भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पढरवाडा निमित्ताने बौद्ध बांधवांना आर्य वैश्य समाजाच्या वतीने महाप्रसादाचे वाटप
सोनपेठ (दर्शन) :-
प.पू.ब्र.भु.श्री संत रंगनाथ महाराज सोनपेठकर यांच्या कृपा आशीर्वादाने सोनपेठ येथील आर्य वैश्य समाजाच्या वतीने कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसांपासून अन्नछत्राचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने दररोज सरकारी कर्मचारी व गोरगरिबांना तब्बल तीनशे ते साडेतीनशे जणांना जेवणाचे वाटप होत आहे.याच अनुषंगाने २० एप्रिल २०२० सोमवार रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पढरवाडा निमित्ताने सोनपेठ शहरातील बौद्ध बांधवांना (भिमगड) येथे आर्य वैश्य समाजाच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.या निमित्त संपुर्ण तालुका प्रशासनाचे मोठे सहकार्या बद्दल आभार व्यक्त करण्यात आले.
No comments:
Post a Comment