यवतमाळ कोविड सेंटर येथुन दै सकाळ बातमीदार संजय भोसले लिहतो....
सर मागिल 12 ता. मी यवतमाळ कोविड सेंटरला भरती झालो खुपच भिती वाटत होती की, शासकीय रुग्णालयात काय चांगल्या सुविधा मिळतील. खाण्या पिण्याचे वांदे होतील .राहण्याची सुविधा मिळनार नाही आपली काळजी घेणार कोणी नाही सोबत कोणी घरचा सदस्य राहणार नाही भयभीत झालो होतो. सर आज मला पुर्ण दहा दिवस कोविड सेंटरला झाले . मला खुप मोठा चांगला अनुभव आला. आपल्या जिल्हाधिकारी, आरोग्य विभाग , खुपच चांगल्या पध्दतीने कोविड सेंटरचे नियोजन केले . सर्व रुग्णाला सकस आहार मिळेल याची तंतोतंत काळजी घेण्यात आली. सकाळी 8 वा चहा, 9.30 ला नास्ता तेही गरम , दुध ब्रेड,12 .30 ला जेवन पोळी ,भात ,भाजी, वरण, लोणचे, कांदा. एक अंडे, शेंगदाना लाडु , ड्राय फुड बदाम, पेंडखजुर,पाक अवळा , दुपारी 4 वा चहा. पुन्हा रात्री 8 वा जेवन त्याच बरोबर सर्व आरोग्य सुविधा दर दोन तासात ऑक्सिजन चेक अप, बि.पी ची तपासनी सकाळी 6 वा औषध गोळ्या ,सलायन, ईन्जेशन, दर दोन तासात रुग्णाला व्हिजीट सार काही नियोजन बद्द. खरतर कोविड सेंटरवर काम करण्यार्या डॉक्टर, नर्स, वाड बॉय. सफाई कामगार हे खरे कोविड योध्दा होत. सतत अंगात पिपिई कीट घालुन काम करणे म्हणजे जिव घुटमळत ठेवने होय . सतत पॉजिटीव रुग्णाचा संपर्क,मनात कोणतीही भिती न ठेवता आपुलकीने रुग्णाची विचार पुस करतात, खरे सामाजीक कामे या कोविड योध्दाचे आहेत सलाम त्यांच्या कार्याला. सफाई कामगार दररोज सफाई करतात. दिवसातुन दोनदा सँनेटाईज रुम केली जाते एका रुम मध्ये दोन रुग्ण असतात.खरी कमाल त्या भाऊची आहे जे रात्रण दिवस ऑक्सीजन सिलेंडर बदलुन रुग्णाचे प्राण वाचवतात एक मिनीटही ऑक्सीजन कमी पडु देत नाहीत. सर्वच आरोग्य.कर्मच्यारी आपल्या प्राणाची बाजी लावताना दिसुन येतात . जिल्हाधिकारी, आरोग्य विभाग, आरोग्य कर्मचारी,डॉक्टर ,सिस्टर, सफाई कर्मचारी, या कोविड योध्दाचे कसे आभार मानावे त्या साठी माझाकडे शब्दच उरले नाही. सह ह्रुदय सलाम त्यांच्या कार्याला.
सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठी संपर्क मो.9823547752.
No comments:
Post a Comment