Thursday, April 30, 2020

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री श्री.नवाब मलिक यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री श्री.नवाब मलिक यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न




परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी 'महाराष्ट्र दिन' हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 60 वा वर्धापन दिन समारंभानिमित्त शुक्रवार दि. 1 मे , 2020 रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे सकाळी 8 वाजता  आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ , कौशल्य विकास व उदयोजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री  श्री.नवाब मलिक यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न झाले.
           यावेळी जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती सूर्यवंशी, तहसीलदार विद्याचरण कडवकर उपस्थित होते.
                        -*-*-*-*-

कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या सहवासातील 51 संशयितांचे स्वॅब घेतले

कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या सहवासातील 51 संशयितांचे स्वॅब घेतले


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 
जिल्हयातील सेलु शहरातील राज मोहल्ला येथील रहिवाशी असलेली ५५ वर्षीय महिला दुर्धर आजारावरील उपचारासाठी औरंगाबाद येथे मागील काही दिवसापासुन दाखल होती.ही  महिला दि.२७ एप्रिल २०२० रोजी सकाळी ४.३० वाजता खाजगी वाहनाने सेलू येथे परत आली होती. त्यानंतर दि.२८ एप्रिल २०२० रोजी ही महिला रुग्ण सेलु येथुन परभणी येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेवुन दुर्धर रोगाच्या उपचारासाठी नांदेड येथे गेली होती. नांदेड येथील वैद्यकीय पथकाने महिलेचे स्वॅब घेतले असता परिक्षणाअंती कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आली असुन सदर महिला रुग्णावर नांदेड येथे औषधोपचार चालू आहेत. संबधित रुग्णाच्या सहवासातील सेलू येथील २७ व परभणी खाजगी रुग्णालयातील २४ असे एकुण ५१ संशयितांचे स्वॅब घेण्यात येऊन त्यांना उपजिल्हा रुग्णालय सेलु व जिल्हा रुग्णालय परभणी येथे दाखल करुन घेण्यात आले आहे.अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
           राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्हयाचे पालकमंत्री श्री.नवाब मलिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू (कोव्हिड १९) संदर्भात आढावा बैठक घेवुन संबंधितांना योग्य त्या सूचना केल्या व कोरोना विषाणूचा पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले.  
            गुरुवार दि. ३० एप्रिल २०२० रोजी सांयकाळी ५ वाजेपर्यंत कोरोना विषाणु संदर्भात सायंकाळी ५ वाजेपर्यंत परभणी येथील जिल्हा रुग्णालयात पूर्वीचे ७३२ व आज रोजी दाखल झालेले  ७१ असे एकुण ८०३ संशयितांची नोंद झाली आहे. तर परभणी जिल्हयात आज रोजी कोव्हिड- १९ विषाणु बाधित एकही रुग्ण नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. असेही जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
           -*-*-*-*-

शेतकर्‍यांना खते,बियाणे वेळेवर उपलब्ध करून द्या-पालकमंत्री नवाब मलीक

शेतकर्‍यांना खते,बियाणे वेळेवर उपलब्ध करून द्या-पालकमंत्री नवाब मलीक


परभणी / सोनपेठ (दर्शन) : -

परभणी येथ्लृील जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांक विकास व औकाफ कौशल्य विकास व उद्योजकता तथ्लृा परभणीचे पालकमंत्री नवाब मलीक यांनी खरीप हंगाम 2020 पूर्वतयारीची आढावा बैठक गुरुवार, 30 एप्रिल रोजी घेतली. यावेळी त्यांनी संबंधीत यंत्रणेस खते, बियाणे शेतकर्‍यांना वेळेवर उपलब्ध करून द्यावीत. तसेच महावितरणच्या ट्रान्सफार्मरबाबत बर्‍याच तक्रारी असून या तक्रारींची तत्काळ सोडवणूक करावी अशा सूचना दिल्या.
परभणी येथिल खरीप हंगाम 2020 पूर्व आढावा बैठकीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलीक यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी बैठक घेण्यात आली. या बैठकीस खा.संजय जाधव, आ.सुरेश वरपूडकर, आ.डॉ.राहूल पाटील, आ.मेघना बोर्डीकर साकोरे, जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, मनपा आयुक्त रमेश पवार यांच्यासह प्रशासनातील सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजीकल डिस्टन्स ठेवून तसेच तोंडाला मास्क बांधून या आढावा बैठकीत सर्वांनी हजेरी लावली. यावेळी पालकमंत्री नवाब मलीक यांनी खरीप हंंगाम 2019-20 मध्ये शेतकर्‍यांच्या मागणीनुसार खते व बियाणांचा पुरवठा करण्यात यावा. बियाणे व खतांचा तुटवडा होणार नाही याची सर्वांनी दखल घ्यावी. अनुदानावर वाटप करण्यात येणार्‍या बियाणे योग्य शेतकरी व लाभार्थ्यांना कसा लाभ होईल, याची काळजी घ्यावी असे सूचविले. तसेच जिल्हा अग्रणी बँकेने पुढाकार घेऊन खरीप पिककर्ज वाटपा संदर्भात जास्तीत जास्त ठिकाणी मेळावे घ्यावेत. तसेच वेगवेगळ्या प्रसिद्धी माध्यमातून याची प्रसिद्धी करावी. जास्तीत जास्त शेतकर्‍यांपर्यंत या योजनांचा लाभ देण्यात यावा. खा.संजय जाधव, आ.डॉ.राहूल पाटील यांनीही पालकमंत्र्यांकडे शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर तसेच कोरोनाच्या उपाययोजना संदर्भात सूचना केल्या. पालकमंत्र्यांनी महावितरणच्या तक्रारीबाबत गांभीर्याने दखल घेत शेतकर्‍यांचे ट्रान्सफार्मर जळण्याचे मोठे प्रमाण आहे. संबंधीत ठेकेदार वेळेवर काम करीत नसतील तर शेतकर्‍यांना अडचणीस सामोरे जावे लागेल. यामुळे संबंधीत ठेकेदार कामात कसूर करीत असतील तर त्यांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष आळसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बालासाहेब नागरगोजे, महावितरणचे अभियंता जायभाये आदींची उपस्थिती होती.

Wednesday, April 29, 2020

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना   जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-  

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
       यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांच्यासह उपस्थित अधिकारी - कर्मचाऱ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
                  -*-*-*-*- 

शेतमाल विक्री करण्याकरीता ऑनलाईन नोंदणी ; जिल्हयातील 46776 कापूस उत्पादकाची नोंदणी

शेतमाल विक्री करण्याकरीता ऑनलाईन नोंदणी ; जिल्हयातील 46776 कापूस उत्पादकाची नोंदणी


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी देशात दिनांक 23 मार्च 2020 पासून  लागू करण्यात आलेल्या पहिल्या टप्यातील लॉकडाऊन कालावधीत केंद्रीय कापूस निगम (CCI) यांच्या मार्फत व सीसीआय च्या वतीने महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मार्फत करण्यात येणारी कापूसाची खरेदी स्थानीक स्तरावरील वेगवेगळया  कारणास्तव बंद करण्यात आली होती.

             कोविड – 19 या विषाणू च्या संक्रमणामुळे जिल्हयातील शासकीय खरेदी केंद व कृषी उत्पन बाजार समित्यामधील व्यवहारवर परिणाम होऊन प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत  शेतकऱ्यांनी त्यांच्या कडील शेतमाल विक्रीस आनने कमी केले आहे.

             प्रधान सचिव पणन मंत्रालय मंबई  पणन  संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिनांक 17 एप्रिल 2020 रोजी परिपत्रकाद्वारे दिलेल्या सुचनेनूसार  शेतकऱ्यांकडील FAQ दर्जाचा कापूस खेरदी करणे बाबत ccI व कॉटन फेडरेशन यांना कळविले आहे. त्यानंसार परभणी जिल्हयातील शेतकऱ्यांना शासकीय कापूस खरेदी केंद व  व कृषि उत्पन बाजार समिती कडे शेतमाल विक्री करण्यासाठी त्यांच्या शेतमाल विक्री करण्याकरीता ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन दिनांक 18 एप्रिल 2020 रोजी  पासून https://forms.gle/VUASetva7aDqkGn3A   या लिंक वर नोदंणी करण्यासाठी आवहान करण्यात आले .

            उपरोक्त लिंक वर शेतकरी बांधव यांनी त्यांच्या कडील भ्रमनध्वनीवरुन देखील नोंदणी करुन  शकत असेल्याने दिनांक 18 एप्रिल 2020 ते 27 एप्रिल 2020 च्या सांयकाळी 6.00 परभणी जिल्हयातील बाजार समिती निहाय आकडेवारी  पुढील प्रमाणे आहे.

बाजार समिती चे नाव – ऑन लाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या गंगाखेड- 14611, मानवत -7325, परभणी 7237, सेलू 5472, पाथरी -4330, सोनपेठ – 3613, जिंतूर – 2132, ताडकळस – 739, पूर्णा- 674, बोरी – 643, एकूण 46776.

          शेतकऱ्यांनी ही नोंदणी प्रकीया घरामध्ये राहूनच त्यांच्या कडील भ्रमध्वनीवरुन / संगणाकवरुन केलेली असेल्याने शेतकऱ्यांची बाजार समिती मध्ये टोकन घेण्यासाठी होणारी गर्दी जिल्हा प्रशासन यशस्वी झाले असून केंद्र शासन व राज्य शासनाने कोविड – 19 या विषाणू न होण्यासाठी ज्या मार्गदार्शक सूचना निर्गमीत केलल्या आहेत त्यानुसार  सोशल डिस्टन्स चे पालन होण्यासाठी फार मोठया प्रमाणात मदत होऊन कोविड -19 या विषाणू च्या संक्रमाण होण्यासाठी प्रतिबंधक झालेला आहे.

            शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस विक्रीस घेवून येते वेळी सोशल डिसटन्स व इतर मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

            केंद्रीय कापास निगम लि.CCI महाराष्ट्र राज्य कापूस सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ यांचया कडे शेतकऱ्यांना त्यांचया शेतमाल विक्री करण्यासाठी मा. दि.म.मुगळीकर, जिल्हाधिकारी परभणी, विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे, प्रभारी विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महा संघ म विभागीय कार्यालय श्री.रेणके, परभणी जिल्हयातील सर्व कृषि उत्पन बाजार समितीचे  सभापती यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाची विक्री होण्यासाठी  बाजार समितीने  दिलेल्या सुचने नुसार कार्यावाही करण्याचे आवाहन  केलेले आहे.

             शेतऱ्यांनी ज्या बाजार समितीकडे नोंदणी केली आहे. त्या बाजार समितीकडून  दोन दिवस अगोदर दिनांक निहाय  नोंदणी क्रमांने SMS किंवा भ्रमनध्वनीद्वारे  फोन करुन  कळविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना त्यांचा कापूस विक्रीची ऑनलाईन नोंदणी  करण्यासाठी गुगल लिंक तयार करण्यासाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद, परभणी  INC चे अधिकारी  सुनील पोटेकर,निवासी उपल्हिाधिकारी अंकूश पिनाटे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, मंगेश सुरवसे यांनी असे  कळविले आहे.

                                                                     000000

नागरिकांनी ई- संजीवनी ओ.पी.डी. सेवेचा लाभ घ्‍यावा - जिल्‍हाधिकारी श्री. मुगळीकर

नागरिकांनी ई- संजीवनी ओ.पी.डी. सेवेचा लाभ घ्‍यावा - जिल्‍हाधिकारी श्री. मुगळीकर



परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

भारत सरकारकडून ई-संजीवनी ऑनलाईन ओ.पी.डी. सेवेस प्रांरभ झालेला आहे असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी ई - संजीवनी ओ.पी.डी. सेवेचा घरात राहुन लाभ घ्यावा व घराबाहेर पडणे टाळावे. असे आवाहन जिल्हाधिकारी  दी.म. मुगळीकर यांनी केले आहे. 
      भारत सरकारच्या आरोग्य व कुंटुब कल्याण मंत्रालयामार्फत ई - संजीवनी ऑनलाईन ओ . पी . डी . सेवेस प्रांरभ झालेला आहे. esanjeevaniopd.in या पोर्टलवर नागरिकांना आरोग्य विषयक सल्ला घेता येईल जेणेकरुन रुग्णांना घराबाहेर पडावे लागणार नाही किंवा रुग्णालयात न येता सोशल डिस्टन्स पाळता येईल. नागरिकांनी या संकेत स्थळावर स्वतःच्या मोबाईल क्रमांकाद्वारे रजिस्ट्रेशन करावयाचे असून त्यानंतर डॉक्टरांशी संवाद साधता येईल.   डॉक्टरांनी दिलेल्या सल्ला व औषधोपचार ई . प्रिस्क्रिप्शनद्वारे डाऊनलोड करता येईल. ई - संजीवनी ऑनलाईन ओ . पी . डी . ची वेळ सकाळी ९ : ३० ते दुपारी १ :३० अशी ठेवण्यात आलेली आहे. सदरील सेवा ही आठवडयातुन सोमवार ते शनिवार अशी असुन रविवारी ही सेवा बंद राहील. सदरील वैद्यकीय सेवा व सल्ला हा मोफत देण्यात येणार आहे. 
     कोरोना विषाणु संदर्भात बुधवार दि. २९ एप्रिल २०२० रोजी  सायंकाळी ५ वाजेपर्यंत परभणी येथील जिल्हा रुग्णालयात पूर्वीचे ७१६ व आज रोजी दाखल झालेले १६ असे एकुण ७३२ संशयितांची नोंद झाली असून जिल्हयात कोव्हिड- १९ विषाणु बाधित एकही रुग्ण नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
            -*-*-*-*- 

Tuesday, April 28, 2020

परभणी जायकवाडी परिसरातील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयांना जिल्हाधिकारी मुगळीकर यांची अचानक भेट...! 💥जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक दिलेल्या भेटीमुळे उपस्थित कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली़💥

परभणी जायकवाडी परिसरातील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयांना जिल्हाधिकारी मुगळीकर यांची अचानक भेट...!
💥जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक दिलेल्या भेटीमुळे उपस्थित कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली़💥



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

परभणी येथील जायकवाडी परिसरातील जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयांना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचाकन भेट दिली़ या भेटीमुळे उपस्थित कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली़

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व आ़ डॉ़ राहुल पाटील मंगळवारी जायकवाडी परिसरात पोहचले़ हा कार्यक्रम आटोपल्यानंतर आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्यासह जिल्हाधिकाºयांनी याच भागात असलेल्या जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक १० या कार्यालयास भेट दिली़ यावेळी कार्यालयामध्ये केवळ एक कर्मचारी उपस्थित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले़ या भागात जायकवाडीचे जुने बंद असलेले विश्रामगृह असून, त्याच्या पाठीमागील बाजूस जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक १० या कार्यालयाचे कामकाज चालते़ जिल्हाधिकाºयांनी कार्यालयास भेट दिली

त्यावेळी या कार्यालयात एकच कर्मचारी उपस्थित होता़ इतर कर्मचाºयांविषयी विचारणा केली असता, ते लवकरच येतील, असे जिल्हाधिकारी यांना सांगण्यात आले़ या कार्यालयाच्या शेजारीच असलेल्या लघु पाटबंधारे विभाग क्रमांक २ कार्यालयासही मुगळीकर यांनी भेट दिली़ या ठिकाणीही केवळ एक महिला कर्मचारी उपस्थित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले़ राज्य शासनाने कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ५ टक्क्यांनी वाढ केली असून, एकूण कर्मचाºयांच्या तुलनेत किमान १० टक्के कर्मचारी उपस्थित असणे अपेक्षित होते; परंतु, दोन्ही कार्यालयात कर्मचाºयांची उपस्थिती दिसून आली नाही़ त्याच प्रमाणे या परिसरातील अस्वच्छतेबाबतही मुगळीकर यांनी नाराजी व्यक्त केली़ एकंदर जिल्हाधिकारी यांच्या अचानक भेटीने उपस्थित कर्मचाऱ्यांची धावपळ झाल्याचे पहावयास मिळाले़.

जिल्हयात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 ची मुदत 3 मे पर्यंत वाढविली

जिल्हयात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 ची मुदत 3 मे पर्यंत वाढविली


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

कोरोना विषाणूंचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 च्या कलम 144 प्रमाणे दि. 30 एप्रिल 2020 पर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आले होते परंतु राज्य शासनाने दि . 17 एप्रिल 2020 रोजीच्या आदेशाव्दारे दि. 3 मे 2020 पर्यंत लॉकडाउनबाबत आदेश जारी केले आहेत. त्याअनुषंगाने परभणी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने दि . 22 मार्च 2020 व त्यानंतर वेळोवेळी काढलेल्या आदेशाचा कालावधी दि. 3 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे . तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, निर्देश या कालावधीत अंमलात राहतील. असे सुधारीत आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी जारी केले आहेत.
      -*-*-*-*-

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व शेतकरी योजनेअंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळत नसलेल्याना लाभ मिळणार - जिल्हाधिकारी (मे महिन्याचे धान्य २७ एप्रिलपासून वाटपास सुरुवात)

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व शेतकरी योजनेअंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळत नसलेल्याना लाभ मिळणार - जिल्हाधिकारी 
(मे महिन्याचे धान्य २७ एप्रिलपासून वाटपास सुरुवात)


 परभणी / सोनपेठ (दर्शन)  :-

जिल्ह्यातील तहसिल कार्यालय व संबंधित रास्तभाव दुकानदारांकडे असलेल्या डी- १ रजिस्टरवरील नोंदीनुसार पिवळी अथवा एपीएल ( केशरी ) शिधापत्रिका असलेल्या परंतू राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व शेतकरी योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळत नसलेल्या सर्व शिधापत्रिकाधारकांना या योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येणार आहे. अशी माहिती  जिल्हाधिकारी दी. म. मुगळीकर यांनी दिली. 
       शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत व एपीएल केशरी शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या , एपीएल ( केशरी ) शिधापत्रिकाधारकांना कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर पुढील २ महिन्याच्या कालावधीकरीता सवलतीच्या दराने गहु  ८ रुपये  प्रतिकिलो व तांदूळ  १२ रुपये  प्रतिकिलो या दराने प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ याप्रमाणे ५ किलो अन्नधान्याचा लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
         परभणी जिल्हयाकरिता ७८ हजार ११९ एपीएल ( केशरी ) शिधापत्रिका व त्यावरील 3 लाख 3६ हजार ७७१ लाभार्थी संख्यानुसार नियतन प्राप्त झाले असुन सदर लाभार्थ्याना मे  २०२० या महिन्यात एकुण गहू १ हजार १० मे . टन व तांदुळ ६७४ मे . टन वाटप करण्यात येणार आहे . 
तसेच या व्यतिरिक्त संगणक प्रणालीवरील NPH शिधापत्रिका, डिलीट झालेल्या शिधापत्रिकांना संबंधित शिधापत्रिकाधारकाकडे प्रत्यक्ष उपलब्ध असलेल्या पिवळया, एपीएल ( केशरी ) शिधापत्रिकांच्या आधारे त्या शिधापत्रिकाधारकास सदरील योजनेतील अन्नधान्याचा लाभ देण्यात येणार आहे. थोडक्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना , तसेच एपीएल शेतकरी योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळत नसलेल्या सर्व पिवळया व एपीएल ( केशरी शिधापत्रिकाधारकास या योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येणार आहे . तसेच सदरील योजनेचा लाभ घेताना संबंधित लाभार्थ्यांनी रास्तभाव दुकानदाराकडे उपलब्ध असलेल्या विहीत नमुन्यात कुटूंबाची माहिती उपलब्ध करुन देणे अनिवार्य राहिल. 
             सर्व शिधापत्रिकाधारकांना माहे मे मधील धान्य २७ एप्रिल 2020 रोजीपासून रास्त भाव दुकानदारांकडून वाटप सुरु झाले आहे.  तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत असलेल्या काही पात्र शिधापत्रिका Silent RC मध्ये वर्ग झालेल्या असतील अशा शिधापत्रिका अन्नधान्य मिळण्यापासून वंचित राहू नये म्हणून अशा शिधापत्रिकाधारकाने अन्नधान्याची मागणी रास्तभाव दुकानदाराकडे केल्यास त्यांच्याकडून हमीपत्र घेऊन धान्य वितरीत करण्यात येणार असल्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती स्वाती सूर्यवंशी यांनी सांगीतले. असे जिल्हाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-

परभणीतील त्या एकमेव कोरोनामुक्त युवकास डिस्चार्ज ; 674 पैकी 623 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह

परभणीतील त्या एकमेव कोरोनामुक्त युवकास डिस्चार्ज ; 674 पैकी 623 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह


जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असणा-या त्या युवकाचा तिसरा स्वॅब निगेटीव्ह आल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाने त्याला मंंगळवारी(दि.28) सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोना विषाणु संदर्भात 716 संशयितांची नोंद झाली. 674 पैकी 623 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. 32 स्वॅब अहवाल प्रलंबित नाही. आजपर्यंत 18 जणांचे स्वॅब एनआयव्ही (राष्ट्रीय विषाणू संस्था) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद यांनी तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे. मंगळवारी नव्याने 31 संशयित जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे अधीचे 685 व आजचे 31 असे एकूण 716 पर्यंत संशयितांची नोंद झाली असून विलगिकरण कक्षात 277, रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात  41 जण आहेत. विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झालेले 398 जण आहेत. 62 जण परदेशातून आलेले असून त्यांच्या संपर्कात आलेले 6 जण आहेत. दरम्यान, जिल्ह्यात मंगळवारी (दि.28) सायंकाळी पाच वाजेपर्यंत विषाणु बाधित एकही रुग्ण नसल्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी जाहीर केले.

