शेतमाल विक्री करण्याकरीता ऑनलाईन नोंदणी ; जिल्हयातील 46776 कापूस उत्पादकाची नोंदणी
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी देशात दिनांक 23 मार्च 2020 पासून लागू करण्यात आलेल्या पहिल्या टप्यातील लॉकडाऊन कालावधीत केंद्रीय कापूस निगम (CCI) यांच्या मार्फत व सीसीआय च्या वतीने महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मार्फत करण्यात येणारी कापूसाची खरेदी स्थानीक स्तरावरील वेगवेगळया कारणास्तव बंद करण्यात आली होती.
कोविड – 19 या विषाणू च्या संक्रमणामुळे जिल्हयातील शासकीय खरेदी केंद व कृषी उत्पन बाजार समित्यामधील व्यवहारवर परिणाम होऊन प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी त्यांच्या कडील शेतमाल विक्रीस आनने कमी केले आहे.
प्रधान सचिव पणन मंत्रालय मंबई पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिनांक 17 एप्रिल 2020 रोजी परिपत्रकाद्वारे दिलेल्या सुचनेनूसार शेतकऱ्यांकडील FAQ दर्जाचा कापूस खेरदी करणे बाबत ccI व कॉटन फेडरेशन यांना कळविले आहे. त्यानंसार परभणी जिल्हयातील शेतकऱ्यांना शासकीय कापूस खरेदी केंद व व कृषि उत्पन बाजार समिती कडे शेतमाल विक्री करण्यासाठी त्यांच्या शेतमाल विक्री करण्याकरीता ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन दिनांक 18 एप्रिल 2020 रोजी पासून https://forms.gle/VUASetva7aDqkGn3A या लिंक वर नोदंणी करण्यासाठी आवहान करण्यात आले .
उपरोक्त लिंक वर शेतकरी बांधव यांनी त्यांच्या कडील भ्रमनध्वनीवरुन देखील नोंदणी करुन शकत असेल्याने दिनांक 18 एप्रिल 2020 ते 27 एप्रिल 2020 च्या सांयकाळी 6.00 परभणी जिल्हयातील बाजार समिती निहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बाजार समिती चे नाव – ऑन लाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या गंगाखेड- 14611, मानवत -7325, परभणी 7237, सेलू 5472, पाथरी -4330, सोनपेठ – 3613, जिंतूर – 2132, ताडकळस – 739, पूर्णा- 674, बोरी – 643, एकूण 46776.
शेतकऱ्यांनी ही नोंदणी प्रकीया घरामध्ये राहूनच त्यांच्या कडील भ्रमध्वनीवरुन / संगणाकवरुन केलेली असेल्याने शेतकऱ्यांची बाजार समिती मध्ये टोकन घेण्यासाठी होणारी गर्दी जिल्हा प्रशासन यशस्वी झाले असून केंद्र शासन व राज्य शासनाने कोविड – 19 या विषाणू न होण्यासाठी ज्या मार्गदार्शक सूचना निर्गमीत केलल्या आहेत त्यानुसार सोशल डिस्टन्स चे पालन होण्यासाठी फार मोठया प्रमाणात मदत होऊन कोविड -19 या विषाणू च्या संक्रमाण होण्यासाठी प्रतिबंधक झालेला आहे.
शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस विक्रीस घेवून येते वेळी सोशल डिसटन्स व इतर मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.
केंद्रीय कापास निगम लि.CCI महाराष्ट्र राज्य कापूस सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ यांचया कडे शेतकऱ्यांना त्यांचया शेतमाल विक्री करण्यासाठी मा. दि.म.मुगळीकर, जिल्हाधिकारी परभणी, विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे, प्रभारी विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महा संघ म विभागीय कार्यालय श्री.रेणके, परभणी जिल्हयातील सर्व कृषि उत्पन बाजार समितीचे सभापती यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाची विक्री होण्यासाठी बाजार समितीने दिलेल्या सुचने नुसार कार्यावाही करण्याचे आवाहन केलेले आहे.
शेतऱ्यांनी ज्या बाजार समितीकडे नोंदणी केली आहे. त्या बाजार समितीकडून दोन दिवस अगोदर दिनांक निहाय नोंदणी क्रमांने SMS किंवा भ्रमनध्वनीद्वारे फोन करुन कळविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना त्यांचा कापूस विक्रीची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी गुगल लिंक तयार करण्यासाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद, परभणी INC चे अधिकारी सुनील पोटेकर,निवासी उपल्हिाधिकारी अंकूश पिनाटे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, मंगेश सुरवसे यांनी असे कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment