Saturday, April 11, 2020

रोहित पवार यांच्या वतिने परभणी जिल्ह्यासाठि 600 लिटर सॅनिटायझरची मदत

रोहित पवार यांच्या वतिने परभणी जिल्ह्यासाठि 600 लिटर सॅनिटायझरची मदत 



परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

आ.रोहित पवार यांच्या वतीने दि.11 एप्रिल 2020 शनिवार रोजी  परभणी जिल्ह्यासाठी ५००लिटर सेनिटायजर देण्यात आलं. ते जिल्हाधिकारी मा. मुगळीकर यांच्याकडे सुपूर्द करतांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी, जि.प.चे माजी अध्यक्ष तथा सभापती राजेशदादा विटेकर, राष्ट्रवादी परभणी शहर जिल्हाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, नगरसेवक इम्रान हुसैनी, रितेश काळे, सुमंत वाघ, शंकर भागवत, कृष्णा कटारे, प्रभू जाधव आदिजन उपस्तित होते.

कोरोना विषाणुचे जगभर सावट पसरले, भारतातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने लॉकडाऊन सुरु केले. कोरोनाला रोखण्यासाठी तोंडावर मास्क आणि सॉनिटाडझर वापरण्याचा सल्ला सरकारने नागरिकांना दिला.

 संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने गावातील गरीब व रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबाला दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गरजू लोकांसाठी अनेक मदतीचे हात देखील पुढे येत आहे. कोरोनाच्या लढ्यासाठी देशातील अनेक दिग्गज मंडळींकडून याचप्रमाणे उद्योजकांकडून मदतीचे हात येत आहे.

कोरोनामुळे उद्भवलेल्या आपत्तीमध्ये पवार कुटुंबीयांच्या पिढीनेही तीच परंपरा कायम ठेवल्याचे दिसून येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी बारामती ॲग्रोच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने सहाशे लिटर सॅनिटायझरचा पुरवठा करण्यात आला आहे.

तसेच याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी प्रशासनाच्या वतीने रोहित पवार यांचे आभार मानले आहेत.तसेच आता कोरोनामुळे ओढवलेल्या आपत्तीमध्ये जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी व पोलिसांच्या सुरक्षेसाठी आमदार रोहित पवार यांनी सहाशे लिटर सॅनिटायझर पाठवले आहे. 

दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या पावलावर पाऊल ठेवत नवीन पिढीतील रोहित पवार हेसुद्धा परभणी जिल्ह्याच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

No comments:

Post a Comment