Thursday, April 9, 2020

मुलाच्या पहिल्याच वाढदिवसाचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी केली मदत....

मुलाच्या पहिल्याच वाढदिवसाचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी केली मदत....



सोनपेठ (दर्शन) :-  
शहरातील गायकवाड कुटुंबियांनी आपल्या घरातील लहान मुलाचा पहिला वाढदिवस साजरा न करता तोच निधी कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला आहे.
शहरातील जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेचे मुख्याध्यापक प्रदिप गायकवाड यांनी हा उपक्रम राबवुन सामाजिक संदेश दिला आहे.
कुठलीही आपत्ती नयेवो यासाठी गायकवाड कुटुंबियांनी नेहमीच मदतीचा हात पुढे केलेला आहे.
मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना त्यांनी शालेय साहित्याचे वाटप तिथे जाऊन केले होते.
तोच सामाजिक धागा पकडत प्रदिप गायकवाड यांनी आपल्या नातवाच्या पहिल्याच वाढदिवसाच्या निमित्ताने कुठलाही अनावश्यक खर्च न करता तोच पैसा कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधात्मक बाबींसाठी एक छोटीशी मदत म्हणुन मुख्यमंत्री सहाय्यता निधी त गुरूवार दिनांक 9 एप्रिल रोजी ऑनलाईन जमा केला.
त्याच्या या सामाजिक बांधिलकी जोपासणा-या समाजपौगी उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

No comments:

Post a Comment