30 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज, सोनपेठचे दोन
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित व्यक्तींच्या संख्येत दिवसेदिवस वाढ होत असून शुक्रवारी(दि.14) दिवसभरात 5 कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाला. तर 62 व्यक्ती बाधित आढळल्या. जिल्ह्यात 30 कोरोनामुक्त व्यक्तींना रुग्णालय प्रशासनाद्वारे सर्व सोपस्कार पूर्ण करीत डिस्चार्ज दिला.
परभणीत शनिवारी 32, बोरी 4,गंगाखेड 7,(सोनपेठ 2),पूर्णा 4,पाथरी 13 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.कक्षात 774 जण उपचार घेत आहेत. रुग्णालयात संसर्गजन्य कक्षात 804, विलगीकरण केलेले 1772 व विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेले 4945 एवढे रुग्ण आहेत. पॉझिटिव्ह 1419 स्वॅब आले आहेत. 146 स्वॅब अनिर्णायक असून 54 स्वॅब तपासणीस अयोग्य ठरले आहेत. 40 स्वॅबच्या अहवालाची प्रतिक्षा कायम आहे.


No comments:
Post a Comment