सोनपेठ मध्ये एसटी पार्सल सेवा सुरू - गजानन चिकणे
कोरोनाच्या प्रादुभावामुळे गेली पाच महिने पासुन बंद असलेली पार्सल सेवा सोनपेठ येथील बस स्थानकात सुरू झाली आहे त्यामुळे व्यापारी व व्यावसायिक यांना पार्सल पाठवण्याची सोय झाल्यामुळे व्यापारी वर्गातून दिलासा व्यक्त केला जात आहे
संपूर्ण महाराष्ट्रात अती जलद व खाजगी वाहतुकीपेक्षा निम्या दरात एस.टी महामंडळाकडून पार्सल पाठवण्याची व्यवस्था आहे कोरोनाच्या प्रादुभावामुळे शासनाने रोगाचा प्रसार होवु नये म्हणून राज्यातील बस सेवा व पार्सल सेवा पाच महिन्यापासून बंद केली होती
त्यामुळे लघुउद्योग व्यापारी दुकानदार यांना पार्सल पाठवण्यास अडचण झाली होती .सध्या महामंडळाने जिल्हाबाहेर बस सेवा सुरू केल्याने पार्सल सेवा सुरू झाली आहे त्यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे येथील बस सेवा सुरू झाल्याचे गुणिना कमर्शिअल कंपनीच्या कार्यालयाचे प्रतिनिधी गजानन चिकणे यांनी कळविले आहे हि पार्सल सेवा अत्यंत जलद व माफक दरात उपलब्ध आहे या सेवेचा लाभ घ्यावा असे प्रतिनिधी यांनी कळविले आहे.
सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठी संपर्क संपादक किरण रमेश स्वामी मो.9823547752.
No comments:
Post a Comment