आद्य भारतीय समाज सुधारक - महात्मा बसवेश्वर - प्रा.विलास साखरे
आपल्या भारत देशाला रुढी-परंपरा चा जसा पुरातन वारसा प्राप्त झाला आहे, त्याचप्रमाणे धर्म आणि समाज व्यवस्थेमध्ये दोषही आहेत. अशावेळी स्वतःच्या जीवनाचा विचार न करता या पुण्यभूमी ला लाभलेले अनेक महामानव आहेत. त्यांनी आपले संपूर्ण जीवन खर्च करून या पुण्यभूमी ला पुण्य बनवण्यासाठी प्रयत्न केले.
मध्ययुगात बाराव्या शतकामध्ये धर्म व समाजव्यवस्थेमध्ये कर्मकांड, दैववाद, यज्ञ, प्रथा ,स्त्रीदास्य, विषमता स्पृश्य-अस्पृश्य भेद यासारख्या अधर्माचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते, अशावेळी क्रांतिकारी विश्व ग्रुप महात्मा बसवेश्वरांच्या उदय झाला.
महात्मा बसवेश्वर महाराज यांचा जन्म कर्नाटक मधील विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी या गावातील बागेवाडी या आग्रहाचे प्रमुख आधी राज व मादल अंबिका यांच्या पोटी झाला. महात्मा बसवेश्वर यांना परंपरागत पद्धतीने धार्मिक व इतर संस्कार बालपणापासून केल्या जाऊ लागले होते. याच वेळी त्यांची शिक्षणाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. ग्रहांमध्ये मुलांना सुरुवातीपासूनच संस्कृत शिकवल्या जात होते. त्यामध्ये वेद, पुराण, व्याकरणे, तर्कशास्त्र अशा अनेक प्रकारचे त्यांना ज्ञान दिल्या जात होते. त्यामुळे प्रखर बुद्धिमत्ता व निर्भीडपणा असलेल्या बसवेश्वरांना यावेळी समाज जीवनपद्धती व ग्रंथांमध्ये दाखवलेल्या आदर्श यामध्ये फार मोठी विसंगती जाणू लागली.
तात्कालीन धर्म परंपरेनुसार वयाच्या आठव्या वर्षीच बसवेश्वर महाराजांवर मौजी बंधनाचे संस्कार करण्यात येऊ लागले. पण हे संस्कार महात्मा बसवेश्वरांना लहानपणापासून खटकू लागले होते.त्यांचे म्हणणे असे होते की जसे माझे संस्कार केले जात आहेत असे त्यांच्या बहिणीचे म्हणजे नागम्मा यांचेही व्हावेत. पण त्यावेळी धर्म परंपरा आहे मान्य नव्हते. त्यामुळे बसवेश्वर महाराज आणि तेव्हाच त्या धर्म परंपरा विरुद्ध बंड पुकारला होता ते म्हणतात की स्त्री आणि पुरुष भेद करणारा असा कोणता धर्म परंपरा आहे, आणि ही परंपरा मला मान्य नाही. त्याच वेळी महात्मा बसवेश्वर यांनी निश्चय केला की स्वतःच्या बुद्धीला पटेल असेच निर्णय आपण इथून पुढे घ्यायचे व जुन्या रूढी-परंपरांना बाजूला करायचे.
महात्मा बसवेश्वर यांनी समाजामध्ये धार्मिक कर्मकांड साठी केले जाणारे यज्ञविधी होमहवन अजिबात पटत नव्हते. यज्ञासाठी दिलेला बोकडबळी तर बसवेश्वरांना महाराजांना फार वेदना देत होता. ते आपल्या एका वचनात म्हणतात,
"""अरे बोकडा, रड रे बाबा!
वेद वाचणार्या समोर रे बाबा!
शास्त्र ऐकणाऱ्या समोर रे बाबा !
तुझ्या रडण्याने योग्य शासन करतील, कुंडल संघम देव."""
तुम्ही बाबा यातूनच महात्मा बसवेश्वर महाराजांच्या हृदयाची तळमळ तुम्हाला दिसून येईल. त्या बोकडाला ते म्हणत आहेत की तू त्यांच्या पाया पडते तुला मोक्ष देतील. यामुळेच महात्मा बसवेश्वर महाराजांना यज्ञविधी होमहवन पसंत नव्हते.
