सोनपेठ तालुक्यात व शहरात केंद्र सरकारच्या मा.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत मोफत तांदूळाचे वाटप सुरळीत सुरू
सोनपेठ तालुक्यात व शहरात केंद्र सरकारच्या मा.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत मोफत तांदूळाचे वाटप सुरळीत सुरू.
देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी केंद्र सरकारच्या वतीने घोषित केलेल्या मोफत तांदूळाच्या वाटपाचे स्वस्त धान्य दुकानी मोफत तांदूळाचे लाभार्थींना अत्यंत सुरळीत पणे वाटप सुरू असल्याचे निदर्शनास आले.लाभार्थींची उन्हाळ्यात गैऱसोय होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी दुकादारांकडून मंडप ची व्यवस्था करण्यात आली आहे. लाभार्थींना सोशल डिस्टन्सिंग ठेवून मोफत तांदूळाच्या वाटप योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले.याची सुरुवात मौजे रेवा तांडा येथे मोफत तांदुळ वाटप करण्यात आले माजी पंचायत समिती सदस्य उतमराव शिंदे व विजयकुमार चव्हान यांच्या हस्ते करण्यात आली.स्वस्त धान्य दुकानदर तालुका अध्यक्षा सो.विमल मारोती पवार यांनी प्रथम सुरुवात केली.भारतीय जनता पार्टि चे परभणी जिल्हा चिटणीस शिवाजीराव मव्हाळे यांनी सा.सोनपेठ दर्शन प्रतिनिधी जवळ बोलताना हि योजना अन्न सुरक्षा व अंत्योदय योजनेच्या लाभार्थी यांनाच आहे असे सांगितले .



No comments:
Post a Comment