आज परभणी कोरोना अपडेट 17 कोरोनाबाधित रुग्ण, चौघांना डिस्चार्ज ; कक्षात 296 रुग्ण...
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
परभणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातून मंगळवारी (ता.चार) चौघा कोरोनामुक्त रुग्णांना रुग्णालय प्रशासनाने सर्व सोपस्कार पूर्ण करीत डिस्चार्ज दिला.दरम्यान, परभणी शहरासह जिल्ह्यात मंगळवारी एकूण 17 संशयित व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या आहेत. त्यामध्ये परभणी शहरातील नऊ व्यक्तींचा समावेश असुन नानलपेठ भागातील 72 वर्षीय पुरूष, एवन मार्केटमधील 55 वर्षीय पुरूष, पोलिस क्वार्टरमधील 33 वर्षीय तरुण, दर्गा रस्त्यावरील एकमिनार मशीद परिसरातील 51 वर्षीय, धन्नुबाई प्लॉटमधील 70 वर्षीय, भोयीगल्लीतील 62 वर्षीय पुरूष तसेच आझाद कॉर्नरवरील 42 वर्षीय, कालाबाबरमधील 50 वर्षीय महिला व एकबाल नगरातील 49 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.
तालुक्यातील लिंबेवाडीतील 70 वर्षीय महिला, गंगाखेड तालुक्यातील डोंगरपिंपळा येथील 37 वर्षीय पुरूष, पालम शहरातील पोलिस ठाण्यातील 38 वर्षीय पुरूष, तसेच पाथरी शहरातील जैतापूर मोहल्ला व दिवाण गल्लीतील आठ वर्षीय मुलगा, 27 वर्षीय तरुणी, 29 वर्षीय पुरूष तसेच मेनरोडवरील 60 वर्षीय पुरूष, बाजारचौकातील 39 वर्षीय पुरूष कोरोनाबाधीत आढळून आला आहे.परभणी शहरातील शास्त्रीनगरातील 25 वर्षीय तरुणी, मगदुमपुर्यातील 45 वर्षीय पुरूष, सेलू शहरातील पाऱक कॉलनीतील 44 वर्षीय व 46 वर्षीय महिला कोरोनामुक्त झाल्याने जिल्हा प्रशासनाद्वारे जिस्चार्ज देण्यात आला.
दरम्यान, परभणी जिल्ह्यात आतापर्यंत 737 कोरोनाबाधित व्यक्ती आढळले असुन 399 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. 42 व्यक्ती मृत्यू पावले असून कक्षात 296 रुग्ण आहेत.


No comments:
Post a Comment