Monday, April 13, 2020

जिल्ह्यातील मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या 30 एप्रिलपर्यंत बंद

जिल्ह्यातील मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या 30 एप्रिलपर्यंत बंद


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-   

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यात  दि.1 ते 14 एप्रिल 2020 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व मद्य विक्रीचा अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेशित केले होते परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता सुधारित आदेश काढण्यात आले असून त्याचा कालावधी 30 एप्रिल 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. 
          मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन परभणी जिल्ह्यातील सर्व मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या सीएल-3 देशी दारु किरकोळ विक्री अनुज्ञप्ती, एफएल-2, एफएल-3, एफएल-4, सीएल,एफएल,टिओडी-3, देशी व विदेशी दारु किरकोळ विक्री अनुज्ञप्ती. एफएल-3 परवाना कक्ष व एफएल,बीआर-2, बिअरची सिल बंद बाटलीतून विक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्ती धारका विरुध्द कडक कारवाई करण्यात येईल. असेही आदेशात नमुद केले आहे.
-*-*-*-*-

No comments:

Post a Comment