Tuesday, April 7, 2020

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर    


                              
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
 
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त दि १४ एप्रिल रोजी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करित      श्री हुजूर साहेब ब्लड बँक परभणी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
   कोरोना विषाणूच्या संकटामुळे अतिमहत्त्वाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी रक्ताचा तुटवडा भासत असल्याने श्री हुजूर साहेब ब्लड बँक परभणी  यांनी पुढाकार घेऊन शहरी व ग्रामीण भागातील युवकांसाठी नियोजनबद्ध पद्धतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.शहरातील विविध भागातील युवकांनी या रक्तदान शिबीराचा लाभ घेण्यासाठी नाव नोंदणी केली आहे.दि १४ एप्रिल रोजी सकाळी १० ते  सायंकाळी ५ वाजेपर्यंत श्री हुजूर साहेब ब्लड बँक परभणी येथे शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असलेल्या युवकांची रक्त दानासाठी आवश्यक असलेली योग्य ती आरोग्य तपासणी करून रक्त संकलण केले जाईल.तरी इच्छुक रक्तदात्यांनी संदिप बागल (जनसंपर्क अधिकारी, श्री हुजूर साहेब ब्लड बँक, परभणी)मो.नं.९७६७९६६३९७/७७७६०२६६६६ या क्रमांकावर संपर्क करून आपली नावनोंदणी करावी.असे आवाहन श्री हुजूर साहेब ब्लड बँक परभणी यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment