Thursday, April 23, 2020

संचारबंदीस जनतेने सहकार्य करावे - जिल्हाधिकारी

संचारबंदीस जनतेने सहकार्य करावे - जिल्हाधिकारी



 परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हयात जाहीर करण्यात आलेल्या  दि . २४  एप्रिल २०२० रोजी रात्री 12 वाजेपर्यंतच्या जनता संचारबंदीस जनतेने सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी केले आहे.
         जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज कोरोना विषयक बैठक संपन्न झाली. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी,  महानगरपालिका आयुक्त रमेश पवार , निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांच्यासह बांधकाम , महावितरण , पोलिस, कृषी विद्यापीठ आदी विभागातील कोरोना नोडल अधिकारी उपस्थित होते.
           बैठकीत कोरोना विषयक आजपर्यतचा सर्वांगिन आढावा घेण्यात आला तसेच कोरोना विषयक भविष्यात करावयाच्या उपाययोजनाबाबत निर्देश देण्यात आले. जिल्हयातील एकमात्र पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्या रुग्णांच्या घरातील एकुण ९ नातेसंबंधातील व्यक्तींचा दुसरा स्वॅब अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. तसेच दिल्ली निजामोद्दीन प्रकरणातील एकुण १७ व्यक्तीचा दुसरा स्वॅब अहवाल देखील निगेटीव्ह आला आहे.
            गुरुवार दि.२३ एप्रिल २०२० रोजी कोरोना विषाणु संदर्भात सायंकाळी ५ वाजेपर्यंत परभणी जिल्हा रुग्णालयात  १८ संशयित दाखल झाले असून आजपर्यंत एकुण ५९३ संशयितांची जिल्ह्यात नोंद झालेली आहे. असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
                  -*-*-*-*-

No comments:

Post a Comment