शनिवारपासून व्यवहार पुर्ववत; टेस्ट बंधनकारक
परभणी / सोनपेठ (दर्शन)-
कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी (दि.14) शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू केलेली संचारबंदी शिथील होत आहे.
जिल्हा प्रशासनाने यापुर्वी वेळोवेळी काढलेल्या आदेशाद्वारे मुभा बहाल केलेल्या अस्थापना व दुकानांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेतच व्यवहारास मुभा राहणार हे स्पष्ट होत आहे. परंतू संबंधीत व्यापारी, विक्रेत्यांनी स्वतः रॅपीड अॅन्टीजन टेस्टद्वारे तपासणी केल्या शिवाय व निगेटीव्ह असल्याचं प्रमाणपत्र हस्तगत केल्या शिवाय दुकाने, व्यवहार सुरू करू नयेत, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्टपणे बजावले आहे. दि.17 ऑगस्टपर्यंत तपासणीसाठी मुदत दिली असून संबंधितांनी आपआपल्या ठिकाणी उभारलेल्या सेंटरवर जावूनच तपासणी करून घ्यावी, असे म्हटले आहे.जे व्यापारी रॅपीड टेस्ट करणार नाहीत, त्यांना आपआपली दुकाने, व्यवहार सुरू करता येणार नाहीत,असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.


No comments:
Post a Comment