सोनपेठ शहरातील अल्पावधीत तत्पर सेवेला नावा रुपास आलेले.बालाजी मारोतराव बागडे यांचे दत्तकृपा भोजनालय कै.शंकरराव चव्हाण व्यापारी संकुल दुकान क्रमाक ६ वरचा मजला येथे नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती शिवशिल्पाचे पुजन मा.नायब तहसीलदार साहेबराव घोडके व पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या हस्ते पुजन करुन गरजवंत नागरिकांना शिवभोजन थाळीचे वाटप करुन सुरुवात करण्यात आली दररोज सकाळी १२ ते २ या वेळेत गौर-गरीब नागरिकांना केवळ ५ रुपये मध्ये या शिवभोजन थाळीचा ( ७५ मर्यादा )आनंद घेता येणार आहे.याप्रसंगी ज्ञानेश्वर बहादुर व बालाजी बागडे हि सेवा देत असताना गरजवंत नागरीकांनी शासनाच्या सुचनांचे पालन करत सामाजीक अंतर राखत याचा अस्वाद घ्यायचा आहे.गरजवंत नागरीकांनी बालाजी बागडे यांच्याशी संपर्क साधा घरपोहच सेवा ही उपलब्द असल्याचे त्यानी यावेळी सा.सोनपेठ दर्शन प्रतिनिधी जवळ बोलताना व्यक्त केले.महाराष्ट्र विकास आघाडीच्या सर्व मंत्रीमंडळाचे सर्व स्तरातुन या तालुका स्तरावर शिवभोजन थाळी उपलब्ध करुन दिल्या बद्दल स्वागत होताना दिसत आहे.शासनाने ७५ मर्यादा वाढऊन १५० केल्यास जास्तीत जास्त गरजवंत नागरीकांना याचा फायदा मिळेल.
No comments:
Post a Comment