आईच्या उत्तरकार्याचा खर्च टाळून धनंजय मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकाची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत ; प्रशांतजी तुसी ग्रेट हो...
बीड / सोनपेठ (दर्शन) :-
राज्यात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती आणि संस्थानी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांनी देखील आपल्या आईच्या उत्तरकार्याचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस केली मदत केली आहे.
प्रशांत जोशी यांच्या मातोश्री इंदूबाई भास्करराव जोशी यांचं 2 एप्रिल रोजी निधन झालं. प्रशांत जोशी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उत्तरकार्याचा खर्च टाळून त्याची रक्कम 25 हजार रुपये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देऊन एक आदर्श पायंडा पाडला आहे. प्रशांत जोशी यांनी 25 हजारांचा चेक मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्द केला आहे. तसेच कोरोना विरुद्धच्या लढ्याला जिंकण्याची शक्ती देण्याची प्रार्थना यावेळी केली आहे.
प्रशांतजी तुसी ग्रेट हो...
No comments:
Post a Comment