मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढतो आहे. त्यामुळे सोशल डिस्टंन्सिंग कटाक्षाने पाळा असे तज्ज्ञ सांगत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सगळ्याच ठिकाणी त्याचे पालन सुरू केले आहे. बैठकांसाठी त्यांना मंत्रालय, वर्षा, महापालिका मुख्यालय असा प्रवास करावा लागतोय. कामाचा ताण वाढलाय. मात्र असे असतानाही मुख्यमंत्री स्वत: कार चालवत या बैठकांना पोहोचत आहेत. गेल्या आठवडाभरापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: कार चालवत आहेत.मुंबई महापालिकेत आढावा बैठक होती. त्यासाठी मातोश्रीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: कार चालवत बीएमसी मुख्यालयात आले. या कारमध्ये मागच्या सीटवर आदित्य ठाकरे बसले होते. सोशल डिस्टंन्सिंगचे काटेकोर पालन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री ठाकरे सोशल मीडियाव्दारे लोकांना घराबाहेर पडू नका, सरकार जे सांगतेय त्या नियमांचे पालन करा असे वारंवार सांगत आहेत.
No comments:
Post a Comment