परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष
प्राचार्य सुरेश नाईकवाडे 24 एप्रिल 2020 रोजी आकाशवाणीवर
परभणी / सोनपेठ (दर्शन) : -
परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांचा 24 एप्रिल 2020 रोजी 'कोरोना काळात पत्रकारानी वार्तांकन करताना घ्यावयाची दक्षता विषयावर वार्तालाप प्रसारीत होणार आहे.
सध्या जगात कोरोना ने हा हा कार उडवला आहे. या काळात पत्रकारांनी कोविड-१९ चा मुकाबला करताना कोणती दक्षता घेतली पाहिजे या विषयावर परभणी आकाशवाणी केंद्रावर उद्या दिनांक 24 एप्रिल 2020 सकाळी 07 .45 वाजता प्रसारीत होणार आहे. या कार्यक्रमात पत्रकारानी कोविड-१९ पासून बचाव करताना कोणती दक्षता घेतली पाहिजे या विषयावर प्राचार्य सुरेश नाईकवाडे हे मार्गदर्शन करणार आहेत.परभणी जिल्हयातील पत्रकारांनी वरील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन कार्यक्रमाधिकारी आकाशवाणी परभणी यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment