कोरोनाबाधित एकमेव रुग्णाची प्रकृती स्थिर; वैद्यकीय समुपदेशनासाठी पथक तयार ; सोमवारी नव्याने दाखल झाले एकुण १४ संशयित
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकमेव रुग्णाची प्रकृती स्थिर असून संबधित कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास वैद्यकीय समुपदेशकामार्फत समुपदेशन करण्यात येत आहे. जिल्हयामध्ये जिल्हा रुग्णालयामार्फत पथक तयार करून पथकामार्फत ग्रामीण व तालुका स्तरावरील रेफयुजी कॅम्पमधील दाखल असणाऱ्या रहिवाशांचे वैद्यकीय समुपदेशन करण्यात येत आहे. सोमवार दि. २० एप्रिल रोजी परभणी जिल्ह्यामध्ये एकही नवीन संशयीत कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आला नाही. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
सोमवार दि. २० एप्रिल २०२० रोजी कोरोना विषाणू संदर्भात सायंकाळी ५ वाजेपर्यंत परभणी येथील जिल्हा रुग्णालयात ५४३ संशयितांची नोंद झाली. एकुण घेण्यात आलेले स्वॅब ४८१ व त्या पैकी ४१५ निगेटिव्ह असुन त्यापैकी १ पॉझिटिव्ह असुन ४८ स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. आजतागायत १७ स्वॅब राष्ट्रीय विषाणु संस्था व औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाने तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे. वरील ४८१ स्वॅब पैकी २० एप्रिल रोजी एकुण २६ संशयितांचा नमुना ( स्वॅब ) तपासणीसाठी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, औरंगाबाद येथे पाठविण्यात आला आहे .
सोमवार दि. २० एप्रिल रोजी नव्याने दाखल झालेले एकुण संशयित १४, एकुण नोंद झालेले संशयित ५४३, पैकी विलगीकरण केलेले २४८, हॉस्पिटलमध्ये संसर्गजन्य कक्षात ४१, विलगीकरणाचा कालावधी पुर्ण झालेले २५४, नोंद झालेल्या एकुण ५४३ पैकी परदेशातुन आलेले ६२ आणि त्यांच्या सपंर्कातील ६ याप्रमाणे आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment