Saturday, April 18, 2020

शासनाच्या विविध योजनांचे अनुदान बँकेबरोबरच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेद्वारे वितरीत होणार

शासनाच्या विविध योजनांचे अनुदान बँकेबरोबरच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेद्वारे वितरीत होणार


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांचे अनुदान उचल करण्यासाठी जिल्हयातील सर्वच बँकेत नागरिकांची गर्दी होत असून जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. तरी नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील बँकेबरोबरच पोस्ट ऑफिस व सब पोस्ट ऑफिसमधून विविध योजनांची रक्कम दिली जाईल. असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी दिले आहेत.
            जिल्हयातील सर्व बँकांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण , जन- धन योजनेतील पात्र लाभार्थ्यांची गाव निहाय यादी जिल्हा अग्रणी बँकेकडे तात्काळ सादर करावी व जिल्हा अग्रणी बँकेने ही यादी एकत्र करून पोस्ट ऑफिसकडे जमा करावी. पोस्ट ऑफिसने इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून जनधन लाभार्थी तसेच पी.एम.किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानाची पोस्ट ऑफिस आणि सब ऑफिस मधून रक्कम अदा करावी.  यामध्ये लाभार्थ्यांची रक्कम देण्याची कार्यवाही पोस्ट ऑफिस तसेच नेहमीप्रमाणे बँकेद्वारेही करण्यात येईल. 
         विविध योजनांचे अनुदान वाटपाची कार्यवाही करीत असताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश , सुचना, निर्देश तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश व सुचनांचे भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. या आदेशाची अवज्ञा करणारी कोणतीही व्यक्ती , संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ११ तसेच भारतीय दंडसंहिता १८६० चे कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
                         -*-*-*-*-

No comments:

Post a Comment