सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यात तसेच शहरातील सर्वच स्वस्त धान्य दुकानदार यांच्या कडुन कोरोना विषाणू संसर्ग रोखन्याच्या शासनाच्या नियमानुसार सुरक्षित अंतर ठेऊन तोंडाला रुमाल बाधुन रेशनचे वितरण होताना, तालुक्यातिल मौजे खडका येथिल ज्ञानेश्वर (माऊली) मव्हाळे यांच्या स्वस्त धान्य दुकानाच्या बाहेरील हे काहि बोलकी छायाचित्रे असुन. ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक तसेच पोलिस पाटिल आदिंच्या नियोजनातुन खडका ग्रामवासी या लाँकडाउन मध्ये घालून दिलेल्या नियमाचे काटेकोर पणे पालन करत आसतानाचे चित्र सर्व ग्रामीण बागात दिसत आहे.परंतु काहि टवाळ खोर प्रतेक गावा- गावात एकत्र जमा होऊन गौधळ घालताना दिसत आहे.पोलिस प्रशासनाची गाडी एक - दोन चक्कर ग्रामीण भागातील या टवाळ खोरांना अवरण्यासाठि येतिल का असे सुज्ञ नागरीकांतुन मागणी होताना दिसत आहे.
No comments:
Post a Comment