Monday, April 13, 2020

जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित एकही रुग्ण नाही ; आजपर्यंत जिल्हा रुग्णालयात 340 संशयितांची नोंद

जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित एकही रुग्ण नाही ; आजपर्यंत जिल्हा रुग्णालयात 340 संशयितांची नोंद


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

जिल्हा रुग्णालय परभणी येथे आज दि.१३ एप्रिल २०२० रोजी कोरोना विषाणु संदर्भात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३४० संशयितांची नोंद झालेली आहे. यामध्ये एकुण घेण्यात आलेले स्वॅब  ३०४ व यापैकी २५८ निगेटिव्ह असुन २९ स्वॅब  अहवाल प्रलंबित आहेत. सोमवार दि. १३ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हयात कोव्हिड- १९ विषाणु बाधित एकही रुग्ण नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
                      
                आजपर्यंत १७ स्वॅब पुणे राष्ट्रीय विषाणु संस्था  व शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, औरंगाबाद यांनी तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे . वरील ३०४ स्वॅब पैकी १३ एप्रिल रोजी एकुण २० संशयितांचा नमुना ( स्वॅब ) तपासणीसाठी शासकीय वैद्यकिय महविद्यालय , औरंगाबाद येथे पाठविण्यात आला असून आज रोजी नव्याने दाखल झालेले संशयित २०, एकुण नोंद झालेले संशयित ३४०, विलगीकरण केलेले १४२, हॉस्पीटलमध्ये संसर्गजन्य कक्षात २८, विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झालेले १७०,  नोंद झालेल्या एकुण ३४० पैकी परदेशातुन आलेले ६२ तर परदेशातुन आलेल्या व्यक्तीच्या सपंर्कातील ६ असे आहेत. असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
                 -*-*-*-*-

No comments:

Post a Comment