Thursday, August 13, 2020

गरजवंतांना मास्क व सॅनिटारायझर द्या - ओमप्रकाश शेटे साहेबांचे चाहत्यांना आवाहन

गरजवंतांना मास्क व सॅनिटारायझर द्या 
- ओमप्रकाश शेटे साहेबांचे चाहत्यांना आवाहन



सोनपेठ (दर्शन) :-
    
भूतपूर्व मुख्यमंत्री आरोग्य कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे साहेब यांनी वाढदिवसानिमित्त गरजवंतांना मास्क व सॅनिटाइजर चे वाटप करण्याचे अवाहन महाराष्ट्रातील चाहत्यांना केले आहे. गतवर्षी सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्तांना लाखो रुपयांची मदत चाहत्यांकडून वाढदिवसाच्या औचित्याने केली गेली होती.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी तथा मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्षप्रमुख ओमप्रकाश शेटे साहेब यांना महाराष्ट्रातील दीनदुबळ्या गरजु रुग्णांचा मसिहा म्हणून ओळखले जाते.लाखो गरजवंतांना करोडोंची मदत करत प्राण वाचवत देवदूत बनलेल्या ओमप्रकाश शेटे यांचा १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात  जन्मदिवस साजरा केल्या जातो, यावर्षी कोरोना चे महाभयंकर संकट ओढवले असल्याने  वाढदिवसानिमित्त आपल्या अवतीभोवती फिजीकल डिस्टनसींग चे पालन करून गरजवंत लोकांना शक्य असेल तितके मास्क व सॅनिटरायझर वाटप करण्याचे अवाहन शेटे यांनी त्यांच्या चाहत्यांना केले आहे. 
गतवर्षी सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्तांना शेटे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लाखोंचे अन्नधान्य, किराणा सामान, औषधी, कपडे त्यांच्या चाहत्यांकडून वाटप करण्यात आली होती.

No comments:

Post a Comment