भाजपाच्या वतीने तालुक्यातील ग्रामीण भागात गरजु नागरीकांना किराणा सामानाच्या किटचे वाटप
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यातील ग्रामीण भागात भाजपाच्या वतीने दि.02 एप्रिल 2020 गुरुवार रोजी कोरोना प्रादुर्भावामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या तालुक्यातील ग्रामीण भागातील मौजे देविनगर तांडा , खडका , मोहळा , भिसेगाव , वैतागवाडी , वडगाव व चुकार पिंपरी या गावातील गरजवंत नागरीकांना किराणा सामानाच्या साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
कोरोना प्रादुर्भावामुळे लाॅकडाऊन असल्याने अडचणीत असलेल्या तालुक्यातील ग्रामीण भागातील गरजु नागरीकांना तालुका भाजपाच्या वतीने किराणा सामानाच्या किट ज्या मध्ये गव्हाचेपीठ ,तांदूळ,साखर मुगदाळ,तुरदाळ, गोडतेल, साबण,हळद व मिरची पावडर अदि साहित्याच्या किटचे वाटप जिल्हाध्यक्ष तथा भाजपा कोरोना दक्षता सेलचे संयोजक डॉ.सुभाष कदम, तालुका कोरोना दक्षता सेलचे संयोजक शिवाजीराव मव्हाळे, तालुकाध्यक्ष सुशील रेवडकर , सरपंच सोमेश्वर जाधव, आत्माराम कदम , राजेभाऊ निळे व युवराज बचाटे आदिंच्या हस्ते करण्यात आले.


No comments:
Post a Comment