Saturday, April 18, 2020

जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांचे आवाहन कंटेंटमेंट झोनमधील नागरिकांनी सर्वेक्षणाला सहकार्य करावे;आजाराची लक्षणे लपवू नये आणि संचारबंदीत घराबाहेर पडू नये (पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुंटूबातील ९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह)

जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांचे आवाहन
कंटेंटमेंट झोनमधील नागरिकांनी सर्वेक्षणाला सहकार्य करावे;आजाराची लक्षणे लपवू नये आणि संचारबंदीत घराबाहेर पडू नये
(पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुंटूबातील ९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह)


परभणी / सोनपेठ (दर्शन)  :- 
परभणी शहरात एक युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने कंटेंटमेंट झोन परिसरातील सर्वेक्षणाचे काम शनिवार दि.18 एप्रिल 2020 रोजी दुसऱ्या दिवशीही सुरु असून नागरिकानी सहकार्य करावे. कुठलीही माहिती व आजाराची लक्षणे लपवु नये तसेच सचांरबदी सुरु असल्यामुळे नागरीकांनी घराबाहेर पडू नये. असे आवाहन जिल्हाधिकारी दी . म . मुगळीकर यांनी केले आहे.
       जिल्ह्यातील एकमेव  पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर असुन तो रुग्ण वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली स्वतंत्र कोरोना कक्षात दाखल आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या निकट सहवासीत कुंटूबातील ९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.   शनिवार दि. १८ एप्रिल २०२० रोजी एकुण २६ संशयितांचा नमुना ( स्वॅब ) तपासणीसाठी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे. आज रोजी एकुण नव्याने दाखल झालेले संशयीत १२, एकुण नोंद झालेले संशयीत ५०८, पैकी विलगीकरण केलेले २३४, हॉस्पीटलमध्ये संसर्गजन्य कक्षात ३३, विलगीकरणाचा कालावधी पुर्ण झालेले २४१, नोंद झालेल्या एकुण ४९६ पैकी परदेशातुन आलेले  ६२, परदेशातुन आलेल्यांच्या सपंर्कातील ६ असे आहेत. तसेच आज रोजी परभणी जिल्ह्यामध्ये एकही नवीन संशयीत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
-*-*-*-*-

No comments:

Post a Comment