल्हा आरोग्य विभागामार्फत Home Quarantine मध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. तसेच 24 व्यक्तींना Institutional Quarantine मध्ये ठेवण्यात आले आहे व 07 व्यक्तींना या संस्थेच्या विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे, अशी माहिती  कोरोना विलगीकरण कक्ष प्रमुख तथा  औषधवैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मारुती कराळे यांनी दिली. 
 कोरोना (कोविड-19)  या संशयित / बाधित व्यक्तींवर उपचार करणारे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व परिचर्या कर्मचारी, सर्व पॅरामेडीकल कर्मचारी, सर्व प्रशासकीय अधिकारी / कर्मचारी, सर्व सफाई कामगार, कक्षसेवक, सुरक्षा कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांनी केलेल्या कामाचे कौतुक करुन सर्वांचे आभार मानुन यापुढेही असेच उत्कृष्टपणे कर्तव्य व जबाबदा़-या पार पाडावे असे आवाहान डॉ. गिरीष ठाकुर अधिष्ठाता,  डॉ. मंगेश सेलुकर उप अधिष्ठाता, डॉ. उमेश लाड उप अधिष्ठता, डॉ. संतोषकुमार डोपे वैद्यकीय अधिक्षक, डॉ. निलिमा देशपांडे विभागप्रमुख औषधवैद्यकशास्त्र, डॉ. मारुती कराळे कोरोना विलगीकरण कक्ष प्रमुख विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातुर यांनी केले आहे.
****

No comments:

Post a Comment