Saturday, April 25, 2020

परभणीकरांना दिलासा ! पॉझिटिव्ह रुग्णाचा दुसरा स्वॅब अहवाल आला निगेटिव्ह ; पुन्हा ग्रीन झोनच्या आशा पल्लवीत (परभणी त्रीमुर्तीचे सर्वस्तरातुन अभिनंदन)

परभणीकरांना दिलासा ! पॉझिटिव्ह रुग्णाचा दुसरा स्वॅब अहवाल आला निगेटिव्ह ; पुन्हा ग्रीन झोनच्या आशा पल्लवीत
(परभणी त्रीमुर्तीचे सर्वस्तरातुन अभिनंदन)




परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णाचा दुसरा स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला आहे़ आता २४ तासानंतर रविवारी तिसरा स्वॅब या तरुणाचा घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली़

हिंगोली जिल्ह्यातील एक तरुण १३ एप्रिल रोजी पुण्याहून दुचाकीने परभणीतील एमआयडीसी भागात नातेवाईकांकडेआला होता़ या तरुणाची जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी करण्यात आल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता़ त्यामुळे परभणी जिल्ह्यात पहिल्यांदाच या तरुणाच्या निमित्ताने कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले़ त्यानंतर या तरुणाच्या संपर्कात आलेल्या ९ नातेवाईक आणि अन्य १९ अशा २८ जणांचेही स्वॅब घेण्यात आले होते़ या सर्व २८ जणांचे स्वॅब अहवाल दुसऱ्यांदाही निगेटिव्ह आले़ त्यानंतर शनिवारी सायंकाळी कोरोना पॉझिटिव्ह तरुणाच्या स्वॅबचा दुसरा अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला़ त्यामध्ये सदरील स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली़ आता २४ तासानंतर म्हणजेच रविवारी तिसरा स्वॅब या तरुणाचा घेतला जाणार आहे़.या सुनियोजीत कार्यासाठि मा.जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर , मा.शल्य चिकित्सक बाळासाहेब नागरगोजे व पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांचे सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.

💥💥💥💥💥💥💥💥
सा.सोनपेठ दर्शन संपादक किरण रमेश स्वामी तसेच पंचक्रोशितील तमाम जनतेच्या वतीने मा.जिल्हाधिकारी साहेब अभिनंदन आपले तसेच सर्व डाँक्टर्स, नर्स, कम्पाऊडर्स, महसुल कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी व पोलिस प्रशासन.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

No comments:

Post a Comment