Monday, April 6, 2020

महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांसाठी महत्वाचा दिवस 7 एप्रिल ; पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचा यशस्वी लढा

महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांसाठी महत्वाचा दिवस 7 एप्रिल ; पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचा यशस्वी लढा


मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

पत्रकार संरक्षण कायद्याचं विधेयक महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कसलीही चर्चा न होता मंजूर झालं.या घटनेला उद्या ३ वर्षे पूर्ण होत आहेत.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 एप्रिल 2017 रोजी विधानसभेत हे विधेयक मांडलं.तेथे एकमुखाने ते मंजूरही झालं.त्याच दिवशी वरच्या सभागृहानं देखील या विधेयकावर मंजुरीची मोहोर उमटविली.नंतर 27 नोव्हेंबर 2019 रोजी विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आणि 8 डिसेंबर 2019 पासून पत्रकार संरक्षण कायदा महाराष्ट्रात लागू झाला.महाराष्ट्र हे देशातील पहिले आणि एकमेव असे राज्य आहे की जेथे पत्रकारांना कायदेशीर संरक्षण आहे.या कायद्यान्वये पत्रकारांवरील हल्ला हा अजामिनपात्र गुन्हा आहे आणि तो सिध्द झाल्यानंतर आरोपीला तीन वर्षाची कारावासाची शिक्षा होऊ शकते.
हा कायदा मंजूर करून घेण्यासाठी मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यातील पत्रकारांना सलग 12 वर्षे लढा द्यावा लागला.व्यक्तीगत पातळीवर मला मोठ्या अग्निदिव्यातून जावं लागलं.अर्थात कायदा झाला, हाती घेतलेला विषय पुर्णत्वास नेता आला याचा मोठा आनंद आहे..
हा कायदा व्हावा यासाठी अनेकांचे योगदान मिळाले त्यांचा मी आभारी आहे.. या लढयामुळे राज्यातील पत्रकारांची भक्कम एकजूट झाली आणि या एकजुटीच्या रेटयातूनच राज्यात कायदा झाला.. राज्यातील तमाम पत्रकारांचे आभार. आणि पत्रकार संरक्षण कायद्याच्या उद्याच्या वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केल्या आहेत.





No comments:

Post a Comment