जिल्ह्यातील सर्व व्हाट्सअप ग्रुप ॲडमिनने संगणकीय प्रणालीवर माहिती भरावी - जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत जिल्ह्यातील सर्व व्हाट्सअॅप ग्रुप अॅडमीनने त्यांच्या अधिनस्त असलेल्या व्हाटसअॅप ग्रुपचे नाव, ग्रुपचा उद्देश आणि ग्रुपमधील सदस्य संख्या या सोबत सर्वग्रुप अॅडमीनचे नाव आणि मोबाईल क्रमांक ही माहिती ऑनलाईन संगणकीय प्रणालीवर भरणे आवश्यक आहे. तरी जिल्ह्यातील ॲडमिनने संपूर्ण अचूक माहिती भरून प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दि.म. मुगळीकर यांनी केले आहे
जिल्ह्यातील विविध व्हाट्सअप व्हाटस ग्रुपची माहिती संकलीत करण्यासाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , परभणी मार्फत एक ऑनलाईन संगणक प्रणाली विकसीत केली असून ही प्रणाली https://www.collectorpbn.in/ लिंकवर उपलब्ध आहे. या प्रणालीत एका ग्रुपच्या केवळ एकाच ॲडमिनने संपूर्ण अचूक माहिती भरावी. तसेच यात शासकीय कार्यालयांनी त्यांच्या शासकीय संदेशवहनासाठी तयार केलेल्या ग्रुपची माहिती भरण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक ॲडमिनने त्याच ग्रुपसाठी पुन्हा तीच माहिती भरण्याची आवश्यकता नाही . एका ॲडमिनने माहिती भरतांना त्या ग्रुपमध्ये इतर किती ॲडमिन आहेत त्या सर्वांची संख्या भरावी. ग्रुपमधील एकूण ॲडमिनची संख्या भरल्यानंतर इतर प्रत्येक ॲडमिनची संपूर्ण माहिती भरावयाची आहे.
संपुर्ण माहिती भरल्यानंतर माहिती भरणाऱ्या ॲडमिनला ऑनलाईन स्वयंघोषणापत्र दिसेल त्या ठिकाणी 'आय ॲग्री' या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर माहिती साठविली जाणार आहे. माहिती भरण्यात चूक झाल्याचा ई-मेल केल्यानंतर माहिती पुन्हा भरता येईल. एकदा माहिती भरल्यानंतर ती काढून टाकता येणार नाही किंवा त्यात बदल करता येणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्हाट्सअप ग्रुप ॲडमिनने काळजीपूर्वक माहिती भरावी. माहिती भरतेवेळी काही चूक झाल्यास तात्काळ col.da.par-mh@nic.in या ई-मेलवर संपर्क साधावा. असेही जिल्हाधिकारी,परभणी यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-

No comments:
Post a Comment