Saturday, August 15, 2020

रुग्ण संख्या वाढल्यास यंत्रणा सज्ज - पालकमंत्री नवाब मलीक

रुग्ण संख्या वाढल्यास यंत्रणा सज्ज - पालकमंत्री नवाब मलीक


"वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवरच पॉझिटिव्ह रुग्णांनासुध्दा होम कॉरंटाईन करण्यासह क्षेत्राऐवजी केवळ घरच सील करण्यासंदर्भात निर्णय झाले आहेत".

परभणी / सोनपेठ (दर्शन):-

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणेद्वारेसुध्दा भनिष्यातील वाढती रुग्णसंख्या ओळखून यंत्रणा सज्ज ठेवली जाणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलीक यांनी शनिवारी (दि.15) पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेतुन पालकमंत्री मलीक यांनी जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादूर्भाव आणि शासकीय यंत्रणेचा सुसज्जतेबाबत माहिती दिली.यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. आजपर्यंत जल्ह्यात एक हजार 357 व्यक्ती कोरोनाबाधीत आढळल्या आहेत. 66 बाधित व्यक्ती मृत्यमुखी पडल्या आहेत.पाचशेपेक्षा जास्त बाधित व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असुन सद्यस्थितीत 747 व्यक्ती बाधित आहेत, असे मलीक यांनी नमुद केले.शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमधुनसुध्दा कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.खासगी रुग्णालयातूनसुध्दा जीवनदायी योजनेतून रुग्णांना लाभ दिला जात आहे. विशेषतः औषधोपचाराचे दरसुध्दा निश्रि्चत करण्यात आले असून
 ("वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवरच पॉझिटिव्ह रुग्णांनासुध्दा होम कॉरंटाईन करण्यासह क्षेत्राऐवजी केवळ घरच सील करण्यासंदर्भात निर्णय झाले आहेत".)
भविष्यातील वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने यंत्रणा सुसज्ज करण्याकरिता लक्ष केंद्रित केले आहे. आयटीआयसह अन्यत्र एक हजारपेक्षा जास्त बेडची व्यवस्था केली जात आहे. येत्या 15 दिवसात या दृष्टीने सर्वतोपरीप्रयत्न केले जातील, असे मलीक यांनी नमुद केले.
स्बॅब टेस्टिंग टप्याटप्याने वाढविण्यात येणार आहे. कॉरंटाईन केलेल्या रुग्णांचा पिरेडसुध्दा सात किंवा 10 दिवसांचाच रहावा, यादृष्टीने निर्णय घेतला जाणार आहे. जिल्हास्तरावर कोविडच्या पार्श्वभूमीवर एक वार रुम सुरू केली जाणार आहे,असेही ते म्हणाले.
संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.




 

No comments:

Post a Comment