Monday, April 27, 2020

वैद्यकीय सेवा देणाऱ्या आस्थापनांनी संगणकीय प्रणालीचा वापर करून माहिती सादर करावी - जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर (दैनंदिन अहवाल भरणे बंधनकारक)

वैद्यकीय सेवा देणाऱ्या आस्थापनांनी संगणकीय प्रणालीचा वापर करून माहिती सादर करावी - जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर (दैनंदिन अहवाल भरणे बंधनकारक)


परभणी / सोनपेठ (दर्शन)  :- 

जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध असणाऱ्या वैद्यकीय सामुग्रीची तसेच दैनंदिन तपासणी झालेल्या रुग्णांची माहिती संकलित करण्यासाठी 'हॉस्पिटल इन्फॉर्मेशन कलेक्शन सिस्टीम' ही संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे. तरी शहरातील सर्व वैदयकीय सेवा देणाऱ्या आस्थापना, सरकारी व खाजगी दवाखाने  यांनी या प्रणालीचा वापर करून माहिती सादर करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी केले आहे.
        संगणकीय प्रणाली सोमवार दि. २७ एप्रिल २०२० पासून  https://www.collectorpbn.in/hics/ या वेब अॅड्रेसवर कार्यान्वित करण्यात आली असून नोंदणी करतेवेळी आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधा तसेच वैद्यकीय स्टाफ आदी माहिती भरावयाची आहे. हॉस्पिटलबाबत नोंदणी करतांना एकच मोबाईल नंबर प्रत्येक हॉस्पिटलने भरावा कारण हा मोबाईल नंबर म्हणजेच दैनंदीन माहिती भरण्यासाठीचा यूजर आयडी असणार आहे . यापुर्वी प्रसिद्ध केलेल्या गुगल फॉर्म मध्ये नोंदणी केलेल्या हॉस्पिटलने परत नोंदणी करावयाची आवश्यकता नाही. दैनंदीन माहिती मध्ये सर्व हॉस्पिटल मधील रिक्त बेडची संख्या तसेच तपासलेल्या रुग्णांची संख्या ही माहिती भरावयाची आहे. रोज रात्री 9 वाजेपर्यंत त्या दिवसाचा दैनंदिन अहवाल भरणे बंधनकारक आहे. असे आदेश जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर यांनी सर्व हॉस्पिटल्स प्राधिकरणांना दिले आहेत.
     जिल्ह्यातील वैद्यकीय सामुग्रीची तसेच दैनंदीन तपासणी झालेल्या रुग्णांची माहिती संकलित करण्यासाठी जिल्हाधिकारी  दी.म. मुगळीकर यांच्यामार्फत Hospital information collection System ( HICS ) ही संगणक प्रणाली तयार करण्यात आली असून प्रणालीची निर्मिती जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनील पोटेकर यांच्या संघाने केली आहे. असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, परभणी  यांनी कळविले आहे.
           -*-*-*-*-

जिल्हाभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची अफवा बीडमध्ये एकही रुग्ण नाही -डॉ.अशोक थोरात

जिल्हाभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची अफवा बीडमध्ये एकही रुग्ण नाही -डॉ.अशोक थोरात


बीड / सोनपेठ (दर्शन):- 

बीड शहरातच नव्हे तर जिल्हाभरात कोरोनाबाधीत एकही रुग्ण नसून संशयितांचे स्वॅब रोज पाठवले जात आहेत. ते निगेटिव्ह येत आहेत. आतापर्यंत दीडशेपर्यंत लोकांचे स्वॅबचे नमुने निगेटिव्ह आले असून शहरात कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण नाही. त्यामुे अफवांवर कोणीही विश्‍वास ठेवून ये त्याचबरोबर अफवा पसरवू नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी केले. आज तीन संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
आज सकाळपासूनच बीड शहरात कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळल्याची अफवा मोठ्या प्रमाणावर पसरली होती. शहरातील वेगवेगळ्या भागांचे नाव घेऊन ही अफवा वाढत चालली. कुठे एक आढळला तर कुठे तीन पॉझीटिव्ह रुग्ण आढळल्याची अपवा पसरत असताना रिपोर्टर कार्यालयातही अनेकांनी भ्रमणध्वनीवरून याबाबत खातरजमा केली. सदरची अफवा पसरत असल्याचे पाहून सा.सोनपेठ दर्शन प्रतिनिधीने थेट जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांना याबाबत भ्रमणध्वनीवरून विचारले असता अद्याप पावेतो कोरोना पॉझीटिव्ह एकही रुग्ण शहरात अथवा जिल्ह्यात नसून अफवांवर कोणीही विश्‍वास ठेवू नये, अफवा पसरू नये, आज तीन संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

त्या युवकाचा तिसरा स्वॅब निगेटीव्ह, परभणी जिल्हा कोरोनामुक्त तरी सोशल डिस्टसिंगचे पालन तंतोतत करावे - जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर


त्या युवकाचा तिसरा स्वॅब निगेटीव्ह, परभणी जिल्हा कोरोनामुक्त तरी सोशल डिस्टसिंगचे पालन तंतोतत करावे - जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर 


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

जिल्ह्यातील एकमेव कोरोनाग्रस्त युवकाचा तिसरा स्वॅब अहवाल ही निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे परभणी जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे असेच म्हणावे लागेल. या युवकांचा स्वॅब अहवाल सोमवारी (ता.27) सकाळी जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला आहे.परभणी जिल्ह्यात ता. 13 एप्रिल रोजी हिंगोली जिल्ह्यातून परभणीत पाहूणा म्हणून आलेल्या एका 21 वर्षीय तरूणाला कोरोनाची लागण झाल्याचे त्याच्या तपासणी अहवालात नमुद केले होते. त्यामुळे या युवकाला परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु होते. तो त्याच्या 5 नातेवाईकांसह इतर 9 जणांच्या संपर्कात आला होता. त्या सर्वांना कॉरन्टाईन करण्यात आले होते. त्या सर्वांचे दोन अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तरूणांचा शनिवारी दुसरा स्वॅब अहवाल घेतला होता.तो देखील निगेटीव्ह आला होता. त्यानंतर 24 तासात दुसरा स्वॅब घेवून तो तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल सोमवारी सकाळी प्राप्त झाला आहे. हा अहवाल निगेटीव्ह आला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. तरी लोकांनी सोशल डिस्टसिंगचे पालन करावे जरी परभणी जिल्हा कोरोना मुक्त झाला असला तरी लोकांनी काळजी घ्यावी.सोशल डिस्टसिंगचे पालन तंतोतत करावे असे अवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.

Sunday, April 26, 2020

श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयांच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने "ओपन असेस ई.रिसोर्सेस ऑनलाइन वेबीनार" संपन्न

श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयांच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने "ओपन असेस ई.रिसोर्सेस ऑनलाइन वेबीनार" संपन्न






 सिरसाळा / सोनपेठ (दर्शन)  :- 

परळी तालुक्यातिल मौजे सीरसाळा येथिल श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयांच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने ओपन असेस ई. रिसोर्सेस या विषयावर दि. 26  रोजी वेळ सकाळी 11 वा. ऑनलाइन वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते.प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.कदम एच पी यानी वेबिनार आयोजना मागचा उद्देश स्पष्ट केला.
प्रमुख अतिथी म्हणून हरिसिंग गोर विद्यापीठाच्या एच आर डी सी संचालक डॉ आर टी बेंद्रे यांनी मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या.प्रमुख पाहुणे डॉ गजानन खिस्ते (डॉ बामु विद्यापीठ) यांनी ओपन असेस ई. रिसोर्सेस या विषयावर मार्गदर्शन करताना ऑनलाइन ऑडिओ पुस्तके, पी डी एफ पुस्तके, न्यूज पेपर, वेगवेगळ्या डिक्शनरीज, संशोधन साहित्य, शोधप्रबंध , विविध विषयाचे साहित्य हे आपणास विविध वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि त्यांचा उपयोग आपण या लॉकडाऊन वेळात केला पाहिजे असे मत व्यक्त केले.
दुसऱ्या सत्रात श्री विठ्ठल तंबुड (वनस्पतीशास्त्र विभाग) सरानी गुगल फार्म बनविणे, विविध ऑनलाइन प्रस्नावली बणविने ई बाबी सविस्तर मार्गदर्शन केले.या वेबिनारचे समन्वयक डॉ मस्के डी बी (ग्रंथपाल ) यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रा. विक्रम धनवे यांनी व्यक्त केले.या ऑनलाइन वेबिनार मध्ये 90 विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधकांनी सहभाग नोंदवला.

महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन 


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-  

महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
       यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्यासह उपस्थित अधिकारी - कर्मचाऱ्यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
                                  -*-*-*-*- 

Saturday, April 25, 2020

परभणीकरांना दिलासा ! पॉझिटिव्ह रुग्णाचा दुसरा स्वॅब अहवाल आला निगेटिव्ह ; पुन्हा ग्रीन झोनच्या आशा पल्लवीत (परभणी त्रीमुर्तीचे सर्वस्तरातुन अभिनंदन)

परभणीकरांना दिलासा ! पॉझिटिव्ह रुग्णाचा दुसरा स्वॅब अहवाल आला निगेटिव्ह ; पुन्हा ग्रीन झोनच्या आशा पल्लवीत
(परभणी त्रीमुर्तीचे सर्वस्तरातुन अभिनंदन)




परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णाचा दुसरा स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला आहे़ आता २४ तासानंतर रविवारी तिसरा स्वॅब या तरुणाचा घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली़

हिंगोली जिल्ह्यातील एक तरुण १३ एप्रिल रोजी पुण्याहून दुचाकीने परभणीतील एमआयडीसी भागात नातेवाईकांकडेआला होता़ या तरुणाची जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी करण्यात आल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता़ त्यामुळे परभणी जिल्ह्यात पहिल्यांदाच या तरुणाच्या निमित्ताने कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले़ त्यानंतर या तरुणाच्या संपर्कात आलेल्या ९ नातेवाईक आणि अन्य १९ अशा २८ जणांचेही स्वॅब घेण्यात आले होते़ या सर्व २८ जणांचे स्वॅब अहवाल दुसऱ्यांदाही निगेटिव्ह आले़ त्यानंतर शनिवारी सायंकाळी कोरोना पॉझिटिव्ह तरुणाच्या स्वॅबचा दुसरा अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला़ त्यामध्ये सदरील स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली़ आता २४ तासानंतर म्हणजेच रविवारी तिसरा स्वॅब या तरुणाचा घेतला जाणार आहे़.या सुनियोजीत कार्यासाठि मा.जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर , मा.शल्य चिकित्सक बाळासाहेब नागरगोजे व पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांचे सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.

💥💥💥💥💥💥💥💥
सा.सोनपेठ दर्शन संपादक किरण रमेश स्वामी तसेच पंचक्रोशितील तमाम जनतेच्या वतीने मा.जिल्हाधिकारी साहेब अभिनंदन आपले तसेच सर्व डाँक्टर्स, नर्स, कम्पाऊडर्स, महसुल कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी व पोलिस प्रशासन.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 60 वा वर्धापन दिन समारंभानिमित्त पालकमंत्री श्री.नवाब मलिक यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 60 वा वर्धापन दिन समारंभानिमित्त पालकमंत्री श्री.नवाब मलिक यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

(संग्रहीत-छायाचित्र)

परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात 'महाराष्ट्र दिन' हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करणेबाबत निर्देश प्राप्त झाले  आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 60 वा वर्धापन दिन समारंभानिमित्त शुक्रवार दि. 1 मे , 2020 रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे सकाळी 8 वाजता  आयोजित करण्यात आला असून अल्पसंख्याक विकास व औकाफ , कौशल्य विकास व उदयोजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री  श्री.नवाब मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होणार आहे.
            शासन परिपत्रकात नमुद केल्याप्रमाणे ध्वजारोहणाच्या वेळी पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद हे उपस्थित राहतील. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी  उपस्थित राहु नये.  तसेच सर्व उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालये व तहसील कार्यालये येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येवू नये. शासनाच्या पत्रात नमुद केल्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय , परभणी वगळता जिल्हयात अन्य कोणत्याही ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येवु नये. असे जिल्हाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.
                        -*-*-*-*-

मुस्लिम बांधवांनी रमजान मध्ये इफ्तार व नमाज घरी राहूनच करावे – सद्दाम हुसेन

मुस्लिम बांधवांनी रमजान मध्ये इफ्तार व नमाज घरी राहूनच करावे – सद्दाम हुसेन






सोनपेठ (दर्शन) :--

कोरोना विषाणू ला रोखण्यासाठी सरकारने लॉक डाउन लागू केले आहे त्यामुळे बाजारपेठ, धार्मिक स्थळे बंद आहेत अशा स्थितीत आज पासून मुस्लिम बांधवांचा पवित्र महीना रमजान सुरू झाला आहे या कालावधीत इफ्तार व नमाज पठण घरात राहूनच करण्याचा संकल्प संपूर्ण मुस्लीम समाजाने केला असून या काळात रमजान चे उपवास इफ्तार व नमाज पठण सोनपेठ पंचक्रोशितील तमाम मुस्लिम बांधवांनी घरी राहूनच करावे व शासनाच्या सुचनांणचे पालन करावे असे अवाहन इखरा मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सद्दाम हुसेन यांनी केले आहे,


Friday, April 24, 2020

आद्य भारतीय समाज सुधारक - महात्मा बसवेश्वर - प्रा.विलास साखरे

आद्य भारतीय समाज सुधारक - महात्मा बसवेश्वर - प्रा.विलास साखरे


               आपल्या भारत देशाला रुढी-परंपरा चा जसा पुरातन वारसा प्राप्त झाला आहे, त्याचप्रमाणे धर्म आणि समाज व्यवस्थेमध्ये दोषही आहेत. अशावेळी स्वतःच्या जीवनाचा विचार न करता या पुण्यभूमी ला लाभलेले अनेक महामानव आहेत. त्यांनी आपले संपूर्ण जीवन खर्च करून या पुण्यभूमी ला पुण्य बनवण्यासाठी प्रयत्न केले.
            मध्ययुगात बाराव्या शतकामध्ये धर्म व समाजव्यवस्थेमध्ये कर्मकांड, दैववाद, यज्ञ, प्रथा ,स्त्रीदास्य, विषमता स्पृश्य-अस्पृश्य भेद यासारख्या अधर्माचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते, अशावेळी क्रांतिकारी विश्व ग्रुप महात्मा बसवेश्वरांच्या उदय झाला.
             महात्मा बसवेश्वर महाराज यांचा जन्म कर्नाटक मधील विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी या गावातील बागेवाडी या आग्रहाचे प्रमुख आधी राज व मादल अंबिका यांच्या पोटी झाला. महात्मा बसवेश्वर यांना परंपरागत पद्धतीने धार्मिक व इतर संस्कार बालपणापासून केल्या जाऊ लागले होते. याच वेळी त्यांची शिक्षणाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. ग्रहांमध्ये मुलांना सुरुवातीपासूनच संस्कृत शिकवल्या जात होते. त्यामध्ये वेद, पुराण, व्याकरणे, तर्कशास्त्र अशा अनेक प्रकारचे त्यांना ज्ञान दिल्या जात होते. त्यामुळे प्रखर बुद्धिमत्ता व निर्भीडपणा असलेल्या बसवेश्वरांना यावेळी समाज जीवनपद्धती व ग्रंथांमध्ये दाखवलेल्या आदर्श यामध्ये फार मोठी विसंगती जाणू लागली.
             तात्कालीन धर्म परंपरेनुसार वयाच्या आठव्या वर्षीच बसवेश्वर महाराजांवर मौजी बंधनाचे संस्कार करण्यात येऊ लागले. पण हे संस्कार महात्मा बसवेश्वरांना लहानपणापासून खटकू लागले होते.त्यांचे म्हणणे असे होते की जसे माझे संस्कार केले जात आहेत असे त्यांच्या बहिणीचे म्हणजे नागम्मा यांचेही व्हावेत. पण त्यावेळी धर्म परंपरा आहे मान्य नव्हते. त्यामुळे बसवेश्वर महाराज आणि तेव्हाच त्या धर्म परंपरा विरुद्ध बंड पुकारला होता ते म्हणतात की स्त्री आणि पुरुष भेद करणारा असा कोणता धर्म परंपरा आहे, आणि ही परंपरा मला मान्य नाही. त्याच वेळी महात्मा बसवेश्वर यांनी निश्चय केला की स्वतःच्या बुद्धीला पटेल असेच निर्णय आपण इथून पुढे घ्यायचे व जुन्या रूढी-परंपरांना बाजूला करायचे.
                    महात्मा बसवेश्वर यांनी समाजामध्ये धार्मिक कर्मकांड साठी केले जाणारे यज्ञविधी होमहवन अजिबात पटत नव्हते. यज्ञासाठी दिलेला बोकडबळी तर बसवेश्वरांना महाराजांना फार वेदना देत होता. ते आपल्या एका वचनात म्हणतात,
"""अरे बोकडा, रड रे बाबा!
वेद वाचणार्‍या समोर रे बाबा!
शास्त्र ऐकणाऱ्या समोर रे बाबा !
तुझ्या रडण्याने योग्य शासन करतील, कुंडल संघम देव."""
       तुम्ही बाबा यातूनच महात्मा बसवेश्वर महाराजांच्या हृदयाची तळमळ तुम्हाला दिसून येईल. त्या बोकडाला ते म्हणत आहेत की तू त्यांच्या पाया पडते तुला मोक्ष देतील. यामुळेच महात्मा बसवेश्वर महाराजांना यज्ञविधी होमहवन पसंत नव्हते.
            अशाप्रकारे कुटुंब आणि समाजात सुरू असलेले सामाजिक व धार्मिक कर्मकांड व विषमतेवर आधारलेले अमानविय व्यवहार चिकिस्तक बुद्धीला महात्मा बसवेश्वर यांना अजिबात पटले नाही. म्हणून वैचारिक व सैद्धांतिक मतदानामुळे त्यांनी आपले घर व गाव सोडण्याचा निर्णय घेतला. महात्मा बसवेश्वर स्वतंत्र विचाराचे व विवेकी असे व्यक्ती होते. त्यांच्या आशा विवेकी निर्णयाला त्यांची मोठी बहीण नागम्मा यांनी त्यांना चांगले पाठबळ सुद्धा दिले. त्यामुळे महात्मा बसवेश्वर कृष्णा-मलप्रभा या ठिकाणी आले. कुंडल संगम अग्रहार असून शेव धर्माचे माहेरघर होते. या मंडळाचे अधिपती म्हणून ईशान्य ग्रुप काम पाहत होते. त्यांनी महात्मा बसवेश्वर यांची चांगल्या प्रकारे परीक्षा घेतली व त्यांची कुशाग्र बुद्धी पाहून त्यांना मठामध्ये राहण्यास व ध्यान करण्यास अनुमती दिली. आणि आता बसवेश्वर महाराजांचे आई-वडील नाते जे काही असेल ते सर्व आता हेच होतं.
              कुंडल संगम या ठिकाणी बारा वर्षे राहून महात्मा बसवेश्वरांनी अध्ययन केले. धामण धर्माशी संबंधित सर्व ग्रंथांचे विविध विद्या व शास्त्राचा समावेश होता. ईशान्य गुरुंनी सुद्धा विद्वान व उदारमतवादी बसवेश्वर महाराजांना उपयुक्त ठरणारे योग्य अधिष्ठान उपलब्ध करून दिले. महात्मा बसवेश्वरांनी वैद्यक ग्रंथ दर्शन पुराण आगम आदी साहित्याची वाचन मनन व चिंतन केले. शिवपुराण, लिंगपुराण, स्कंदपुराण तुला गम ,वातूळ, तंत्र संहिता  यासारख्या ग्रंथांवर प्रभुत्व मिळवले होते. प्रत्यक्ष जीवनामध्ये त्यांनी खूप अनुभव घेतले होते. त्यांनी अनुभव सत्संग त्यांचे निवासस्थान सोडून मंदिरे तीर्थक्षेत्र ते चारधाम होण्यापेक्षा पांगळा कर जणांचे वर्तन त्यांची मंगलमूर्ती पाहण्याऐवजी परस्त्री परधन दैवत लोगिक भागापेक्षा पाहण्यापेक्षा अंध बनव असे काही वचन मध्ये त्यांनी नमूद केले आहे.तात्कालीन परंपरा आणि कर्मकांड अंधश्रद्धेविरुद्ध त्यांनी चांगल्याप्रकारे वचन लिहून लोक उद्धाराचे काम केले होते. यातूनच त्यांच्या ज्ञानाचे आकलन केले जाऊ शकते.
        महात्मा बसवेश्वर महाराजांनी आपल्या कार्याचा प्रारंभ केला तो मंगळवेढा येथून.मामा मला देवाने बसवेश्वरांना आपली मुलगी गंगा भिका देण्याचा निर्णय घेतला व त्यांचा विवाह संपन्न झाला. त्यानंतर त्यांच्या मामा मंत्री यांनी व सहकाऱ्यांनी महात्मा बसवेश्वर यांना कारकून पदाची नोकरी दिली. राजा बिजवल मोठ्या अधिकार व वैभवाने राज्य करीत होता. बसवेश्वर महाराजांनी आपला प्रामाणिकपणा व्यक्तींशी रपणा कामाची चिकाटी व कार्य निष्ठेमुळे बिजू राज्याच्या दरबारामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले. एके वेळी खोदकाम करताना कामगारांना एक अनाकलनीय ताम्रपट मिळाला. त्यामध्ये असे लिहिले होते की की राज्याच्या सिंचनाखाली खूप मोठे धन-दौलत आहे. तर हे ताम्रपट कोणाला तू असता येत नव्हते तर महात्मा बसवेश्वरांनी हे वाचून तिथे खोदकाम करण्यात आले तर खरंच त्या ठिकाणी धन सापडले. त्यामुळे बिजरा ने महात्मा बसेश्वर खुश होऊन त्यांचा यथोचित गौरव केला. त्यांच्या या प्रामाणिकपणा आणि कौशल्याच्या जोरावर त्यांची खजिनदार पदापर्यंत कारभार गेला. त्यावेळी बीजल राजाने कल्याण राज्य जिंकले होते आणि त्या राज्याचे महामंत्री म्हणून बसवेश्वर महाराज यांची निवड केली.
           कल्याण ला आल्यानंतर बसव विचारांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ लागला. येणाऱ्या लोकांमध्ये अनेक वर्गातील जातीतील स्तरातील लोकांचा समावेश होता कल्याण येथे बसवेश्वरांनी वर्णाश्रम व्यवस्था जातिभेद अस्पृश्यता स्त्री दास्यत्व धार्मिक कर्मकांड व सामाजिक अन्याय अत्याचाराच्या उच्चाटनासाठी अनुभव मंडपाची स्थापना केली. अनुभव मंडपामध्ये संपूर्ण देशातून विद्वान असे शरण सामील होऊ लागले. तिथे सगळ्या प्रकारे चर्चा होत असे. या अनुभव मंडपाचे अध्यक्ष म्हणून अल्लंप्रभू यांनी अध्यक्ष पद भूषविले होते. याठिकाणी सामाजिक आर्थिक शैक्षणिक धार्मिक मिक्व संस्कृतिक अशा अनेक विचारांवर चर्चा होत असे. 
          सहाजिकच महात्मा बसवेश्वर महाराज यांचे शरण हे पूर्ण जगा मधून त्यांना शोधत येत होते. त्यांची प्रसिद्धी वाढली होती. कश्मीर व अफगाणिस्तानचे राजे सुद्धा त्यांना घेऊन शरण गेले होते. हे सर्व पाहून बीजल राजाला काही धर्मभ्रष्ट लोकांनी कान भरणे करून त्यांच्या विचारात महात्मा बसवेश्वर यांच्याविरुद्ध कटकारस्थान टाकण्यास भाग पाडले. भिजला ना वाटले की महात्मा बसवेश्वर हे माझ्या विरुद्ध बंड पुकारले म्हणून त्यांनी शरण यांच्या हत्या करण्यास व महात्मा बसवेश्वर यांचे विचार थांबवण्यास सांगितले. याचा गैरफायदा घेऊन त्यावेळेच्या धर्म भ्रष्ट लोकांनी शरण यांच्या हत्या करण्यास सुरुवात केली. महात्मा बसवेश्वर महाराजांना हे बनवल्या गेले नाही. खरं तर तेव्हाच कल्याण क्रांतीची सुरुवात झाली होती. तेव्हाचे शरण सुद्धा हातावर हात न ठेवता त्यांनी ही शस्त्र उचलली. खरेतर त्यावेळी जे वचन साहित्य क्षणांनी लिहिलेले होते त्याला नष्ट करण्यासाठी तेव्हाचा लोकांनी खूप प्रयत्न केले. पहिल्या अनुभव मंडपामध्ये 770 शरण होते. त्यात 70 शरणी होत्या. खूप मोठ्या प्रमाणात हे साहित्य लिहिल्या गेले होते आणि ते जन उद्धाराचे प्रतीक म्हणून समोर येत होते. आणि या वचनांना जिथे ठेवण्यात आले होते त्या भांडणांना काही लोकांनी आग लावून दिली होती.
         बसवेश्वरांनी कल्याण क्रांतीमधील विविध घटना त्यातील हिंसा निष्पाप शर्मांच्या कत्तली या गोष्टी मनाला लावून घेतल्या. बसवेश्वर अतिशय संवेदनशील मनाचे होते मी जे आदर्श समाज निर्मितीचे ध्येय समोर ठेवले होते त्यासाठी जी चळवळ उभी केली होती तिची वाटचाल कशी आणि कुणीकडे होत आहे हे कदाचित न पाहण्याने बसवेश्वरांनी ज्या संगमेश्वराच्या सान्निध्यात त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन हे जनसेवेचे मानवतावादी कार्य सुरू केले होते त्याच कुंडली संगम क्षेत्री त्यांनी या भु तलाचा चा निरोप घेतला.
             महात्मा बसवेश्वरांनी असे काही काम केले होते की त्यावेळी ते करणे म्हणजे जे काही सोपे नव्हते. त्यांनी केलेल्या काही कार्याचा उल्लेख खाली थोड्या शब्दांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. वरील पूर्ण लेखांमध्ये त्यांचे मुद्दामून हे कार्य जास्त टाकले नाही कारण आपल्याला त्यांच्या आयुष्यावरील कार्य महत्त्वाचे आहे. ते खालील प्रमाणे......
जातीय विषमतेला विरोध
अस्पृश्यता निवारणाचे कार्य
आर्थिक समतेसाठी  पुढाकार (यामधूनच काय कवे कैलास सिद्धांत मांडला)
स्त्री पुरुष समानता हक्कासाठी लढा
सर्व श्रमाचा दर्जा समान ( वर्णव्यवस्थेचे प्रमाणे विरोध)
त्याकाळात परिस्थितीनुसार आर्थिक नीती
प्रशासकीय व्यवस्था सुधारली
राज्यामध्ये व्यक्ती सुधार कार्यक्रम केले
काय कवे कैलास सिद्धांत मांडला
दासोह सिद्धांत मांडला
व्यवसाय उद्योगाला प्रोत्साहन दिले
              अशाप्रकारे महात्मा बसवेश्वरांनी अनेक लोक उद्धाराची व दूरदृष्टी ठेवून कार्य करण्याची व समाज प्रबोधन करण्याची काम केली. आपण पाहतो आजही त्यांनी केलेली कामे आपल्यासाठी आणखी दूरदृष्टी देऊन जातात. म्हणूनच संपूर्ण जग त्यांना जगतज्योती क्रांतिकारी म्हणते.
लेखक - प्रा.विलास साखरे
          संस्थापक - बाल शिवराय गुरुकुल परभणी व सेमी इंग्लिश स्कूल उजळ आंबा.
मो.9552467153.



विक्री प्रक्रियेत सहभागी होताना शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्स व इतर मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे ; जिल्ह्यात ३६ हजार ३६३ कापुस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी

विक्री प्रक्रियेत सहभागी होताना शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्स  व इतर मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे ; जिल्ह्यात ३६ हजार ३६३ कापुस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी



परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 
शासकीय कापूस खरेदी केंद्र  व कृषि उत्पन्न बाजार समिती कडे शेतमाल विक्री करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील कापुस उत्पादक शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांना एक ऑनलाईन लिंक उपलब्ध करुन देण्यात आली होती दि. १८ एप्रिल २०२० रोजी कार्यान्वीत करण्यात आलेल्या या प्रणालीला परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त  प्रतिसाद दिला असून शुक्रवार दि. २४ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३६ हजार ३६३ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. आपला कापूस विक्रीसाठी घेऊन जाताना आणि विक्री प्रक्रियेत सहभागी होतांना सर्व शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्स  व इतर मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे . 
           सीसीआय व कॉटन फेडरेशन यांना शेतकऱ्याकडील एफ ए क्यू दर्जाचा कापूस खरेदी करणे बाबत सूचित केले आहे . त्यानुसार जिल्ह्यातील  परभणी तालुका - ५६०३ , गंगाखेड - ६६०१ , जिंतूर - २१०९ , पाथरी ३९ . २ . पाल्म - १६२३ . पूर्णा - ७०१ , मानवत - ५४०० , सेलू - ४२९३ व सोनपेठ - ३०४४ अशी तालुका निहाय आकडेवारी  असून एकूण ३६ हजार ३६३ शेतकऱ्यानी या लिंकवर आपला कापूस विक्री करणेसाठी नोंदणी केलेली आहे.  ही नोंदणी https://forms.gleNUASetva7aDakGn3A या लिंकद्वारे करण्यात आली आहे . त्याच बरोबर परभणी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरून https://parbhani.gov.in/ सुद्धा ही नोंदणी करता येत आहे . या संगणकीकृत सुविधेमुळे सर्व शेतकऱ्यांना घरबसल्या त्यांच्या नावाची नोंदणी करता येते तसेच शेतकरी बांधव त्यांचेकडील भ्रमणध्वनीवरुन देखील नोंदणी करु शकत आहेत. या प्रणालीमुळे शेतकऱ्याची बाजार समितीमध्ये टोकन घेण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी झाले असून केद्र शासन व राज्य शासनाने कोवीड - 19 या विषाणूचा संसर्ग न होण्यासाठी ज्या मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत त्यानुसार सोशल डिस्टन्सचे पालन होण्यास फार मोठ्या प्रमाणात मदत होऊन कोविड - 19 या विषाणूच्या संक्रमण होण्यास प्रतिबंध झालेला आहे. ही लिंक दि. २७ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणीसाठी चालु असणार आहे . त्यानंतर ही  लिक बंद होवून याद्वारे संकलीत झालेला सर्व डाटाची जिल्ह्यातील ए . पी . एम . सी . निहाय वर्गवारी करण्यात येणार आहे. प्रत्येक नोंदणीचा दिनांक आणि वेळ संगणकात साठवून ठेवलेला असल्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना दिनांक निहाय व नोंदणी केलेल्या क्रमाने त्यांचा कापूस विक्री करण्यासाठी लवकरच जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समिती यांचेमार्फत एसएमएस किंवा भ्रमणध्वनी वरुन कळविण्यात येणार आहे . त्यानुसार संबंधीत शेतकर्याने आपला कापूस विक्रीसाठी घेऊन जावयाचा आहे.
       केंद्रीय कपास निगम लि . ( CCI ) , महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ यांचेकडे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमाल विक्री करणेसाठी अनुप कुमार प्रधान सचिव ( पणन ) मंत्रालय मुंबई , दी . म . मुगळीकर , जिल्हाधिकारी , परभणी , सुनिल पवार , पणन संचालक , महाराष्ट्र राज्य , पुणे , योगीराज सुर्वे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था , औरंगाबाद ,  मंगेश सुरवसे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था , परभणी , श्री . रेणके , प्रभारी विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ म . विभागीय कार्यालय परभणी आणि परभणी जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्याच्या कापसाची विक्री होणेसाठी वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे .       
शेतकऱ्यांना त्यांचा कापूस विक्रीची ऑनलाईन नोंदणी करणेसाठी संगणीकृत प्रणाली कार्यान्वीत करणेसाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र ( NIC ) परभणीचे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनिल पोटेकर व निवासी उपजिल्हाधिकारी  अंकुश पिनाटे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

'पीबीएन शॉप' अॕपद्वारे किराणा मालासोबतच आता भाजीपालाही करा ऑनलाईन खरेदी

'पीबीएन शॉप' अॕपद्वारे किराणा मालासोबतच आता भाजीपालाही करा ऑनलाईन खरेदी



परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

कोरोना प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी लॉकडाऊन कालावधीत नागरिकांना घरबसल्या जीवनावश्यक किराणा मालाची गरज लक्षात घेवून परभणी शहरातील नागरिकांसाठी जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांच्या संकल्पनेतून " पीबीएन शॉप " हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले होते. नागरीकांच्या आणखी सुविधेसाठी या अॅपमध्ये सुधारणा करण्यात आली असून याद्वारे आता किराणा मालासोबतच भाजीपाला देखील ऑनलाईन खरेदी करता येणार आहे.  तरी शहरातील सर्व नागरिकांनी या प्रणालीचा वापर करावा आणि लॉकडाऊन कालावधीत घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी केले आहे.
          मोबाईल अॅपमध्ये भाजीपाला नावाचा स्वतंत्र विभाग कार्यान्वित करण्यात आलेला आहे. सध्याच्या अॅप धारकांना ही सुविधा वापरासाठी नव्याने डाऊनलोड करावयाची आवश्यकता नसून त्यांना फक्त त्यांच्याकडील ॲप अपडेट करावे लागणार आहे . नवीन डाउनलोड करणाऱ्यांना सुधारीत आवृत्तीच डाऊनलोडद्वारे उपलब्ध होईल. किराणा मालासोबतच आता परभणीच्या नागरिकांना भाजीपाला खरेदीसाठी देखील घराच्या बाहेर पडण्याची गरज नाही. गूगल प्ले स्टोअरवर हे ॲप विनामूल्य उपलब्ध आहे. अँड्रॉइड मोबाईल धारक हे ॲप वापरू शकतील तसेच संगणकावर www.pbnshop.in द्वारे देखील ही प्रणाली वापरता येणार आहे . सदर सेवा ही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत पुरविण्यात येत असून या मोबाईल ॲप आणि संगणक प्रणालीची निर्मिती व विकासकार्य परभणीचे ई - कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज आणि " मॅप ऑन " कंपनीचे सी.ई .ओ. सचिन देशमुख व प्रविण बाळासाहेब देशमुख यांच्यावतीने विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र ( NIC ) परभणीचे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनिल पोटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या संगणक प्रणालीचा विकास केला आहे. आज दि. २४ एप्रिल २०२० पासुन ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असन या प्रणालीद्वारे नागरिकांना आवश्यक किराणा मालाप्रमाणेच भाजीपाल्याची ऑर्डर दिल्यानंतर २४ तासाच्या आत ऑर्डरची घरपोच सेवा देण्यात येणार आहे . ऑर्डर देतांना नागरिकास त्याचा मोबाईल क्रमांक आणि संपूर्ण पत्ता स्पष्टपणे नमूद करावयाचा आहे. भाजीपाल्याच्या भावातील चढ- उतार लक्षात घेता ऑर्डर देतांना नागरिकांना त्याच्या भाजी पाल्याची अंदाजीत किंमत अॅपमध्ये दिसते परंतू प्रत्यक्ष बाजारात असलेल्या किंमतीत तफावत असू शकते परंतू ऑर्डर घरपोच देतांना प्रत्यक्ष बाजारपेठेतील दराप्रमाणे पावती देण्यात येणार आहे आणि नागरीकांनी त्या पावतीनुसार रक्कम अदा करावयाची आहे. घरपोच सेवा पुरविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतलेला असून त्यांच्या स्वयंसेवकांमार्फत ही सेवा विनामुल्य देण्यात येणार आहे . त्याकरीता कोणतीही अधिकची रक्कम बिलात लावण्यात येणार नाही. 
        परभणी शहरातील नागरिकांनी  “ पीबीएन शॉप " अॅपला  चांगला प्रतिसाद दिलेला असून दि. २४ एप्रिल २०२०पर्यंत या अॅपमध्ये ५८६ नागरिकांनी नोंदणी केलेली असून १६५ ऑर्डर्स भरल्या असून त्या पैकी दि. २२ एप्रिल पर्यंत १३१ ऑर्डर घरपोच डिलिव्हरी करण्यात आलेल्या आहेत. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, परभणी यांनी कळविले आहे.
               -*-*-*-*-

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला की नाही याचे निदान अवघ्या १५ मिनिटात करणाऱ्या ‘टेस्ट किट’च्या निर्मितीत अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील संशोधक शितल रंधे-महाळुंकर

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला की नाही याचे निदान अवघ्या १५ मिनिटात करणाऱ्या ‘टेस्ट किट’च्या निर्मितीत अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील संशोधक शितल रंधे-महाळुंकर 




कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला की नाही याचे निदान अवघ्या १५ मिनिटात करणाऱ्या ‘टेस्ट किट’च्या निर्मितीत अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील संशोधक शितल रंधे-महाळुंकर हिचे मोठे योगदान आहे. या किटला पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (एनआयव्ही) यांच्याकडून मान्यता मिळाली आहे.
शितल रंधे यांचे अकोले तालुक्यातील पिंपळदरी हे माहेर आहे. त्यांचे शिक्षण एम.एस्सी. बायोटेक झाले असून, त्या कुसगाव (पुणे) येथील ‘इम्नो’ सायन्स या कंपनीत संशोधन आणि विकास (रिसर्च अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट) विभागात प्रमुख आहेत. गेल्या चार-पाच वर्षांपासून त्या विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत. या कंपनीने प्रेग्नन्सी, डेंग्यु, एचआयव्ही, एचसीव्ही याचे निदान करणाऱ्या टेस्ट किट बनविल्या आहेत. कोरोना महामारीच्या संकटात विषाणू प्रादुर्भाव ओळखण्याची किट तयार करावी, अशी कल्पना पुढे आली. कंपनीतील शितल रंधे-महाळुंकर यांच्या नेतृत्वाखाली अतुल तरडे (एम.एस्सी.बायोटेक), अविनाश तुळसकर, अमृत कोरे, वर्षा गुंजाळ (ही पिंपळदरी, ता. अकोले येथील आहे), अवधुत सातपुते, ललित बारावकर, हनुमंत गोयकर यांनी संशोधनाच्या कामास सुरुवात केली. प्रथम किट बनवण्यासाठी परवानगी मिळवली. त्यासाठी लागणारा कच्चा माल भारताबाहेरुन मागविला. लॉकडाऊनमुळे हे साहित्य मिळण्यास थोडा विलंब झाला. तरीही जास्त वेळ मेहनत घेवून अल्पावधीत टेस्ट किट विकसीत केली आहे. किट पुण्यातील आयसीएमआर/ एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविल्या. दोन दिवसात एनआयव्ही पुणे कडून मान्यता मिळाली. सेंट्रल ड्रग स्टॅन्डर्ड कन्ट्रोल आॅरगनायझेशन (सीडीएससीओ) कडून तपासणी अहवाल आल्यानंतर कोरोनो विषाणू चाचणी किट उत्पादनाची परवानगी मिळाली आहे. १५ मिनिटांत कोरोना विषाणू प्रादुर्भाव झाला की नाही? याचे निदान या किटमुळे होते. लवकरच हे किट बाजारात उपलब्ध होत आहे.

संशोधन क्षेत्रात आवड होती. गेल्या चार वर्षांपासून कंपनीत संशोधन विभाग सांभाळते. एम.एस्सी. बायोटेक असलेले माझे काका अतुल तरडे यांच्यामुळे काम करण्याची संधी मिळाली. कोरोना महामारी संकटाच्या काळात आपल्या देशासाठी काहीतरी संशोधन कार्य करण्यात सहभाग नोंदवण्याचे भाग्य मिळाले याचे समाधान वाटते.

Thursday, April 23, 2020

संचारबंदीस जनतेने सहकार्य करावे - जिल्हाधिकारी

संचारबंदीस जनतेने सहकार्य करावे - जिल्हाधिकारी



 परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हयात जाहीर करण्यात आलेल्या  दि . २४  एप्रिल २०२० रोजी रात्री 12 वाजेपर्यंतच्या जनता संचारबंदीस जनतेने सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी केले आहे.
         जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज कोरोना विषयक बैठक संपन्न झाली. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी,  महानगरपालिका आयुक्त रमेश पवार , निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांच्यासह बांधकाम , महावितरण , पोलिस, कृषी विद्यापीठ आदी विभागातील कोरोना नोडल अधिकारी उपस्थित होते.
           बैठकीत कोरोना विषयक आजपर्यतचा सर्वांगिन आढावा घेण्यात आला तसेच कोरोना विषयक भविष्यात करावयाच्या उपाययोजनाबाबत निर्देश देण्यात आले. जिल्हयातील एकमात्र पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्या रुग्णांच्या घरातील एकुण ९ नातेसंबंधातील व्यक्तींचा दुसरा स्वॅब अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. तसेच दिल्ली निजामोद्दीन प्रकरणातील एकुण १७ व्यक्तीचा दुसरा स्वॅब अहवाल देखील निगेटीव्ह आला आहे.
            गुरुवार दि.२३ एप्रिल २०२० रोजी कोरोना विषाणु संदर्भात सायंकाळी ५ वाजेपर्यंत परभणी जिल्हा रुग्णालयात  १८ संशयित दाखल झाले असून आजपर्यंत एकुण ५९३ संशयितांची जिल्ह्यात नोंद झालेली आहे. असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
                  -*-*-*-*-

परभणी जिल्हयात येणे - जाणे करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रवेशास बंदी

परभणी जिल्हयात येणे - जाणे करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रवेशास बंदी



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-  

नौकरीच्या निमित्ताने जिल्हयातून बाहेर जिल्हयात किंवा बाहेर जिल्हयातून परभणी  जिल्हयात येणे -जाणे करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना  जिल्हयातून बाहेर जाण्यास व जिल्हयात प्रवेश करण्यास  रविवार दि. 3 मे 2020 पर्यंत लागू असलेल्या लॉकडाउन कालावधीत जिल्हा प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. असे आदेश जिल्हादंडाधिकारी मुगळीकर यांनी जारी केले आहेत.
          कोरोना (कोव्हीड -19) या विषाणूचा संसर्ग, प्रादुर्भाव आजूबाजूच्या जिल्हयात झाला आहे . त्यामूळे खबरदारी म्हणून परभणी जिल्हयात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना बाहेर जिल्हयातून परभणी जिल्हयात येणे - जाण्यापासून रोखणे आवश्यक आहे. यावर उपाययोजना म्हणून जिल्हयाबाहेरुन जे अधिकारी - कर्मचारी जिल्हयात ये - जा ( अपडाउन ) करतात, असे अधिकारी- कर्मचारी अनेक व्यक्ती , नागरीक , प्रवासी यांच्या संपर्कात येवून परजिल्हयातून कोरोना विषाणूचा संसर्ग, प्रादुर्भाव या जिल्हयात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे.
             आदेशाचे पालन न करता अनाधिकृतपणे जिल्हयात ये - जा केल्यास साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 , आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल . सदरील आदेशाची अमलबजावणी करण्याची जबाबदारी ही सर्व कार्यालय, विभाग प्रमुखावर राहील. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
                         -*-*-*-*-

परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राचार्य सुरेश नाईकवाडे 24 एप्रिल 2020 रोजी आकाशवाणीवर

परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष
प्राचार्य सुरेश नाईकवाडे 24 एप्रिल 2020 रोजी आकाशवाणीवर


परभणी / सोनपेठ (दर्शन) : - 

परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांचा 24 एप्रिल 2020 रोजी  'कोरोना काळात पत्रकारानी  वार्तांकन करताना  घ्यावयाची दक्षता  विषयावर वार्तालाप प्रसारीत होणार आहे.
 सध्या जगात कोरोना ने हा हा कार उडवला आहे. या काळात पत्रकारांनी कोविड-१९ चा मुकाबला करताना कोणती दक्षता घेतली पाहिजे या विषयावर  परभणी आकाशवाणी केंद्रावर  उद्या दिनांक 24 एप्रिल 2020 सकाळी 07 .45 वाजता प्रसारीत होणार आहे.  या कार्यक्रमात पत्रकारानी  कोविड-१९ पासून बचाव करताना कोणती दक्षता घेतली पाहिजे या विषयावर प्राचार्य सुरेश नाईकवाडे हे  मार्गदर्शन करणार आहेत.परभणी जिल्हयातील पत्रकारांनी वरील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन कार्यक्रमाधिकारी आकाशवाणी परभणी यांनी केले आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ; महागाई भत्ता जुलै २०२१ पर्यंत स्थगित

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ; महागाई भत्ता जुलै २०२१ पर्यंत स्थगित


नवी दिल्ली / मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
 
कोरोना संकटामुळे आर्थिक गणित बिघडल्यानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने १ जानेवारी २०२० ते १ जुलै २०२१ या काळासाठी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा भत्ता स्थगित केल्यामुळे २०२०-२१ आणि २०२१-२२ या वित्तीय वर्षात सरकारला एकूण ३७ हजार ५३० कोटी रुपयांचा फायदा होईल, अशी माहिती अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्याचे तीन टप्पे मिळणार होते, ते जवळपास दीड वर्षासाठी आता मिळणार नाहीत. महागाई भत्त्याचा पुढील टप्पा आता थेट जुलै २०२१ नंतरच मिळेल. सरकारच्या या निर्णयाचा परिणाम १.१३ कोटी कुटुंबावर होणार आहे. शिवाय केंद्र सरकारच्या ४८ लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना हा भत्ता मिळणार नाही._

सर्वसाधारणपणे केंद्र सरकारचा महागाई भत्ताच राज्य सरकारकडूनही लागू केला जातो. त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेला निर्णयच राज्य सरकारकडून घेतला जाऊ शकतो, असा अंदाज लावला जात आहे. कारण, करोना संकटामुळे महाराष्ट्रासारखे मोठे राज्यही आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे अशात काळात कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्याच्या माध्यमातून देण्यात येणारी रक्कम वाचवली जाऊ शकते.

राज्यांनीही केंद्राप्रमाणेच निर्णय घेतल्यास एकूण ८२ हजार ५६६ कोटी रुपयांची बचत होईल. राज्य आणि केंद्र सरकारच्या एकूण बचतीचा आकडा १.२० लाख कोटी रुपये होतो. सूत्रांच्या मते, हा सर्व वाचवण्यात आलेला पैसा कोरोनाविरुद्ध लढाईसाठी वापरला जाईल. केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्षात दोन वेळा महागाई भत्ता दिला जातो. पहिला भत्ता १ जानेवारीला ड्यू होतो, तर दुसरा दर वर्षी १ जुलैला ड्यू होतो. सरकारने जो कालावधी निश्चित केला आहे, त्यामध्ये तीन टप्प्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर ; मुंबईत संस्थात्मक क्वारंटाईनवर भर -आरोग्यमंत्री राजेश टोपे

महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर ; मुंबईत संस्थात्मक क्वारंटाईनवर भर -आरोग्यमंत्री राजेश टोपे


मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

राज्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून हा कालावधी सात दिवसांवर गेला आहे. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंध आणि उपचार केले जात आहेत. राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही. मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई महापालिकेला दिल्या आहेत. त्यासाठी शाळा, महाविद्यालये यांचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर आणण्यात यश मिळाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी बुधवारी येथे सांगितले.
आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे बुधवारी रात्री संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. या संवादतील महत्वाचे मुद्दे:
• कोरोना उपचारासाठी नविन तंत्रज्ञान आणले जात आहे. पीपीई कीटची गरज भासू नये यासाठी फोटो बुथ सिस्टीमचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी एक छोटी रुम केली जाईल ज्यात केवळ एक व्यक्ती (डॉक्टर) उभी राहू शकेल. त्यारूममधून केवळ हात बाहेर निघू शकेल ज्याला ग्लोव्हज असतील त्याद्वारे रुग्णाची स्वॅब चाचणी करता येईल, यासाठी पीपीई किटची गरज नाही. मुंबईत असे १०० फोटोबुथ बसविण्यात येणार आहे.
• प्लाझ्मा थेरपीनुसार मुंबईत उपचाराचा प्रयोग केला जाणार आहे. जे रुग्ण बरे झालेत त्यांचे रक्तद्राव घेऊन ते कोरोनाच्या गंभीर रुग्णांना देऊन त्यांच्यामध्ये ॲण्टीबॉडीज वाढविण्याचे काम करतील.
• मंबईत संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. कमी जागे मुळे होम क्वारंटाईन शास्त्रीय पद्धतीने होत नाही, अशा वेळी दाट लोकवस्त्यांमधील नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन केले जाईल. त्यासाठी शाळा, महाविद्यलयांमध्ये मध्ये खाटा टाकून तशी व्यवस्था केली जाईल.
• महाराष्ट्रात दररोज सुमारे सात हजार कोरोना चाचण्या केल्या जातात. आज ७११२ चाचण्या केल्या.
• कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पूर्वी ३.१, त्यानंतर ५ आणि आता ७.१ दिवसांवर गेला आहे. हा जो सात दिवसांचा कालावधी आहे तो अजून वाढविण्याचा उद्देश आहे.
• राज्यात दररोज १३ टक्के लोक बरे होऊन घरी जात आहेत. हे आशादायी चित्र आहे. केवळ एक टक्के रुग्ण अत्यवस्थ आहेत. ८३ टक्के लोकांना लक्षणे नाही तर १७ टक्के लोकांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत.
• महाराष्ट्रात सुरूवातीला कोरोनासाठी १४ हॉटस्पॉट होते. आता तेथे रुग्ण संख्या नाही त्यामुळे त्याची संख्या कमी करत पाच वर आली आहे. मुंबई महानगर परिसर, पुणे परिसर, नागपूर, नाशिक, असे हॉटस्पॉट असून मालेगाववर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे.
• राज्याचा कोरोनामुळे होणारा मृत्यूदर देखील ७ वरून सरासरी पाच वर आला आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा अभ्यास करण्यासाठी दोन समित्या नेमल्या आहेत.
• कोरोनाशी लढताना आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे. चाचण्या केल्या जात आहेत, सर्वेक्षण होत आहे. आयसोलेशन आणि क्वारंटाईन केले जात आहे. रुग्ण दुपटीचा दर सात दिवसांवर गेलाय त्यामुळे राज्यातील चित्र आशादायी आहे. लोकांनी घाबरू नये.


डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले कमी होतील असा आशावाद बाळगायला नक्कीच हरकत नाही- डॉ.दीपक मुंढे

डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले कमी होतील असा आशावाद बाळगायला नक्कीच हरकत नाही- डॉ.दीपक मुंढे


सोनपेठ (दर्शन) :- 

मी डॉ दीपक मुंढे, केईएम हॉस्पिटलमध्ये कनिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत आहे, मी व माझे कित्येक सहकारी केईएम, कस्तुरबा हॉस्पिटल, सेवन हिल्स हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल इत्यादी ठिकाणी कोविड ड्युटीवर आहेत.
मी जवळपास महिनाभर या कोरोना ड्युटीवर होतो. मला नुकताच ब्रेक मिळाला आहे. आम्ही दिवसा सहा-आठ तासांच्या व रात्री १२ तासांच्या शिफ्टमध्ये काम करतो, या भूतो न भविष्यती वैद्यकीय आणीबाणीच्या काळात अहोरात्र वैद्यकीय सेवा पुरवत आहोत. गेल्या काही दिवसांपासून,एका भयंकर शारीरिक व मानसिक विवंचनेतून आम्ही जात आहोत, विशेषतः ड्युटीवर असताना PPE (Personal Protective Equipment) घातल्यानंतर या कठीण काळाचे गांभीर्य अधिकाधिक जाणवायला लागते, PPE Donning (घालणे) आणि Doffing (काढणे) चे नियम आहेत ते पाळणे बंधनकारक आहे व संसर्गाचा धोका कमी करण्यात महत्त्वाचे आहे. हे PPE घातल्यानंतर असताना सहा-सात तास खाणं तर सोडाच साधं पाणी सुद्धा पिता येत नाही, शिफ्ट दरम्यान लघवीला जाणे सुद्धा शक्य होत नाही.आम्ही सर्व जवळपास २४-३० या वयोगटातील आहोत, परंतु वयस्कर किंवा मधुमेह इत्यादी व्याधींनी ग्रस्त कर्मचारी,नर्सिंग स्टाफ यांच्या त्रासाची कल्पनाही करवत नाही.
मुंबईची गरमी दिवसेंदिवस वाढत जात असल्याने व कोरोनाचा प्रादुर्भाव AC मध्ये होण्याचा जास्त धोका असल्याने म्हणून दवाखान्यात AC बंद ठेवल्या जात आहेत, डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत  झाकलेल्या या वॉटरप्रूफ पीपीई किटमध्ये घामाने कित्येक वेळा अंघोळ होऊन जाते, रात्री बारा तासांच्या ड्युटी मध्ये हा त्रास असह्य होतो परंतु संसर्गाचा धोका व प्रत्येक शिफ्टमध्ये फक्त एकच PPE दिल्या जात असल्याने आणि त्याची अगोदरच प्रचंड कमतरता असल्यामुळे दुसरा पर्यायही उरत नाही.
चेहऱ्याला N-95 मास्क, त्यावर 3 Ply सर्जिकल मास्क आणि त्यावर घातलेल्या चेहरा झाकण्याच्या प्लास्टिकच्या कव्हर मुळे निट श्वासही घेता येत नाही, प्रचंड गुदमरल्यासारखे होते त्यामुळे थकवा डोकेदुखी व इतर समस्या उद्भवतात, श्वास सोडण्याच्या प्रक्रियेत गॉगलवर धुकं जमा होतं म्हणून समोर पाहणेही अंधुक होते. याही परिस्थितीत सतत अलर्ट राहून येणाऱ्या प्रत्येक पेशंटला संभाव्य धोका समजून त्यावर दिलेल्या नियमावलीप्रमाणे उपचार करून पटापट निर्णय घ्यावे लागतात, दररोज सुमारे 250 रुग्ण आम्ही तपासतो,कित्येक रुग्ण केवळ घाबरल्यामुळे आमच्याकडे येतात त्यांना हे सगळं समजून सांगणे अति अवघड होते कारण आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही,ओरडून ओरडून बोललं तरच आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतो, ओरडल्यामुळे घसा पार कोरडा होतो त्यात पाणी पिण्याची सोय नाही म्हणून हा तोंड दाबून बुक्क्याचा मार असहाय्यतेच्याही पलिकडे जातो.
मी केईएम मार्ड चा हंगामी अध्यक्ष आहे म्हणून महाराष्ट्रातील इतर रुग्णालयात काम करणारे निवासी वैद्यकीय अधिकारी मित्र संपर्कात असतात, आम्ही संबंध सारख्याच अवस्थेमधून सर्व जात आहोत, आमच्या अनेक अडचणी आहेत परंतु हा अडचणी सांगण्याचा वेळ नाही म्हणून मिळेल त्या परिस्थितीत परिस्थितीत आम्ही सर्व रोज जीवन-मरणाची लढाई लढत आहोत, माझ्यासोबत काम करणाऱ्या माझ्या काही मित्रांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, इतर अनेक रुग्णालयामध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचा-यांना संसर्ग झाल्याचे आकडे वाढत आहेत.
एक एमबीबीएस डॉक्टर तयार होण्यासाठी सुमारे सहा वर्षाचा कालावधी लागतो, स्पेशलिटी-सुपर स्पेशलिटी डॉक्टर तयार होण्यात किमान तपभर लागतो. विश्व आरोग्य संघटनेच्या मानकाप्रमाणे दर 1000 रुग्णांमागे एक डॉक्टर असे असताना आपल्याकडेही परिस्थिती 10926 रुग्णांनांमागे एक एमबीबीएस डॉक्टर इतकी दुर्भाग्यपूर्ण आहे म्हणून त्यांच्या जीवाची काळजी घेणे, त्यांच्या अडचणी समजून घेवून त्यांचे निराकरण करण्यासाठी शासन, प्रशासन, रुग्णालय प्रशासन या सर्वांनी अधिक लक्ष घालून या काम करणाऱ्या डॉक्टर, Interns, नर्सिंग स्टाफ, सफाई कर्मचारी यांच्याकडे विशेष लक्ष देवून ते अधिक तत्परतेने सोडवले पाहिजे कारण केवळ आजच्या संकटाचीच सोडवणूक नव्हे तर उद्याच्या भारताची आरोग्यव्यवस्था मजबूत ठेवण्याचे अग्निदिव्यही सरकारला पार पाडावेच लागणार आहे.
मी मुळ बुलढाणा जिल्हा, लोणारच्या चिखला या गावातला, गावातील मी पहिलाच एमबीबीएस डॉक्टर, वैद्यकीय व शैक्षणिक पार्श्वभूमी नसणाऱ्या माझ्या पालकांना याबद्दल विशेष माहिती नाही परंतु 24*7 चालणाऱ्या निरर्थक बातम्या व अतिरंजक गोष्टींमुळे केवळ माझेच नाही तर माझ्यासोबत काम करणाऱ्या सर्वांचे पालक आतून हादरुन गेले आहेत, फोनवरील संभाषणातून त्यांच्या कातर आवाजातील चिंता मला कळते शक्य होईल तितक्या वेळेस व्हिडिओ कॉल द्वारे संपर्कात राहण्याचा आम्ही प्रयत्न करतो, या ड्युटीच्या अगोदर मी ग्रामीण भागात पोस्टींगवर होतो काही सुट्ट्या बाकी असल्याने घरी जाऊन यायची तयारी होती कारण दिवाळीपासून घरी जाणे झाले नाही परंतु या अचानक लागलेल्या ड्युटी मुळे ते शक्य झाले नाही. मुंबईत कोरोनाचा झालेला प्रादुर्भाव व मुंबईची एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता हा धोका मुंबईतून कधी संपेल याची निश्चित शाश्वती ब्रह्मदेवालाही देता येणार नाही.
TRP साठी हपापलेला भरकटलेला मीडिया, अनियंत्रित सोशल मीडिया, व आमिर खान,अक्षय कुमार इ. चित्रपट कलाकारांमुळे जनसामान्यांमध्ये डॉक्टरांविषयी वा आरोग्य व्यवस्थेविषयी प्रचंड गैरसमज, अविश्वास व भ्रामक कल्पना निर्माण झालेल्या आहेत‌.ज्या व्हेंटीलेटरला आपण कायमच बदनाम करत आलो आहोत, मुळात रुग्णाला मृत्यूशय्येवरून वापस आणणाऱ्या व्हेंटिलेटरपेक्षा सुंदर मशीन या जगात अस्तित्वात नाही,असूच शकत नाही व त्याचीच कमतरता अमेरिकेसारख्या देशाला सुद्धा भासत असल्यामुळे मोठमोठ्या वाहन कंपन्या देखील व्हेंटिलेटर निर्माण करण्यासाठी युद्धस्तरावर काम करत आहेत
रुग्ण बरा होण्यासाठी डॉक्टरांच्या Skills पेक्षा डॉक्टर-पेशंट यांच्यामधील विश्वास महत्वाचा असतो.या कोरोना मुळे उद्भवलेल्या भूतो न भविष्यती वैद्यकीय आणिबाणीच्या परिस्थितीत आपल्या जीवाची तमा न बाळगता लढणाऱ्या डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व कर्मचाऱ्यांना बघून त्यांच्याविषयीचा आदर व जनसामान्य व आरोग्यव्यवस्थेमधील हरवत चाललेला विश्वास-संवाद पूर्वपदावर येवून त्याचे रूपांतर भारताच्या आरोग्य व्यवस्थेत एकंदरीत सकारात्मक बदलात होतील असा आशावाद बाळगूया किमान डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले कमी होतील असा आशावाद बाळगायला नक्कीच हरकत नाही.
लवकरच माझी सुट्टी संपून मी पुन्हा कामावर रुजु होईल आपण सर्वांनी मात्र घरीच राहुन, सरकार व डॉक्टरांनी घालून दिलेले नियम काटेकोरपणे पाळून या संसर्ग रोकथामाच्या प्रयत्नात मदत करण्यासाठी बांधील असलं पाहिजे.

आपलाच
डॉ.दीपक मुंढे
केईएम रुग्णालय, मुंबई.
८०८७१०८४२३

Resident Doctors KEM Hospital

विरशैव बांधवांनी महात्मा बसवेश्वर व श्री जगतगुरू दारूकाचार्य जयंती स्वगृही साजरी करावी - ष.ब्र.108 श्रीगुरू नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर

विरशैव बांधवांनी महात्मा बसवेश्वर व श्री जगतगुरू दारूकाचार्य जयंती स्वगृही साजरी करावी - ष.ब्र.108 श्रीगुरू नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर


सोनपेठ (दर्शन) :-

श्री गुरू नंदिकेश्वर मठ संस्थान सोनपेठ अंतर्गत प्रतीवर्षा प्रमाणे याही वर्षी दिनांक 26 एप्रिल 2020 रविवार रोजी जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती व दिनांक 28 एप्रिल 2020 मंगळवार रोजी श्री जगत् गुरू दारूकाचार्य जयंती निमित्ताने दिनांक 24 ते 28 रोजी पाच दिवसीय सिद्धांत शिखामनी ग्रंथाचे पारायण आयोजन करण्यात आले आहे परंतु सध्या जगावर आलेले कोरोनाचे (कोव्हीड 19) संकट दुर करण्यासाठी व प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत हे पारायण स्वगृही जास्तित जास्त तमाम विरशैव समाज बांधवांनी करण्यात यावे.कोणीही सामुहिक रीत्या जयंती उत्सव व पारायण करू नये तर महात्मा बसवेश्वर व श्री जगतगुरू दारूकाचार्य जयंती स्वगृही साजरी करण्याचे आशिर्वचन ष.ब्र.108 श्रीगुरू नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर
नंदिकेश्वर मठ संस्थान सोनपेठ जिल्हा परभणी.यांनी स.सोनपेठ दर्शन प्रतिनिधी जवळ बोलताना दिले आहे.

(दिनांक 26 एप्रिल 2020 रविवार रोजी जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती व दिनांक 28 एप्रिल 2020 मंगळवार रोजी श्री जगत् गुरू दारूकाचार्य जयंती असून यावेळी ठिक दुपारी 12.00 वाजता स्वगृही म. बसवेश्वर महाराज व जगत् गुरू दारूकाचार्य महाराज यांचा फोटो ठेवून गुलाल ऊधळोन करून शिव नामाचा जय घोष करत साजरा करावा.)


Wednesday, April 22, 2020

परभणी जिल्ह्यातील नागरी भागासह परिसरात ; दोन दिवसीय संचारबंदी लागू

परभणी जिल्ह्यातील नागरी भागासह परिसरात ; दोन दिवसीय संचारबंदी लागू


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-  

परभणी महानगरपालिका हद्द आणि 5 किमी परीसर तसेच जिल्हयातील सर्व नगर पालिका हद्दीमध्ये व त्यालगतच्या 3 किमी परीसरात कलम 144 नुसार बुधवार दि . 22 एप्रिल 2020 रोजी मध्यरात्री पासून ते दि. 24 एप्रिल 2020 चे रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी जारी केले आहेत.
     या संचारबंदीतुन  सर्व शासकीय कार्यालयाचे कर्मचारी आणि त्यांची वाहने, सर्व शासकीय वाहने, सर्व शासकीय व खाजगी दवाखाने , सर्व औषधी दुकाने व वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी, शासकीय निवारागृहात तसेच शहरात अन्न वाटप करणारे एनजीओ व त्यांची वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेले वाहने व व्यक्ती, वैद्यकीय आपातकाल व अत्यावश्यक सेवा, गॅस वितरक व गॅस सिलेंडर घरपोच देणारे वाहन व त्यावरील कर्मचारी, मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक मिडीया यांचे संपादक , वार्ताहर , प्रतिनिधी , वितरक तसेच  पेट्रोलपंप वितरक , कर्मचारी व त्यांची वाहने  आणि दुध विक्रेत्यांनी केवळ घरोघरी जावून सकाळी 6  ते 9  या वेळेत दूध विक्री करावी.  खत वाहतूक त्यांची गोदामे व दुकाने तसेच त्यांच्यासाठी लागणारी वाहने व कामगार आदी व्यक्ती, समुहाला सुट राहील.
       वैद्यकीय आपातकाल व अत्यावश्यक सेवेशिवाय नागरी भागात इतर कोणतीही व्यक्ती अथवा वाहने रस्त्याने, बाजारात, गल्लीमध्ये , घराबाहेर फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलीस अधिक्षक परभणी,  महानगरपालिका आयुक्त , सर्व उपविभागातील  उपविभागीय दंडाधिकारी , अन्न व प्रशासनाचे सहाय्यक, सर्व तालुका दंडाधिकारी यांच्यावर राहील. असेही जिल्हादंडाधिकारी परभणी यांनी आदेशात नमूद केले आहे.
                      -*-*-*-*-

सोनपेठ तालुक्यातील गरजू व्यक्तींसाठी दानशूर व्यक्तींनी जीवनावश्यक वस्तू मदत स्वरूपात जमा करण्याचे तहसीलदार यांचे अवाहन

सोनपेठ तालुक्यातील गरजू व्यक्तींसाठी दानशूर व्यक्तींनी जीवनावश्यक वस्तू मदत स्वरूपात जमा करण्याचे तहसीलदार यांचे अवाहन


सोनपेठ (दर्शन) :- 

राज्य शासनाने कोरोना विषाणूच्या (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1997 दिनांक 13/3/2020 पासून लागू करून खंड 2,3 व 4 मधील तरतुदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे त्या अनुषंगाने तालुक्यातील कार्यक्षेत्रात  (कोव्हीड 19) नियंत्रित करण्यासाठी व त्याच प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच सोनपेठ तालुक्यातील गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तू मदत स्वरूपात देण्या बाबत दानशूर व्यक्तींना अवाहन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने ज्या दानशूर व्यक्तींनी या कार्यालयात जीवनावश्यक वस्तू मदत स्वरूपात जमा करतील अशा वस्तू जमा करून घेण्यासाठी खालील प्रमाणे पथक पुढील आदेशापावतो गठीत करण्यात येत आहे पथक प्रमुख - एस.ए.घोडके, नायब तहसीलदार, मोबाईल 94 23 45 37 16,सहा.पथक प्रमुख - जी.बी विरमले,आ.का.,  मोबाईल 92 84 42 42 30, सहा.पथक प्रमुख - ज्योती पगारे, अ.का., मोबाईल 70 83 36 93 34, सहाय्यक - विश्वनाथ कनके, लिपिक,  मोबाईल 97 67 98 88 02, गणेश घुगे, ऑपरेटर, मोबाईल 96 73 44 64 27 व अशोक जामोदे, शिपाई, मोबाईल 73 97 82 00 11, आदींनी प्राप्त जीवनावश्यक वस्तू बैठक हॉल तहसील कार्यालय सोनपेठ येथे जमा करून विहित नमुन्यात नोंदवही मध्ये नोंदी घेऊन प्राप्त वस्तूंचा दैनंदिन अहवाल माननीय तहसीलदार यांना सादर करण्याची तसेच गरजूंना वाटप करावे ती मदत आवक व जावक नोंदवही ठेवण्यात येऊन त्याचा दैनंदिन गोशवारा सादर करण्याचे आदेशीत केले आहे तसेच प्रतिलिपीत गट विकास अधिकारी पंचायत समिती सोनपेठ यांना आपल्या स्तरावर ग्रामपंचायत हद्दीतील सर्वांना स्वयंस्फूर्त मदत जमा करण्याचे आवाहन करावे तसेच मुख्याधिकारी नगर परिषद सोनपेठ यांना आपले स्तरावर शहरातील सर्वांना मदत जमा करण्याचे आवाहन करावे असे मा.तहसीलदार डॉ.अशिषकुमार बिरादार यांनी  (कोव्हीड 19) चा
प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक महिन्यापासून शासनानेप लाँकडाउन घोषित केलेले आहे त्यामुळे दैनंदिन काम करून उपजीविका करणारे बरेच कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूची गरज भासत आहे त्यांना मदत करण्याच्या अनुषंगाने तालुक्यातील तसेच शहरातील दानशुर व्यक्तींनी स्वयमस्फुर्तीने वस्तु स्वरुपात मदत संबंधित पथकाकडे जमा करावी संकलीत झालेली मदत गरजु कुटुंबांना वाटप करणे शक्य होईल. मदत स्वरुपात - गहु / गव्हाचे पीठ, ज्वारी / ज्वारीचे पीठ, तादुंळ, मुगदाळ, तुरदाळ, मसुरदाळ, उडिददाळ, गोडतेल (सिलबंद स्वरुपात), लाल मिरची पावडर, मसाले, हळद पावडर, साखर, चहापत्ती तसेच दैनंदिन वस्तु -आघोळीचे साबन, कपड्याचे साबन, कपडे धुन्याचे पावडर, खोबरेल तेल (सिलबंद स्वरुपात), दात धुन्याचे पावडर / पेष्ठ व भाजीपाला स्वरूपात मदत जमा करावी असे अवाहन करण्यात आले आहे.