अशाप्रकारे कुटुंब आणि समाजात सुरू असलेले सामाजिक व धार्मिक कर्मकांड व विषमतेवर आधारलेले अमानविय व्यवहार चिकिस्तक बुद्धीला महात्मा बसवेश्वर यांना अजिबात पटले नाही. म्हणून वैचारिक व सैद्धांतिक मतदानामुळे त्यांनी आपले घर व गाव सोडण्याचा निर्णय घेतला. महात्मा बसवेश्वर स्वतंत्र विचाराचे व विवेकी असे व्यक्ती होते. त्यांच्या आशा विवेकी निर्णयाला त्यांची मोठी बहीण नागम्मा यांनी त्यांना चांगले पाठबळ सुद्धा दिले. त्यामुळे महात्मा बसवेश्वर कृष्णा-मलप्रभा या ठिकाणी आले. कुंडल संगम अग्रहार असून शेव धर्माचे माहेरघर होते. या मंडळाचे अधिपती म्हणून ईशान्य ग्रुप काम पाहत होते. त्यांनी महात्मा बसवेश्वर यांची चांगल्या प्रकारे परीक्षा घेतली व त्यांची कुशाग्र बुद्धी पाहून त्यांना मठामध्ये राहण्यास व ध्यान करण्यास अनुमती दिली. आणि आता बसवेश्वर महाराजांचे आई-वडील नाते जे काही असेल ते सर्व आता हेच होतं.
कुंडल संगम या ठिकाणी बारा वर्षे राहून महात्मा बसवेश्वरांनी अध्ययन केले. धामण धर्माशी संबंधित सर्व ग्रंथांचे विविध विद्या व शास्त्राचा समावेश होता. ईशान्य गुरुंनी सुद्धा विद्वान व उदारमतवादी बसवेश्वर महाराजांना उपयुक्त ठरणारे योग्य अधिष्ठान उपलब्ध करून दिले. महात्मा बसवेश्वरांनी वैद्यक ग्रंथ दर्शन पुराण आगम आदी साहित्याची वाचन मनन व चिंतन केले. शिवपुराण, लिंगपुराण, स्कंदपुराण तुला गम ,वातूळ, तंत्र संहिता यासारख्या ग्रंथांवर प्रभुत्व मिळवले होते. प्रत्यक्ष जीवनामध्ये त्यांनी खूप अनुभव घेतले होते. त्यांनी अनुभव सत्संग त्यांचे निवासस्थान सोडून मंदिरे तीर्थक्षेत्र ते चारधाम होण्यापेक्षा पांगळा कर जणांचे वर्तन त्यांची मंगलमूर्ती पाहण्याऐवजी परस्त्री परधन दैवत लोगिक भागापेक्षा पाहण्यापेक्षा अंध बनव असे काही वचन मध्ये त्यांनी नमूद केले आहे.तात्कालीन परंपरा आणि कर्मकांड अंधश्रद्धेविरुद्ध त्यांनी चांगल्याप्रकारे वचन लिहून लोक उद्धाराचे काम केले होते. यातूनच त्यांच्या ज्ञानाचे आकलन केले जाऊ शकते.
महात्मा बसवेश्वर महाराजांनी आपल्या कार्याचा प्रारंभ केला तो मंगळवेढा येथून.मामा मला देवाने बसवेश्वरांना आपली मुलगी गंगा भिका देण्याचा निर्णय घेतला व त्यांचा विवाह संपन्न झाला. त्यानंतर त्यांच्या मामा मंत्री यांनी व सहकाऱ्यांनी महात्मा बसवेश्वर यांना कारकून पदाची नोकरी दिली. राजा बिजवल मोठ्या अधिकार व वैभवाने राज्य करीत होता. बसवेश्वर महाराजांनी आपला प्रामाणिकपणा व्यक्तींशी रपणा कामाची चिकाटी व कार्य निष्ठेमुळे बिजू राज्याच्या दरबारामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले. एके वेळी खोदकाम करताना कामगारांना एक अनाकलनीय ताम्रपट मिळाला. त्यामध्ये असे लिहिले होते की की राज्याच्या सिंचनाखाली खूप मोठे धन-दौलत आहे. तर हे ताम्रपट कोणाला तू असता येत नव्हते तर महात्मा बसवेश्वरांनी हे वाचून तिथे खोदकाम करण्यात आले तर खरंच त्या ठिकाणी धन सापडले. त्यामुळे बिजरा ने महात्मा बसेश्वर खुश होऊन त्यांचा यथोचित गौरव केला. त्यांच्या या प्रामाणिकपणा आणि कौशल्याच्या जोरावर त्यांची खजिनदार पदापर्यंत कारभार गेला. त्यावेळी बीजल राजाने कल्याण राज्य जिंकले होते आणि त्या राज्याचे महामंत्री म्हणून बसवेश्वर महाराज यांची निवड केली.
कल्याण ला आल्यानंतर बसव विचारांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ लागला. येणाऱ्या लोकांमध्ये अनेक वर्गातील जातीतील स्तरातील लोकांचा समावेश होता कल्याण येथे बसवेश्वरांनी वर्णाश्रम व्यवस्था जातिभेद अस्पृश्यता स्त्री दास्यत्व धार्मिक कर्मकांड व सामाजिक अन्याय अत्याचाराच्या उच्चाटनासाठी अनुभव मंडपाची स्थापना केली. अनुभव मंडपामध्ये संपूर्ण देशातून विद्वान असे शरण सामील होऊ लागले. तिथे सगळ्या प्रकारे चर्चा होत असे. या अनुभव मंडपाचे अध्यक्ष म्हणून अल्लंप्रभू यांनी अध्यक्ष पद भूषविले होते. याठिकाणी सामाजिक आर्थिक शैक्षणिक धार्मिक मिक्व संस्कृतिक अशा अनेक विचारांवर चर्चा होत असे.
