Wednesday, April 1, 2020

दिल्लीच्या मरकजहून आलेले तिघे विलगीकरण कक्षात दाखल, पाच 'होम-क्वारंटाईन'

दिल्लीच्या मरकजहून आलेले तिघे विलगीकरण कक्षात दाखल, पाच 'होम-क्वारंटाईन'



दिल्लीच्या मरकज येथून आलेल्या परभणीच्या तीघांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.

परभणी - दिल्ली येथील निजामुद्दीन भागात तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या परभणी शहरातील 3 व्यक्तींना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या जिल्ह्यातील 5 ठिकाणच्या 5 व्यक्तींना त्यांच्या घरी होम-क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्वांच्या 'स्वॅब'चे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment