जिल्हाभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची अफवा बीडमध्ये एकही रुग्ण नाही -डॉ.अशोक थोरात
बीड / सोनपेठ (दर्शन):-
बीड शहरातच नव्हे तर जिल्हाभरात कोरोनाबाधीत एकही रुग्ण नसून संशयितांचे स्वॅब रोज पाठवले जात आहेत. ते निगेटिव्ह येत आहेत. आतापर्यंत दीडशेपर्यंत लोकांचे स्वॅबचे नमुने निगेटिव्ह आले असून शहरात कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण नाही. त्यामुे अफवांवर कोणीही विश्वास ठेवून ये त्याचबरोबर अफवा पसरवू नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी केले. आज तीन संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
आज सकाळपासूनच बीड शहरात कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळल्याची अफवा मोठ्या प्रमाणावर पसरली होती. शहरातील वेगवेगळ्या भागांचे नाव घेऊन ही अफवा वाढत चालली. कुठे एक आढळला तर कुठे तीन पॉझीटिव्ह रुग्ण आढळल्याची अपवा पसरत असताना रिपोर्टर कार्यालयातही अनेकांनी भ्रमणध्वनीवरून याबाबत खातरजमा केली. सदरची अफवा पसरत असल्याचे पाहून सा.सोनपेठ दर्शन प्रतिनिधीने थेट जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांना याबाबत भ्रमणध्वनीवरून विचारले असता अद्याप पावेतो कोरोना पॉझीटिव्ह एकही रुग्ण शहरात अथवा जिल्ह्यात नसून अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, अफवा पसरू नये, आज तीन संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
No comments:
Post a Comment