सहाजिकच महात्मा बसवेश्वर महाराज यांचे शरण हे पूर्ण जगा मधून त्यांना शोधत येत होते. त्यांची प्रसिद्धी वाढली होती. कश्मीर व अफगाणिस्तानचे राजे सुद्धा त्यांना घेऊन शरण गेले होते. हे सर्व पाहून बीजल राजाला काही धर्मभ्रष्ट लोकांनी कान भरणे करून त्यांच्या विचारात महात्मा बसवेश्वर यांच्याविरुद्ध कटकारस्थान टाकण्यास भाग पाडले. भिजला ना वाटले की महात्मा बसवेश्वर हे माझ्या विरुद्ध बंड पुकारले म्हणून त्यांनी शरण यांच्या हत्या करण्यास व महात्मा बसवेश्वर यांचे विचार थांबवण्यास सांगितले. याचा गैरफायदा घेऊन त्यावेळेच्या धर्म भ्रष्ट लोकांनी शरण यांच्या हत्या करण्यास सुरुवात केली. महात्मा बसवेश्वर महाराजांना हे बनवल्या गेले नाही. खरं तर तेव्हाच कल्याण क्रांतीची सुरुवात झाली होती. तेव्हाचे शरण सुद्धा हातावर हात न ठेवता त्यांनी ही शस्त्र उचलली. खरेतर त्यावेळी जे वचन साहित्य क्षणांनी लिहिलेले होते त्याला नष्ट करण्यासाठी तेव्हाचा लोकांनी खूप प्रयत्न केले. पहिल्या अनुभव मंडपामध्ये 770 शरण होते. त्यात 70 शरणी होत्या. खूप मोठ्या प्रमाणात हे साहित्य लिहिल्या गेले होते आणि ते जन उद्धाराचे प्रतीक म्हणून समोर येत होते. आणि या वचनांना जिथे ठेवण्यात आले होते त्या भांडणांना काही लोकांनी आग लावून दिली होती.
बसवेश्वरांनी कल्याण क्रांतीमधील विविध घटना त्यातील हिंसा निष्पाप शर्मांच्या कत्तली या गोष्टी मनाला लावून घेतल्या. बसवेश्वर अतिशय संवेदनशील मनाचे होते मी जे आदर्श समाज निर्मितीचे ध्येय समोर ठेवले होते त्यासाठी जी चळवळ उभी केली होती तिची वाटचाल कशी आणि कुणीकडे होत आहे हे कदाचित न पाहण्याने बसवेश्वरांनी ज्या संगमेश्वराच्या सान्निध्यात त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन हे जनसेवेचे मानवतावादी कार्य सुरू केले होते त्याच कुंडली संगम क्षेत्री त्यांनी या भु तलाचा चा निरोप घेतला.
महात्मा बसवेश्वरांनी असे काही काम केले होते की त्यावेळी ते करणे म्हणजे जे काही सोपे नव्हते. त्यांनी केलेल्या काही कार्याचा उल्लेख खाली थोड्या शब्दांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. वरील पूर्ण लेखांमध्ये त्यांचे मुद्दामून हे कार्य जास्त टाकले नाही कारण आपल्याला त्यांच्या आयुष्यावरील कार्य महत्त्वाचे आहे. ते खालील प्रमाणे......
जातीय विषमतेला विरोध
अस्पृश्यता निवारणाचे कार्य
आर्थिक समतेसाठी पुढाकार (यामधूनच काय कवे कैलास सिद्धांत मांडला)
स्त्री पुरुष समानता हक्कासाठी लढा
सर्व श्रमाचा दर्जा समान ( वर्णव्यवस्थेचे प्रमाणे विरोध)
त्याकाळात परिस्थितीनुसार आर्थिक नीती
प्रशासकीय व्यवस्था सुधारली
राज्यामध्ये व्यक्ती सुधार कार्यक्रम केले
काय कवे कैलास सिद्धांत मांडला
दासोह सिद्धांत मांडला
व्यवसाय उद्योगाला प्रोत्साहन दिले
अशाप्रकारे महात्मा बसवेश्वरांनी अनेक लोक उद्धाराची व दूरदृष्टी ठेवून कार्य करण्याची व समाज प्रबोधन करण्याची काम केली. आपण पाहतो आजही त्यांनी केलेली कामे आपल्यासाठी आणखी दूरदृष्टी देऊन जातात. म्हणूनच संपूर्ण जग त्यांना जगतज्योती क्रांतिकारी म्हणते.
लेखक - प्रा.विलास साखरे
संस्थापक - बाल शिवराय गुरुकुल परभणी व सेमी इंग्लिश स्कूल उजळ आंबा.
मो.9552467153.


No comments:
Post a Comment