Friday, April 3, 2020

शेतकऱ्यांना ई-पास परवान्यासाठी ई-मेलद्वारे अर्ज करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांना ई-पास परवान्यासाठी ई-मेलद्वारे अर्ज करण्याचे आवाहन


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीने  उत्पादीत केलेला भाजीपाला, फ़ळे व इतर नाशवंत शेतमालाच्या वाहतुकीकरीता परीवहन कार्यालयांमार्फत ई - पास परवाना वितरीत करण्यात येत आहे. तरी शेतकऱ्यांनी ई-मेलद्वारे संबंधितास अर्ज सादर करावेत. असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक  तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एस.बी.आळसे यांनी केले आहे.
           इच्छुक शेतकरी,शेतकरी गट,शेतकरी उत्पादक कंपन्यानी आरसी बुक, वाहन विमा, परमिट, वाहन कर भरलेली पावती, पी . यु . सी . प्रमाणपत्र, वाहन चालकाचा परवाना, वाहतुकीचे कारण, मालाची माहिती माल कोठुन कुठेपर्यंत नेणार आहे त्याची सविस्तर माहिती dyrto.22-mh@gov.in,   /atma. parbhani@gmail.com/ dsaopbn@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठविण्यात यावी. जेणेकरुन संबधितास ई - पास वितरीत करता येईल. तरी ई-पासबाबतच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तंत्र अधिकारी श्री.चव्हाण  मो. ९४२२७५०००४ व प्रकल्प विशेषज्ञ कृषी  श्री.विभूते मो. ९४२२१७७४५८ यांना संपर्क साधावा. असेही प्रकल्प संचालक आत्मा परभणी यांनी कळविले आहे
-*-*-*-*-

No comments:

Post a Comment