अबब! परळीत अजगर सापडला...सर्पमित्र नितीन गायकांबळे यांची कार्यतत्परता; वनविभागाच्या केले स्वाधीन
परळी / सोनपेठ (दर्शन):-
परळी तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी येथील विश्वनाथ गणपती मुंडे यांच्या आखाड्यावर दि. 9 ऑगस्ट 2020 रोजी रोजी संध्याकाळी 10.30 वा. सुमारास 28 किलो वजनाचा व सुमारे 12 फूट लांबीचा आजगर आढळून आला.परंतु सर्पमित्र नितीन गायकांबळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता संध्याकाळी पाऊस सुरू असतानाही मुंडे यांच्या आखाड्यावर जाऊन या आजगरास जिवंत पकडले. व दि.10 रोजी वनविभागाच्या स्वाधीन केले.सर्पमित्र नितीन गायकांबळे यांच्या कार्यतत्परतेचे व केलेल्या साहसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की,परळीपासून पासून जवळच असलेल्या मौजे कन्हेरवाडी येथील विश्वनाथ मुंडे यांच्या आखाड्यावर भला मोठा अजगर जातीचा साप दि.9 ऑगस्ट 2020 रोजी संध्याकाळी 10.30 च्या सुमारास आढळून आला.यामुळे मुंडे कुटुंबीय भयभीत झाले होते.भयभीत झालेल्या मुंडे कुटुंबीयांनी ही माहिती तात्काळ परळी शारदा नगर येथील सर्पमित्र नितीन गायकांबळे यांना मोबाईल वरुन दिली.तेवढ्याच तत्परतेने सर्पमित्र नितीन गायकांबळे संध्याकाळी पावसाची पर्वा न करता कन्हेरवाडी येथील मुंडे यांच्या आखाड्यावर पोहोचले आणि त्यांनी अजगर जातीचा मोठा साप पकडला व दि.10 ऑगस्ट 2020 रोजी वनविभागाच्या स्वाधीन केला.सर्पमित्र नितीन गायकांबळे यांनी केलेल्या या कामगिरीचे व कार्यतत्परतेचे परिसरात सर्वस्तरातुन कौतुक होत आहे.



No comments:
Post a Comment